दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी कश्मीर मधील कलम ३७० बाबत केलेलं विश्लेषण
सदर पुस्तिक अवघ्या 24 पानांचे आहे.साध्या सोप्या सरळ आणि संदर्भ माहितीतुन काश्मिरचा नेमका प्रश्न काॅम्रेड पानसरे यांनी उगडून सांगितला आहे.त्यातील एक परिच्छेद
“कश्मिरचा प्रश्न वेगळा होता.जम्मु काश्मिर हे संस्थान चारी बाजुने भारताने वेढलेले नव्हते.सीमेवरच्या या संस्थानाची फार मोठी हद्द पाकिस्तानला लागुन होती.दळनवळन व व्यापार मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या प्रदेशाशी होता.देशाची फाळणी धर्मावर आधारीत केली गेली होती.मुस्लिम बहुसंख्येचे सलग प्रदेश पाकिस्तानात समाविष्ट झाले होते.काश्मीरमधे त्यावेळी 75%हुन अधिक जनता मुस्लीम होती.काश्मीर पाकिस्तानात सहभागी होणे स्वाभाविक वाटत होते.पाकिस्तानच्या नेतृत्वाची तश इच्छा तर होतीच परंतु नेटाचे प्रयत्न सुद्धा होते.
एवढे सारे असताना काश्मिर पाकिस्तानात सहभागी न होता भारतात सहभागी झाले याचा अर्थ काय ?
ही साधीसुधी गोष्ट नव्हती.त्या काळातील वातावरणाशी आणि इतिहासाशी इमान राखुन बोलायचे म्हटले तर
काश्मीरचे भारतातील सामिलीकरण हा भारताच्या धर्मनिरपेक्ष तत्वाच्या स्वीकाराचा अप्रतिम विजय होता.
या संबंधात आणखी एक ऐतिहासिक सत्य लक्षात ठेवायला हवे.एका अवस्थेत शेख अब्दुल्ला यांचे प्रतिनिधी म्हणुन श्री.जी.एम.साजिद यांना पाकिस्तानचे नेते महंमद अली जिना आणि भारताचे नेते पं.जवाहरलाल नेहरु या दोघांकडेही पाठवले होते.भविष्यातील जम्मू काश्मिरच्या स्थानाबद्दल काहीही स्पष्ट आश्वासन द्यायला श्री.जिनांनी नकार दिला.पं.नेहरुंनी मात्र जम्मू काश्मिरच्या खास स्थानाचे रक्षण करण्याचे मान्य केले;म्हणुन काश्मिर भारतात सामिल झाले.
पं.नेहरुंनी तसे केले नसते तर ? ”
काश्मीरबाबतच्या कलम ३७० ची कुळकथा
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)