#आरक्षण_जहर_है हा हॅशटॅग अजेंडा भाजपचे गोव्याचे राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी आज चालवला.भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून आरक्षण विरोधात गरळ ओकलेली विरोध केलेला आणि आरक्षण संपविण्यासाठी धडपड केल्याच्या बातम्या अधून मधून येत असतात,मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारात भारतीय जनतेसमोर भाजप हे आरक्षण संपवणारे नाहीत असं म्हणत असतात. भाजप सोबत सत्तेत असणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा भाजपची बाजू घेताना सतत असे म्हणताना दिसतात की भाजप आरक्षण संपवणार नाही,भाजपकडून संविधान आणि आरक्षणाला धोका नाही.आठवले काहीही दावे करत असले तरी..
वस्तुस्थिती मात्र याच्या विपरीत दिसत आहे.
काही ठिकाणी कॉलेजियम सिस्टम आणली गेलीय,काही ठिकाणी लॅटरल एन्ट्री आणली गेलीय,तर काही ठिकाणी आरक्षणात कपात करण्यात आली आहे.त्याऐवजी EWS आरक्षण लागू करून मुळ आरक्षणाला हरताळ फासण्यात आला आहे.तथाकथित उच्चजातीयांना 10% आरक्षण देण्यात आले.राज्यघटनेत आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची तरतूद नाही. अशा परिस्थितीत हा प्रस्ताव लागू करण्यासाठी राज्यघटनेच्या कलम १५ व १६ मध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे. १२४वे घटनादुरुस्ती विधेयक २०१९ बुधवारी विरोधकांच्या गदारोळातच राज्यसभेत मांडले. राज्यात फेब्रुवारी २०१९ पासून हे आरक्षण लागू करण्यात आले आहे.या आरक्षणाचे लाभार्थी प्रामुख्याने ब्राह्मण ठाकूर आणि राजपूत जाट कम्मा असे आहेत.आश्चर्यकारक म्हणजे लाखोंचे मुक मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाला यापासून वगळण्यात आल्याचे दिसते.
( तथाकथित उच्चजातीय आर्थिक दुर्बल जातींचे आरक्षण )
#आरक्षण_जहर_है – विनय तेंडुलकर
ही वस्तुस्थिती असतानाही भाजपच्या मंत्र्याकडून सतत इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी
आणि मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणावर हल्ले होताना दिसतात हे आरक्षण बंद करण्यात यावे असे अजेंडे चालवलेले दिसतात.
असाच एक आरक्षण विरोधी अजेंडा भाजपचे गोव्याचे राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी आज चालवला.
(लॅटरल एन्ट्री,खाजगीकरणाच्या विरोधात ओबीसींचे दिल्लीत आंदोलन )
त्यांनी एक ट्विट करून म्हटले आहे की आरक्षण हे विष आहे.#आरक्षण_जहर_है हा हॅशटॅगच त्यांनी वापरला आहे.
“राखीव वर्गांना नुकसान भरपाई देण्याचा वेगळा मार्ग असला पाहिजे. त्यांना नुकसान भरपाई मदत करण्यासाठी आम्ही त्यांना विनामूल्य शिक्षण, अनुदान किंवा इतर कोणत्याही प्रकारची सहाय्य प्रदान करता येवू शकेल,मात्र निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही स्वरूपाचे आरक्षण नसावे.ते आपल्याला कमकुवत करते.”
या ट्विट नंतर ट्विटरवर ओबीसी समाजातील, मागासवर्गीय, आणि आदिवासी समाजातील तरूणांनी याचा निषेध करायला सुरुवात केली.यासाठी त्यानीही #ब्राह्मणवाद_जहर_है हा हॅशटॅग सुरू केला.यामुळे भाजपच्या या खासदाराला चेकमेट मिळाला,त्यांना आपली चूक लक्षात आल्याने त्यांनी मग सारवासारव करायला सुरुवात केली.आणि भलतेच आरोप करायला सुरुवात केली.
आपल्याकडे लोकशाहीमध्ये सत्ता ही अंतिम आहे.आपण हे समजून घेतले पाहिजे.आपल्याला एकमेकांविरूद्ध भडकवणारे ते गुंड नक्कीच हे समजतात.आपण आपल्या कृतीच्या परिणामाचे भागीदार आहोत म्हणून याचा सुज्ञपणे विचार करा.
ट्विट पाहिले तर लक्षात येते की विनय तेंडुलकर यांनी हा हॅशटॅग वापरुन अगोदर आरक्षण विरोधी विष पसरवण्याचा अजेंडा रेटणे सुरू केले होते,त्यांना चोख प्रत्युत्तर दिले गेल्याने ते सारवासारव करायला लागले.एक गोष्ट ही सुद्धा खरी आहे की विनय तेंडुलकर यांचा अजेंडा फेल गेला,त्यांना जास्त कुणी भाव दिल्याचे दिसत नाही,मात्र #ब्राह्मणवाद_जहर_है हा हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेंड करत आहे.
टीम जागल्या भारत
हेही वाचा.. लॅटरल एन्ट्री,खाजगीकरणाच्या विरोधात ओबीसींचे दिल्लीत आंदोलन
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 21 , 2021 22 :50 pm
Web Title: twitterati heavily criticized BJP Rajya Sabha MP Vinay Tendulkar over his anti reservation agenda