मुंबई : Masjid Loudspeaker : राज्यात भोंग्यावरुन (Maharashtra loudspeaker controversy) सुरु असलेला वाद हनुमान चालीसा वादाने काहीसा मागे पडला आहे.मात्र तो अजून संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविली जाणार आहेत. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परंतु विशेष म्हणजे सर्वपक्षीय बैठकीला हा विषय छेडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार इम्तियाज जलील हेही उपस्थित राहिले नाहीत.या सर्वांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर या उपस्थित होत्या,त्यांनी सरकारला काही गंभीर सूचना केल्या असून जर तथ्य आढळले नाही तर राज ठाकरे यांच्यावर UAPA अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सर्व पक्षीय बैठकीत कुणी काय भूमिका मांडली?
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या बैठकीत म्हणाले,धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्याची परवानगी कायद्याने दिलेली आहे.
त्यामुळे ती काढून घेता येत नाही.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान भोंगे वापरण्यास परवानगी आहे.
पण रात्री १० ते सकाळी ६ या दरम्यान भोंगे वापरण्यासाठी बंदी असल्याचे दिलीप वळसे- पाटील यांनी नमूद केले.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की “हा केवळ मंदिर, मशिदीचा मुद्दा नाही. तर सर्व भोंग्यांचा विषय आहे.
सर्वपक्षीय बैठकीत असा निर्णय झाला आहे की एक शिष्टमंडळ केंद्र सरकारची भेट घेऊन या मुद्यावर चर्चा करेल,
आम्ही कोणत्याही एक पक्षासाठी नियम बदलू शकत नाही.आम्ही या प्रकरणी केंद्र सरकारशी चर्चा करु
आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आदित्य ठाकरे म्हणाले की, काही पक्ष स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी हा मुद्दा उपस्थित करत आहेत.
भोंग्याबाबतच्या 3 मे च्या अल्टीमेटमवर मनसे ठाम,मनसेकडून या बैठकीला बाळा नांदगावकर,नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे हजर होते. माध्यमांशी बोलताना नांदगावकर म्हणाले “आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत.कुणाला जर त्रास होत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे,न्यायालयाने ज्या गाईडलाईन दिल्यात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी भूमिका मांडली, ज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकारने विचार विनिमय करण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलावून सुचना व उपाय योजना मागविल्यात त्याबद्दल सरकारचे स्वागत आहे. सध्यस्थितीत महाराष्ट्रातील वस्त्यांमध्ये भितीदायक व तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा आणि भडकावू भाषणांमधून वातावरण बिघडवत आहे. परंतू देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्या भाषणातून समोर आलेली गंभीर गोष्ट ही आहे की ते म्हणाले की, ‘त्यांना काही पोलीस वाले कानात सांगत आहेत की काही मशिदीत व मदरशात समाज विघातक कामे चालू आहेत.’
तर मग आमची अशी मागणी आहे की सरकारने याची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन झाडाझडती घेतली पाहीजे व यात काही तथ्य आढळून आल्यास कडक कारवाई पण केली पाहीजे. आणि जर यात काही सापडले नाही तर याचा अर्थ राज ठाकरे दोन समाजात तेढ वाढवण्यासाठी संदेह पसरवून भडकावू भाषणे करत आहेत. आपल्या वक्तव्याने हिंदु समाजात गैरसमजातुन भय व दहशत पसरवत आहेत हे स्पष्ट होते हीच समाज विघातक कृती आहे. शांतता व सुव्यवस्थेला सुरुंग लावत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्यावर UAPA कायद्या अंतर्गत कारवाई केली पाहीजे.
वंचितचे ग्राऊंड वरील कार्यकर्ते सांगत आहेत की, जनता शांत आहे परंतू राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची हालचाल लक्षात येण्या इतकी वाढलेली आहे. परिस्थिती चिघळू द्यायची नसेल तर या कार्यकर्त्यांवर करडी नजर ठेवली पाहीजे. गरज वाटल्यास काही संशयित लोकांना ताब्यात घेतले पाहिजे. याच परिस्थितीमुळे मुस्लिम समाजामधील काही कट्टर कार्यकर्ते याला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आढळले तर या सेक्शन वर सुध्दा लक्ष ठेवून उर्वरित मुस्लीम समाजाला सुरक्षिततेच्या बाबतीत सरकारने आश्वस्त केले पाहिजे.
महाराष्ट्रात आजपर्यंत ज्या दंगली झाल्यात त्यामध्ये ज्या संघटना व व्यक्तीचा सहभाग आढळून आला त्या संघटना व व्यक्तीचा वेळीच बंदोबस्त करावा. राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी वरील सुचना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी सर्व पक्षीय बैठकीत महाराष्ट्र सरकारला केल्या आहेत. सदर बैठकीस मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान, सरचिटणीस आनंद जाधव यावेळी उपस्थित होते.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
आसाम : काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांची सुटका होताच पुन्हा अटक
नमाजच्या वेळी मशिदीत मोठा स्फोट,लहान मुलांसह 33 ठार
१४ एप्रिल:डॉ.आंबेडकर समता दिन,कॅनडा नंतर या देशात होणार साजरा
पुण्यात ब्राह्मण महासंघाचे आंदोलन; अंगावर आलात तर..-रूपाली पाटील
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 25, 2022 21: 50 PM
WebTitle – vanchit bahujan aghadi demand UAPA law against Raj Thackeray in all party meeting