शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात किमान रक्कम (Minimum balance) शिल्लक नसल्याने अशी खाती बँकेने बंद केल्याचे निदर्शनास आले.अशी खाती विद्यार्थी दीर्घकाळ वापरत नसल्याने बँकेकडून ती निष्क्रिय करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
यामुळे शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यास विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ लागल्या.
परंतु आरबीआय च्या (RBI) निर्देशानुसार ही कृती अयोग्य होती,
शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची बँक खाती ही किमान रक्कम (Minimum balance)
तसेच टोटल क्रेडिट लिमिट या अटींपासून मुक्त असली पाहिजेत अशा सुचना
मुंबई उच्चन्यायालयाच्या निर्देशानुसार आरबीआय ने दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांची खाती ही झीरो बॅलन्स (ZERO BALANCE) कॅटेगरी मध्ये असणे आवश्यक असून
एखाद्या विद्यार्थ्याच्या खात्यात पुरेशी रक्कम (Minimum balance) नसल्याचे कारण देवून अशी खाती बंद करणे चुकीचे आहे.

तसेच,विद्यार्थ्यांची बँक खाती ज्यादा काळ बंद असली तरी ती बंद करता येणार नाहीत.
तसेच अशा खात्यांमध्ये किमान रक्कम (Minimum balance) ठेवण्याचा आग्रह ही आरबीआयने दिलेल्या सुचनांच्या अनुसार चुकीचा आहे.
तथापी,विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती संबंधित बँक खाते योग्य Product code मध्ये खोलणे आवश्यक आहे,
तसेच विद्यार्थ्यांचे खाते आधार नंबरशी संलग्न असणे आवश्यक आहे.यासंदर्भातील अर्जाचा नमूना माहितीस्तव सोबत जोडला आहे.

शिष्यवृत्तीचा लाभ घेणारे विद्यार्थी,त्यांचे पालक आणि शिक्षक यांनी उपरोक्त बाबींची नोंद घ्यावी.शिष्यवृत्तीसाठीची विद्यार्थ्यांची बँक खाती जादा काळ वापरात नसली तरी ती बंद करता येणार नाहीत. शिवाय अशा खात्यांमध्ये किमान रक्कम (मिनिमम बॅलन्स) ठेवण्याबाबत आग्रह करता येणार नसल्याच्या आरबीआयच्या सूचना – अल्पसंख्याक विकास विभागाची माहिती.
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 16, 2021 20 :07 pm