मानव जातीच्या कल्याणाचा मूलमंत्र घेऊन तथागत बुद्धाच्या मार्गपथाचा प्रसार करण्यासाठी नाट्यकलेचा उपयोग करणारे भदंत अश्वघोष यांचा भारतीय रंगभूमीचे प्रथम नाटककार म्हणून उल्लेख केला जातो.बौद्ध राजा सम्राट हर्षवर्धन यानेही नाट्यकलेला राजाश्रय दिल्याचा उल्लेख सापडतो. पुढे महात्मा ज्योतिबा फुले यांनी ‘तृतीय रत्न’ या नाटकाद्वारे बहुजन नाट्यचळवळीच्या प्रवासाला मोठे बळ दिले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी प्रेरणेतून साहित्य निर्माण झाले आणि त्यातूनच दलित किंवा बहुजन नाट्यचळवळीचा झंझावात उभा राहिला. कदाचित कलेच्याही क्षेत्रात असलेल्या वर्गवारीमुळे ही बहुजन रंगभूमी स्वतंत्र नाट्यचळवळ उभी राहिल्याचे दिसते.
आंबेडकरी तत्वज्ञान ही दलित बहुजन रंगभूमी ची प्रेरणा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, भूमिका व आंबेडकरी तत्वज्ञान ही दलित बहुजन रंगभूमी ची प्रेरणा असून
ही रंगभूमी बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्व आणि कर्तुत्वाने व्यापलेली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञानाचे प्रतिबिंब सर्वप्रथम म.भी.चिटणीस यांच्या “युगयाञा”नाटकातून आपल्याला दिसते.
या नाटकातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विचारदृष्ठी प्रतिबिंबित होते.
सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक तत्वज्ञानाचे दर्शन घडविणारे हे दलित रंगभूमीवरील पहीले नाटक आहे.
दलित रंगभूमी
त्यानंतर दलित रंगभूमी दलित साहित्या सोबत चर्चेचा विषय ठरली, स्वरुप संकल्पना ,साहित्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र च्या भुमिकेचा या मध्ये विचार केला जावू लागला. साठ्ठोत्तरी दशकात आंबेडकरी तत्वाला आपआपल्या पध्दतीने कोंदणात बसविण्याचा प्रयत्न दलित नाटककारांच्या पिढीने केला. या मध्ये प्रामुख्याने बहुजन रंगभूमी चा उल्लेख करता येईल या रंगभुमीची स्थापना विरेंद्र गणवीर यांनी गत ३० वर्षांपासून म्हणजे १४ एप्रिल १९९० पासून २०२० सात्तत्याने विदर्भ, महाराष्ट्रातुन भारतीय रंगभूमिवर कार्य करनारे अग्रणी नाट्ककार आहते. यांचा उद्देश्य देशातील अस्पर्शिताना या नाट्य सांस्कृतिक चळवळीत आणून देशातील मुळ ज्या रंगभूमिला हजारो वर्षांचा स्वतंत्र असा इतिहास राहिलेला आहे.
पण ती मुद्दाम दुर्लक्षित ठेवल्या गेली आहे अश्या बुद्धिस्ट ऐतिहासिक रंगभूमिला पुनर्जीवित करून डॉ . बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे knowledge थिएटर उभे केले आहे.बहुजन रंगभूमी या नाट्य चळवळतुन उभे झालेले कलावंत देशभरात कार्यरत दिसतात . आजपर्यंत संस्थेने सत्तर ७० च्या जवळ पास नाट्यकृतींची निर्मिति करुन, त्याचे हजारो यशस्वी प्रयोग संस्थेने भारतभर केलेले आहे. विशेष म्हणजे बाल नाट्य चळवळ वर तीन दशके सातत्यपूर्ण कार्य करणारी ही एकमेव विदर्भ महाराष्ट्रतील संस्था आहे.
राष्ट्रिय स्तरातून जागतिक पटलवार जाण्यास सज्ज
बहुजन रंगभूमी, नागपुर ने झोपड़पटीतील गरीब, दलित , आदिवासी , भटक्या , बहुजन समाजातील बाल आणि युवा विद्यार्थीना ,
ज्याना कधीच अभिनायाचा वारसा नव्हता अशा रंगकर्मी ला थिएटर च्या माध्यमातून सशक्तपणे उभे करुन
राष्ट्रिय स्तरातून जागतिक पटलवार जाण्यास सज्ज केले.
वीरेन्द्र गणवीर यांनी या तिस वर्षात 13 बालनाट्य, 11 एकांकिका,
8 पथनाट्य,1 महानाट्य आणि 14 नाटकांचे लेखन केलेले असून त्यात “उजडल्या साऱ्या नव्या दिशा”,
“दि लॉस्ट हुमान्स”, “हिटलर की आधी मौत”, “घायाळ पाखरा”,
” भारत अभी बाकी है ” “गटार”, “भारतीय रंगभूमिचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष” प्रामुख्याने या कलाकृति प्रसिद्ध आहेत.
