कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 व्या जयंतीनिमित्त शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेऊन शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याची तयारी करण्यात आली आहे. शिवजयंती सोहळ्यासाठी स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगडाही सज्ज झाला आहे. मात्र, रायगडावर करण्यात आलेल्या रोषणाईवर खासदार संभाजीराजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रायगडावर असणारी ही रोषणाई विचित्र आणि अपमानास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Sambhaji Raje Bhosale on Lighting At Raigad Fort)
शिवजयंतीच्या निमित्तानं स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर करण्यात आलेल्या रोषणाईवर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, भाजप खासदार संभाजीराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त “भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल.” असे म्हटले आहे.
रायगडावर रोषणाई अपमानास्पद?
मात्र,लोकानी वेगळा सुर लावला असून अनेकांनी या रोषणाई बद्दल आक्षेप नसल्याचे म्हटले आहे.
या ट्विट खाली अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काही युजर्स नी तर मागील सरकारमध्ये मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गड किल्ले भाडे तत्वावर दिले तेव्हा आवाज का उठवला नाहीत असा प्रश्नच विचारत भाजपचा चष्मा उतरवा मग तुम्हालाही अभिमान वाटेल असे म्हटले आहे.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 19, 2021, 16:38 pm
Web Title – 2021 Shiv jayanti bjp mp sambhaji raje bhosale not happy with the lighting at raigad fort