Samrat Prithviraj Review अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड चित्रपट सम्राट पृथ्वीराज चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय सम्राट पृथ्वीराजची भूमिका साकारत आहे. जर तुम्ही चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर प्रथम हे वाचा.
कलाकार : अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा, मानव विज
दिग्दर्शक : चंद्रप्रकाश द्विवेदी
कथानक
सम्राट पृथ्वीराज चौहान हा चित्रपट पृथ्वीराज चौहान या राजाच्या जीवनावर आधारित कथा आहे ज्यांनी भारताच्या इतिहासात अनेक महान गोष्टी केल्या आहेत. असं या चित्रपटात दाखवलं आहे.त्यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी अनेक महान गोष्टी केल्या आहेत. पृथ्वीराजला दिल्लीचा राजा बनवल्याचे दाखवण्यात आले आहे आणि ही गोष्ट त्याच्या जवळच्या लोकांना, विशेषतः जयचंद राणाला आवडली नाही. त्याच वेळी पृथ्वीराजने जयचंदची मुलगी संयोगिता हिच्याशीही लग्न केले आणि जयचंद आणखी नाराज होतो. यानंतर पृथ्वीराज आणि मोहम्मद घोरी यांच्यातील युद्ध दाखवले आहे.
रिव्यू
चित्रपटातील युद्ध दृश्ये खूपच प्रेक्षणीय होती, परंतु हे बाहुबली प्रकारच्या चित्रपटांसाठी खरे आहे आणि अशा ऐतिहासिक चित्रपटांसाठी नाही. बाण 360 डिग्री शॉट्समध्ये उडतात. 24,000 लोक मारले गेले, तरीही रणांगणावर रक्त नाही. काही गोष्टी चित्रपटात पाहिल्या ज्या समजल्या नाहीत.उदाहरणार्थ, 10 व्या शतकात, राजकन्या लो वेस्ट असलेले लेहेंगा परिधान केलेल्या दिसल्या. तिचे ब्लाउज आउटफिट्स बॉलीवूडच्या लोकप्रिय फॅशन डिझायनर सब्यसाचीच्या नवीनतम संग्रहासारखे आहेत.
कन्नौजची राजकन्या आणि राजपूत राजपुत्र यांच्यात लिहिलेल्या प्रेमपत्रात इश्क आणि मुबारक असे शब्द वापरले आहेत.हा युद्धाची पार्श्वभूमी असणारा चित्रपट असल्याने यात युद्ध आणि शौर्य दिसणे अपेक्षित होते.त्यासाठी कमी घोषणाबाजी आणि अधिक लढाई आवश्यक होती. चित्रपटातील संवाद फारसे चांगले,लक्षात राहणारे नव्हते. मात्र चित्रपटाची सुरुवात चांगली होते, पण मध्येच कथेचा इंटरेस्ट निघून जातो. चित्रपटाची पटकथा फारशी मजबूत नाही. गाणीसुद्धा काही खास नाहीत. जरी क्लायमॅक्स चांगला आहे आणि तुम्हाला तो बघायला आवडेल.
कलाकारांचा अभिनय
अक्षय आणि मानुषी या दोघांचा चित्रपटातील अभिनय हा सामान्य दर्जाचा पाहायला मिळाला.
सोनू सूद आणि संजय दत्त यांनी त्यांची भूमिका चोख बजावली. बाकीच्या स्टार कास्टने चांगले काम केले असले तरी.आशुतोष राणाने कन्नौजचा राजा जयचंद राणा यांची भूमिका उत्तम साकारली, मानव विज ने मोहम्मद घोरीची व्यक्तिरेखा उत्तमपणे साकारली आहे.
अनेक मोठ्या अन महत्वाच्या चित्रपट समीक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले होते.मात्र चित्रपटाच्या कथानकात दम असल्याचे दिसत नाही,कमकुवत कथानक असल्याने लोकांनी सम्राट पृथ्वीराज चौहान हा चित्रपट साफ नाकारला.
चित्रपट यशस्वी होण्यासाठी देवाला साकडे घातले होते
सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट यशस्वी होण्यासाठी चित्रपटातील प्रमुख कलाकार अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांनी
जोडीने सोमनाथ मंदिराला भेट दिली,तिथं विधिवत पूजा देखील केली,
तसेच मानुषी छिल्लर नंतर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात देखील दर्शनाला गेली.सगळीकडे साकडे घालूनही चित्रपट मात्र चालला नाही.
समीक्षकांनी हात वर केले
जेष्ठ पत्रकार दिलीप मंडल यांनी एक ट्विट करत देशातील मोठे समीक्षक तरन आदर्श यांच्यावर निशाणा साधला.
ते म्हणाले की तरन यांनी अगोदर तर खूप कौतुक केले होते,
मात्र चित्रपट फ्लॉप झाल्यावर मानुषी छिल्लर चा फोटो लावून म्हणत आहेत चित्रपट चालला नाही.
भाजप शासित राज्यात चित्रपट टॅक्स फ्री केला गेला
भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यात,मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश येथे चित्रपट करमुक्त करण्यात आला होता,मात्र तरीही चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.
आतापर्यंत चित्रपटाने केवळ 48.65 कोटींचा व्यवसाय केला आहे.
दुसरीकडे कमल हसन यांचा “विक्रम” चित्रपट दमदार कमाई करत असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
औरंगाबाद मध्ये बसमध्ये बॉम्ब ची अफवा; प्रवाशांमध्ये खळबळ
Samrat Prithviraj Box Office Collection पहिल्याच दिवशी निराशा
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
RRR Box office collection पहिल्याच दिवशी 200 कोटींचा आकडा पार
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 08 2022 19 : 18 PM
WebTitle – Samrat Prithviraj Review: Why did the audience reject Samrat Prithviraj Chauhan?