महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे.कारण ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड अनुकूल नाही.(SSC HSC Exam will conduct offline)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
या आढावा बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशापद्धतीने घ्यायच्या यावर चर्चा करण्यात आली.
या चर्चेदरम्यान या परीक्षा ऑफलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे या परीक्षा ऑनलाईन होणार नाही, असे स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दरम्यान, प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार ( RTE )असून तो त्यास मिळालाच पाहिजे.
मात्र टाळेबंदीच्या काळातील थकीत फी शुल्क भरण्यासाठी काही खाजगी शाळा विद्यार्थ्यांवर सक्ती करत असल्याची तक्रार अनेक पालक आणि शिक्षक संघटनांकडून करण्यात आली आहे.
संबंधित प्रकरणांमध्ये चौकशीचे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. RTE ( Right to education) #RTE
प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार असून तो त्यास मिळालाच पाहिजे.मात्र टाळेबंदीच्या काळातील थकीत फी शुल्क भरण्यासाठी काही खाजगी शाळा विद्यार्थ्यांवर सक्ती करत असल्याची तक्रार अनेक पालक आणि शिक्षक संघटनांकडून करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणांमध्ये चौकशीचे आदेश दिले आहेत.#RTE pic.twitter.com/LK9acehTlg
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 22, 2021
येत्या काळात राज्य स्तरावर तसेच विभागीय स्तरावर शुल्क नियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. सदर समित्यांकडे फी शुल्क वाढीबाबतच्या तक्रारी पालक नोंदवू शकतील,अशा सूचना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केल्या आहेत.
#RTE #SchoolFees
SSC Result Date Update: प्रतीक्षा संपली; दहावीचा निकाल उद्या
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 23, 2021, 13 :40 am
Web Title: SSC HSC Exam will conduct offline-rte-fee