गेल्या चार ट्रेडिंग सत्रांपासून शेअर बाजारात घसरण सुरू आहे. चार दिवसात जबरदस्त मार्केट कोसळले त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे मोठ्याप्रमाणावार बुडत आहेत.अवघ्या चार दिवसांत गुंतवणूकदारांचे सुमारे 13.32 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. बुधवारी सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्स घसरला.शुक्रवारपासून झालेल्या घसरणीमुळे आतापर्यंत बीएसईचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 1,613.84 अंकांनी किंवा 2.89 टक्क्यांनी घसरला आहे.
बुधवारी दिवसभराच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक घसरले होते. निफ्टी 9 मार्चनंतर प्रथमच 16,000 च्या खाली घसरला आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 276.46 अंकांनी (0.51%) घसरून 54,088.39 वर बंद झाला. तर NSE चा निफ्टी 43.95 अंकांनी (0.27%) घसरून 16,196.10 वर बंद झाला.
शेअर मार्केट बुधवारी कोसळले, 5 लाख कोटींचा फटका बसला
बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल बुधवारी 5 लाख कोटी रुपयांनी घसरले.
चार ट्रेडिंग सत्रांमध्ये या कंपन्यांच्या भांडवलात 13,32,898.99 कोटी रुपयांची घट झाली आहे.
11 मे रोजी BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवल 2,46,31,990.38 कोटी रुपये होते.
एफएमसीजी, आयटी समभागांव्यतिरिक्त, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि लार्सन अँड टुब्रो सारख्या जड समभागांमध्येही
जोरदार विक्री दिसून आली. जागतिक बाजारातील कमजोरीमुळे भारतीय बाजारात घसरण नोंदवली जात आहे.
जागतिक बाजारपेठा काही महत्त्वाच्या आर्थिक डेटाची वाट पाहत आहेत.
परदेशी गुंतवणूकदारानी केली प्रचंड विक्री
परकीय गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीचाही बाजारावर परिणाम झाला आहे. आकडेवारीनुसार, 2022 मध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 1,41,089 कोटी रुपये काढले आहेत. यापूर्वी, 2021 च्या शेवटच्या तीन महिन्यांत त्यांनी 38,521 कोटी रुपये काढले होते. रुपयाची कमजोरी आणि डॉलर मजबूत झाल्याचाही परिणाम बाजारावर होत आहे.
याशिवाय युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे मालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे जगभरात महागाई वाढली आहे. याशिवाय चीनमध्ये कोरोनामुळे कारखाने कमी क्षमतेने काम करत आहेत. त्यामुळे पुरवठ्यावरही ताण वाढला आहे. महागाईला लगाम घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ केली होती. या कारणांमुळे शेअर बाजारात विक्री वाढली आहे.
आज निफ्टी 15808.40 तर निफ्टी बँक 33532.15 अंकावर बंद झाले.आजही मार्केटने मोठी घसरण नोंदवली आहे.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
संभाजी भिडे सायकल वरून पडल्याने गंभीर जखमी; उपचार सुरू
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 12, 2022 15:50 PM
WebTitle – Stock market downfall, loss of over Rs 13 lakh crore in four days