सांगली, 27 एप्रिल : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचा सांगलीमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी भिडे हे सायकलवरून पडले आहेत. सायकल चालवत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्यामुळे ते जमिनीवर कोसळले. ( Sambhaji Bhide seriously injured after falling from bicycle ) या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांच्या खुब्याला मार लागल्याचे समजते.उपचारासाठी त्यांना त्वरित सांगली मधिल भारती हॉस्पिटलमध्ये (Bharti Hospital) दाखल करण्यात आलंय. संभाजी भिडे सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी सायकल वरून जात होते. पण या दरम्यान त्यांना अचानक चक्कर आल्यामुळे ते सायकलवरुन खाली पडले.
अपघाताची माहिती समजताच संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली.
दरम्यान, भिडे यांचे वय लक्षात घेता त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात येणार आहेत.सध्या त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान ,मिरज शहरातील शिवाजी चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक आणि पुतळ्याचा लोकार्पण सोहळा काल मंगळवार दिनांक २६ एप्रिल रोजी पार पडला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला.यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी देशातील जनतेचे रक्त गट बदलण्याचे विधान केले होते.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
..तर राज ठाकरे यांच्यावर UAPA लावा वंचितची बैठकीत मागणी
आसाम : काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांची सुटका होताच पुन्हा अटक
नमाजच्या वेळी मशिदीत मोठा स्फोट,लहान मुलांसह 33 ठार
१४ एप्रिल:डॉ.आंबेडकर समता दिन,कॅनडा नंतर या देशात होणार साजरा
पुण्यात ब्राह्मण महासंघाचे आंदोलन; अंगावर आलात तर..-रूपाली पाटील
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 27, 2022 20: 35 PM
WebTitle – Sambhaji Bhide seriously injured after falling from bicycle; Treatment continues