बहुजन रंगभूमी च्या बहुतांश नाट्यकृतीना आणि कलावंतांना निर्मिती बरोबरच लेखन, दिग्दर्शन, अभिनयाबरोबर
सर्वच आंगनमधे हजारो नामांकित पारितोषिके राज्य आणि राष्ट्रिय स्तरावर प्राप्त झालेली आहेत.
बालनाट्य, पथनाट्य, एकांकिका, लोकनाट्य, महानाट्यांचा यात समावेश आहे.
याच सोबत संस्थेद्वारे आज पर्यंत २६ बाल आणि युवांसाठी थिएटर कार्यशाळा विविध राज्यातसुद्धा घेतल्या गेल्या आहेत.
दलित रंगभूमीच्या टप्पात समाज व्यवस्थेशी दोन हात करणारा, लढणारा
दरवर्षी नाट्य आणि बालनाट्य मोहोत्सवाच्या विशेष आयोजना बरोबरच भारतीय रंगभूमिच्या संशोधनावर्ती राष्ट्रिय कांफेरेंस , परिसंवाद , चर्चा सत्र असे विविध बौद्धिक नाट्य चळवळ वरती उपक्रम चलविले जातात आणि यातूनच अनेक रंगकर्मी राष्ट्रिय स्तरावर या क्षेत्रात अकेडमिक क्षेत्रा सोबत चित्रपट , मालिका , जाहिरातीतुन ज्यात तृषान्त इंगळे , सुरेंद्र वानखेडे, अमित गणवीर, प्रीती नारनवरे , समीर रामटेके , वैष्णवी करमकर , सुहास खंडारे , स्वप्निल राउत हे कलावंत अनेक मराठी, हिंदी चित्रपट , मालिकांमधुन तसेच सुरेंद्र वानखेडे ( जे एन यू, दिल्ही ) स्नेहलता तागड़े ( एन एस डी ), तथागत गायकवाड़ ( फिल्म एंड television इंस्टिट्यूट , पुणे ), अमित गणवीर , दर्शन दामोदर ( थिएटर आर्ट्स , मुम्बई ) ,
आणि अतुल सोमकुंवर सारखे जुजबीचे कलावंत आज वैश्विक रंगमंचावर आपल्या अभिनय प्रतिभेला विस्तारित करताहेत… ज्यांचा बहुजन रंगभूमिला उभे करण्यात मोठा वाटा आहे त्यात वीरेन्द्र गणवीर सह सुरेंद्र वानखेडे , अतुल सोमकुंवर, अमित गणवीर , प्रियंका तायड़े , श्रेयश अतकर , अस्मिता पाटिल , साँची तेलेंग , धम्मपाल माटे, ऋषिल ढोबले, आशीष दुर्गे , जुहिल उके यांचा प्रामुख्याने समावेश आहे .
दलित रंगभुमी ही आशयकेन्द्री आशयघन शैली या मध्ये कधीही कमी पडली नाही. आंबेडकरी तत्वज्ञानाचा आशय प्रदर्शित करणे,
जागृती करणे,सामाजीक बांधिलकी म्हणून आपली भूमिका सिध्द करणे,
आंबेडकरी चळवळीचा सैनीक योध्दा म्हणून कार्य करणे ही भूमिका नाटकार,कलावंत घेतांना दिसतात.
दलित रंगभुमीच्या टप्पात समाज व्यवस्थेशी दोन हात करणारा, लढणारा ,
सामाजिक दृष्ट्या अधिक कणखर व भावूक होणारा,विद्रोही ,मुर्तीभंजक,अशा प्रकारचा रंगकर्मी, रंगधर्मी आपणास पाहावयास मिळतो..
आंबेडकरी तत्वज्ञानाचे दर्शन
आंबेडकरी तत्वज्ञान हे दलित रंगभुमीचे मूलतत्त्व आहे. पुढील काळात ही मूलतत्त्व वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतांना दिसतात .यांचे रूपांतरण वैचारिक चिंतनशिलतेत दिसून येतात. जागतिकीकरणात, भांडवलशाहीत होणारे सामाजिक शोषण यांना ही दलित रंगभूमी आपल्या कवेत घेत असून आंबेडकरी तत्वज्ञानाला व्यापकता देण्याचे कार्य ही आजची दलित रंगभुमी करतांना दिसते.दलित रंगभुमीपासून प्रेरणा घेत हा प्रवाह महाराष्ट्रा बाहेरही देशभरात आंबेडकरी तत्वज्ञानाचे दर्शन घडवित आहे.
हेही वाचा .. भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 02 , 2021 14 :00 AM
WebTitle – Dalit Bahujan Theaters completed 30 Year