आसाम : गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, त्या प्रकरणी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. मात्र बारपेटा पोलिस जिग्नेश मेवाणीना सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत. मेवाणी यांना लगेचच दुसऱ्या एका प्रकरणात अटक करण्यात आली.
जिग्नेश यांचे वकील अंगशुमन बोरा यांनी सांगितले की, वादग्रस्त ट्विट प्रकरणात जिग्नेश यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. ते कोर्टातून बाहेर येताच बारपेटा पोलिसांनी त्याना पुन्हा ताब्यात घेतले. सध्या त्याना पोलिसांनी सोबत नेले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याना न्यायालयात हजर केल्यानंतर या प्रकरणातही न्यायालयातून जामीन अर्ज केला जाईल.
जिग्नेश हे वडगामचे काँग्रेसचे आमदार आहेत. आसाम पोलिसांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मेवाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला देव मानतात, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.मेवाणी यांना गुजरातमधून अटक करून कोक्राझार येथे नेण्यात आले. आज त्यांना तेथील न्यायालयात हजर करण्यात आले.
जिग्नेश यांना आसामच्या कोक्राझार न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र जामीन मिळाल्यानंतर
आसाम पोलिसांनी त्याना सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी पुन्हा अटक केली.
पेशाने वकील असलेल्या जिग्नेश यांचा राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये समावेश केला.
ते युवा नेते मानले जातात. महात्मा गांधींच्या दांडी यात्रेपासून प्रेरणा घेऊन त्यांनी दलितांसाठी अस्मिता यात्रा काढली होती.
जिग्नेश मेवाणीच्या अटकेवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केले की,
“(नरेंद्र) मोदीजी, तुम्ही सरकारी यंत्रणा वापरून निषेधाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू शकता. पण सत्य कधीच कैद करता येत नाही.”
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
नमाजच्या वेळी मशिदीत मोठा स्फोट,लहान मुलांसह 33 ठार
१४ एप्रिल:डॉ.आंबेडकर समता दिन,कॅनडा नंतर या देशात होणार साजरा
पुण्यात ब्राह्मण महासंघाचे आंदोलन; अंगावर आलात तर..-रूपाली पाटील
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 25, 2022 20:30 PM
WebTitle – Assam: Congress MLA Jignesh Mewani arrested again after his release