औरंगाबाद : औरंगाबादच्या महाविद्यालय परिसरामध्ये शिवनेरी आणि शिवशाही बस मध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. दुपारी 2 वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालयातील कंट्रोल रूमचा फोन वाजला आणि अज्ञाताने मध्यवर्ती बस स्थानकातून निघालेल्या बस क्रमांक एम एच 06 एस 9587 या बस मध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले. (Aurangabad Bomb news) बस तातडीने महावीर चौकात थांबविण्यात आली आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने बसचा ताबा घेत सर्व प्रवाशांना खाली उतरवून बस कर्णपुरा मैदानात नेली. तपासल्यावर बस मध्ये बॉम्ब आढळले नाही. तर शोध घेत असता बॉम्ब सदृश्य वस्तू म्हणून पॉवर बँक असल्याचं निष्पन्न झाले.
महाविद्यालय परिसरात बॉम्बची अफवा
(Aurangabad Bomb news) रात्री आठ वाजेच्या सुमारास औरंगाबाद कॉलेज परिसरात बस मध्ये बॉम्ब असल्याचे समजतातच बसच्या प्रवाशात खळबळ उडाली.एक बॉम्ब सदृश वस्तू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली,त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली,घटणस्थळी बॉम्बशोधक पथक दाखल झालं.त्यांनी शोध घेऊन सदर वस्तू बॉम्ब नसून मोबाईलची पॉवर बँक असल्याचे स्पष्ट केले,तेव्हा पोलिस आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला,मात्र तोपर्यंत अजबाजूच्या परिसरात तणावचे वातावरण तयार झाले होते.
औरंगाबाद येथे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शनिवारी शहरात होते.
पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे बसची आणि प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात आली.
बॉम्ब शोधक पथकाला बॉम्ब नसून पॉवर बँक असल्याचे आढळले त्यामुळे पोलिसांनी आणि प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.
येत्या 8 जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा औरंगाबाद येथे होणार असून त्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवले आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
स्वत:शीच लग्न करणाऱ्या मुलीच्या लग्नाला विरोध,’हे लग्न होऊ देणार नाही’
Samrat Prithviraj Box Office Collection पहिल्याच दिवशी निराशा
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
RRR Box office collection पहिल्याच दिवशी 200 कोटींचा आकडा पार
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 05, 2022 12 : 25 PM
WebTitle – Rumors of a bomb in a bus in Aurangabad; Panic among passengers