केरळ मधील एर्नाकुलम येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी तीन बॉम्बस्फोट झाले. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कलामासेरीमध्ये असलेल्या या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी 9.30 वाजता सुमारे 2 हजार लोक प्रार्थना करत होते, त्यादरम्यान 5 मिनिटांत सलग तीन स्फोट झाले.
केरळ मधील एर्नाकुलम येथील जेहोवाज विटनेसेस संघटनेचे स्थानिक प्रवक्ते टीए श्रीकुमार यांनी सांगितले की, कन्व्हेन्शन हॉलमध्ये सकाळी ९:४५ वाजता तीन स्फोट झाले. प्रार्थना संपल्यानंतर काही सेकंदातच स्फोट झाले. पहिला स्फोट हॉलच्या मध्यभागी झाला. काही सेकंदांनंतर, हॉलच्या दोन्ही बाजूला आणखी दोन स्फोट झाले. एर्नाकुलममध्ये जिथे स्फोट झाला. त्याच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने ज्यू समुदायाचे लोक राहतात.
दोन दिवस अगोदर येथे हमासच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम संघटना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली काढत आहेत. दोन दिवसांपूर्वी एर्नाकुलममध्येही हमासच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती. मलप्पुरममध्ये शुक्रवारी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणखी एक रॅली काढण्यात आली. यात हमासचा नेता खालिद मशेल व्हर्च्युअल (online ) माध्यमातून उपस्थित होता.
गृहमंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली
स्फोटाच्या वृत्तानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गृह मंत्रालय आणि सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली.
शहा यांनी अधिकाऱ्यांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. याशिवाय स्फोटाच्या तपासासाठी एनआयए आणि आयबीची टीम पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शहा 28 ऑक्टोबरपासून 3 दिवसांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत.
एर्नाकुलमची सर्व रुग्णालये अलर्टवर
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांना स्फोटात जखमी झालेल्या लोकांवर योग्य ते उपचार तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. एर्नाकुलममधील सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, रजेवर असणाऱ्या डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय कलामासेरी मेडिकल कॉलेज, एर्नाकुलम जनरल हॉस्पिटल आणि कोट्टायम मेडिकल कॉलेजमध्ये अतिरिक्त सुविधा वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, केरळ बॉम्बस्फोटाच्या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शहा यांची केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
एनएसजीची एनबीडीएस टीमही केरळला जाणार आहे. प्रशासनाने रुग्णालयांना पूर्णपणे सज्ज राहण्यास सांगितले आहे.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की,“हॉलच्या मध्यभागी हा स्फोट झाला. मला तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले.
मी मागे होतो. तेथे धुराचे लोट होते. यात महिलेचा मृत्यू झाल्याचे मी ऐकलं.”
मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, ‘ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आम्ही घटनेचा तपशील गोळा करत आहोत.
एर्नाकुलममध्ये सर्व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित आहेत. डीजीपी घटनास्थळी जात आहेत.
आम्ही हे अतिशय गांभीर्याने घेत आहोत. मी डीजीपीशी बोललो आहे. तपासानंतर अधिक माहिती घ्यावी लागेल.
या घटनेत एक मृत्यू झाला तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपशील मिळाल्यानंतरच बोलेन.
एनआयएची टीम रवाना
NIA च्या सदस्यांची टीम घटनास्थळी जात आहे. कोची शाखा कार्यालयातून निघालेल्या एनआयएच्या पथकासोबत स्थानिक पोलीसही घटनास्थळी जाऊन तपास करणार आहेत. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस होता. हा स्फोट कसा झाला आणि कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. ज्या हॉलमध्ये हा स्फोट झाला त्याची क्षमता 2 हजार लोकांची असून स्फोटाच्या वेळी 100-150 लोकांची उपस्थिती होती. या स्फोटाबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
कतार : भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 29,2023 | 12:59 PM
WebTitle – 3 blasts during prayer meeting in Kerala