प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवीन संसद भवनाच्या छतावर अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीचे निर्माण केलं आहे. अशोक स्तंभ हा कांस्य धातूचा असून आज त्याचे अनावरण करण्यात आले.हा पुतळा 6.5 मीटर उंच आणि 9500 किलो वजनाचा आहे. याला आधार देण्यासाठी सुमारे ६५०० किलो वजनाची स्टीलची यंत्रणाही तयार करण्यात आली आहे.
नवीन संसद भवनाच्या छतावर उभारलेला अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. यावेळी त्यांनी नव्या संसदेच्या कामात गुंतलेल्या कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी हे देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपस्थित होते. सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतचे काम 18 जुलैपर्यंत पूर्ण होईल, असे हरदीप सिंग पुरी यांनी अलीकडेच सांगितले होते.
अशोक स्तंभ काय आहे ते जाणून घ्या
मौर्य वंशाचा तिसरा शासक हा प्राचीन काळातील भारतीय उपखंडातील सर्वात शक्तिशाली राजांपैकी एक होता.म्हणून त्यानाच केवळ सम्राट ही उपाधी दिली जाते. 273 BC ते 232 BC पर्यंत त्यांनी भारतावर राज्य केले.अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत,मात्र कलिंग च्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले. सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरवला होता.
अशोक यांनी देशाच्या विविध भागात अनेक स्तूप आणि स्तंभ बांधले.
सारनाथमध्ये असलेल्या या स्तंभांपैकी एकाला अशोक स्तंभ म्हणतात,
जो स्वातंत्र्यानंतर भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकारला गेला आहे.
आता सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाबद्दल देखील जाणून घ्या
सेंट्रल व्हिस्टा हा मोदी सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याचा सेंट्रल अॅव्हेन्यू 80 टक्के तयार आहे.
यापूर्वी त्याच्या बांधकामासाठी सुमारे 971 कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते,
मात्र आता हा खर्च 29 टक्क्यांनी वाढून 1250 कोटींहून अधिक होऊ शकतो. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारने ऑक्टोबर 2022 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. हिवाळी अधिवेशन नव्या संसद भवनात व्हावे, अशी सरकारची इच्छा आहे. त्यात संसद भवनासह केंद्र सरकारशी संबंधित सर्व कार्यालयांचा समावेश आहे.
Central Vista च्या बांधकामावर आक्षेप घेणारी याचिका फेटाळली!
एकनाथ शिंदे आणि सोबतच्या बंडखोर आमदारांवर कारवाई होणार? कायदा समजून घ्या..
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 11, 2022, 16:18 PM
WebTitle – 6.5 m high Ashoka Stambh on the new Parliament Central Vista building