दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत गेल्या कित्येक दिवसांपासून केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध शेतकरी आंदोलन (firing at Farmers Protest) सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री काही अज्ञातांनी सिंघू बॉर्डर वर गोळीबार केल्याची भयंकर घटना घडली आहे. टीडीआय सिटी जवळील लंगरमध्ये जेवणाच्या बहाण्याने कारमधून आलेल्या काही अज्ञातांनी लंगरच्या ठिकाणी गोळीबार केला आणि ते पसार झाले आहेत. कुंडली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
सिंघू बॉर्डर वर शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदीगड येथील असणाऱ्या ऑडी कारमधून काही अज्ञात हल्लेखोर आले होते. त्यांनी लंगरमध्ये जेवणाचा आणि पाणी पिण्याचा बहाणा केला होता. त्यानंतर अज्ञातांनी घटनास्थळावरच तीन राऊंड फायर केले,थोड्या अंतरावर जावून तीन वेगवेगळ्या ठिकाणी हवेत गोळीबार केला आहे. शेतकरी आंदोलनात अशाप्रकरे हवाई गोळीबार होणं, एक गंभीर गोष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
कुंडलीच्या एसएचओ रवी कुमार यांनी सांगितलं की, पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.
या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यावर कडक कारवाई केली जाईल.
त्यासाठी विशेष पथकंही तयार करण्यात आली आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध घेवून तपास केला जात आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on March 07, 2021 22:4 5 PM
WebTitle – kisan andolan firing at singhu border farmers protest