मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानिंच्या “अँटिलिया” (केस) या घरासमोर स्फोटक भरून असलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत आढळून आला.ते रात्रीपासून ते बेपत्ता असल्याचे समजते. latest news Mukesh Ambani antalia house उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह सापडल्यानंतर विधानसभेत या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.
पोलिसांनी प्राथमिक अंदाज आत्महत्या नोंदवला आहे.
ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती दिली असून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती एएनआयशी बोलताना दिली आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली
विरोधी पक्ष नेते फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“मनसुख हिरेन यांनी आपल्या जबाबात गाडी घरगुती वापरासाठी विकत घेतली असल्याचं म्हटलं आहे.
गाडीचं स्टेअरिंग जॅम झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.मग क्रॉफर्ड मार्केटला जाऊन ते कोणाला भेटले हा महत्वाचा प्रश्न आहे.
घटनास्थळी सर्वात आधी पोहोचणारे सचिन वाझे यांना ओळखत होते का ?
सिडीआर रिपोर्ट मध्ये सचिन वाझे यांचा नंबर कसा काय? इतके योगायोग कसे काय? तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिली नाही.
मी मृतदेह पाहिलेला असून हात बांधलेले आहेत. हात मागे बांधून आत्महत्या करता येत नाही,” असं सांगत फडणवीसांनी आक्षेप नोंदवला.
अँटिलिया केस
गृहमंत्री अनिल देशमुख यांचं निवेदन
“मुंब्रा रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला आहे. त्यांच्या अंगावर कोणत्याही जखमा नाहीत. ठाणे पोलीस तपास करत असून शवविच्छेदन करण्यात येत आहे,” असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.गाडी मनसुख हिरेन यांच्या मालकीची नव्हती,इंटिरिअरसाठी यांच्याकडे देण्यात आली होती, मात्र बिल थकल्याने गाडी ताब्यात ठेवण्यात आली होती असं सांगितलं. तसंच हात बांधण्यात आले नव्हते असं सांगत महाराष्ट्र, मुंबई पोलीस तपास करण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं.घटनेचा संपूर्ण तपास विरोधी पक्षाने केंद्रीय संस्था NIA कडे देण्याची मागणी केली होती. परंतु महाराष्ट्र पोलीस हे सक्षम असल्याने हा तपास महाराष्ट्राच्या ATS कडे देण्यात आला आहे.
सचिन वाझे यांचे स्पष्टीकरण
सचिन वाझे यांना फडणवीसांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता ते म्हणाले “तुम्ही त्यांनाच विचारा. मला याबाबत काहीच माहिती नाही असं सांगत त्यांना आरोप करू द्या असं म्हटलं आहे.तसेच, “माझ्या आधी तिथे अनेक यंत्रणा होत्या. गावदेवीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीस अधीक्षक, डीसीपी झोन-2 आणि बीडीडीएस पोहोचले होते. त्यानंतर क्राइम ब्रांचचं युनिट पोहोचलं होतं त्यात मी होतो,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
अँटिलिया केस ; हिरेन यांच्या मुलाचं काय म्हणणं आहे?
मिळालेल्या माहितीनुसार मनसुख हिरेन हे काल रात्री सव्वा आठच्या सुमारास घराबाहेर पडले आणि ते परतलेच नाही. ते पायी घराबाहेर गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान हिरेन यांच्या मुलाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते आहे. मित हिरेन असं मुलाचं नाव आहे. त्यानुसार हिरेन यांना पोहता येत होतं आणि ते आत्महत्या करण्याची शक्यताही कमी असल्याच मुलगा म्हणतो. हा घातपात असावा असा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.“मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हे आत्महत्या करणाऱ्यांपैकी नाही. त्यांना आम्ही जवळून ओळखतो. त्यांना कुठलाही तणाव नव्हता. ते चांगले स्विमर होते ते पाण्यात आत्महत्या करू शकत नाहीत, असा दावा मनसुख हिरेन यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे.
मनसुख हिरेन कोण आहेत?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्कॉर्पिओ सापडली होती, तिच्या मालकाचा मृतदेह मुंब्र्यातल्या खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन हे या गाडीचे मालक असल्याचे समजते.गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती.माझी गाडी 17 तारखेला संध्याकाळी गाडीचे स्टेअरिंग जॅम झाले होते. मला मुंबईत तात्काळ एका कामासाठी यायचे होते म्हणून मी ऐरोली ब्रिजजवळ गाडी पार्क करून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी गाडी घेण्यासाठी तिथे गेलो असता गाडी जागेवर नव्हती. मी गाडीचा तीन तास शोध घेतला. आरटीओने ताब्यात घेतली आहे का ते ही चेक केले. मात्र गाडी सापडली नाही म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांनी मीडियाशी बोलताना दिली होती.
या प्रकरणामुळे अनेक गुंतगुंतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
- टीम जागल्या भारत
चिपळूण पुरग्रस्तांना महिला बचत गटांनी दिला मदतीचा हात
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on March 05, 2021 20:15 PM
WebTitle – Owner of SUV which caused explosives scare near Ambani’s house found dead