पुणे: शिवप्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचे नाव भीमा कोरेगाव दंगलीच्या खटल्यातून (Koregaon Bhima Case) वगळण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगाला दिली आहे.भीमा कोरेगाव दंगलीत संभाजी भिडे यांचा सहभाग असल्याची तक्रार शिक्रापुर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली होती,या दंगल प्रकरणी एकूण 22 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील 41 आरोपींवर वर्षभरापूर्वीच आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे.मात्र या 41 जणांमध्ये संभाजी भिडे यांचे नाव नसल्याची माहिती पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगाला सुनावणी दरम्यान दिली.(pune rural police excluded sambhaji bhides name from the bhima koregaon riot case)
संभाजी भिडे यांचे वकील आदित्य मिश्रा यांनी आयोगाकडे तक्रार केली की संभाजी भिडे यांच्या संदर्भातील प्रकरणात कोणत्याही प्रकारची सुनावणी होत नसल्याने त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे. यासंबंधाने ,सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान भीमा कोरेगांव हिंसाचारात भिडे यांचा प्रत्यक्ष संबंध आढळून येत नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचं नाव खटल्यातून वगळण्यात आल्याचा लेखी अहवाल दिला आहे.
या बाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव दंगलीत सहभाग दाखवणारा कोणताही ठोस पुरावा पोलिसांना आढळला नाही. म्हणूनच त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले आहे.दंगलीबाबतच्या आरोपपत्रात संभाजी भिडे वगळता इतर ४१ आरोपींची नावे आहेत.
१ जानेवारी २०१८ रोजी पुण्याजवळील कोरेगाव भीमा येथे हिंसाचार घडविण्यात आला होता.
या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद नंतर महाराष्ट्राच्या राजकारणावरही पडले होते.
या हिंसाचाराप्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला आहे.सध्या त्यावर सुनावणी सुरू आहे.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
पायरेटस् ऑफ कॅरेबीयन कॅप्टन जॅक स्पॅरो पत्नीचा मार खाऊनही…
संभाजी भिडे सायकल वरून पडल्याने गंभीर जखमी; उपचार सुरू
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 04, 2022 21:10 PM
WebTitle – Sambhaji Bhide’s name was removed from the Bhima Koregaon case