स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिचे शेतकरी आंदोलनाशी संबंधित कथित टुलकिट समाजमाध्यमावरून प्रसारित केल्याबद्दल बेंगळूरुतील दिशा रवी या २२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली.
ती टूलकिट प्रकरणातील प्रमुख भूमिका असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
दिशाच्या अटकेनंतर आता राजकारण तापायला सुरूवात झाली असून
काँग्रेसचे वरिष्ठ नेता पी. चिदंबरम यांनी दिशा रवीच्या अटकेचा विरोध केलाय.
भारत मूर्खपणाचं नाट्यगृह बनत चाललाय,अशा शब्दात चिदंबरम यांनी दिशाच्या अटकेवरुन केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
“जर २२ वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झालाय, शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठीचं एक टूलकिट भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांपेक्षाही धोकादायक झालं आहे”, अशी खरमरीत टीका चिदंबरम यांनी ट्विटरद्वारे केली आहे. “भारत एक मूर्खपणाची रंगभूमी बनत आहे आणि दिल्ली पोलिस अत्याचाऱ्यांचे साधन बनले आहेत, ही खेदाची बाब आहे. मी दिशा रवीच्या अटकेचा तीव्र निषेध करतो आणि सर्व विद्यार्थी आणि तरुणांना हुकूमशाही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन करतो” असं म्हणत चिदंबरम यांनी दिशाच्या अटकेचा तीव्र विरोध केला आणि त्याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे प्रकरण?
प्रजासत्ताक दिनी शेतकरी मोर्चाच्या वेळी स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने कथित ‘टूलकिट’ आपल्या ट्विटर खात्यावर प्रसारित केले होते.
परंतु नंतर तिने ते डिलिट करून टाकले होते.दिल्ली पोलिसांच्या ‘सायबर सेल’च्या अधिकाऱ्यांनी
दिशा रवी हिला तिच्या घरातून प्रथम चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
‘टूलकिट गूगल डॉक्युमेंट’ तयार करण्यात आणि ते प्रसारित करण्यात तिचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर
तिला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.
दिशा रवी हिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. दिशाचा लॅपटॉप आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. त्यातून ‘टुलकिट’ प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि दिशा कोणाच्या संपर्कात होती याची माहिती मिळू शकेल, असा पोलिसांचा कयास आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘टूलकिट गूगल डॉक्युमेंट’चे संपादन दिशा हिने केले होते. ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात तिचा मोठा वाटा होता. ‘टूलकिट’बाबतचे हे प्रकरण गुन्हेगारी कटाचा भाग मानले जात असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी गूगलच्या मदतीने ‘गुगल टूलकिट’ टाकणाऱ्यांचा ‘आयपी’ पत्ता शोधला होता. त्यातून दिशाचा थांग लावण्यात आला आणि तिला अटक करण्यात आली.
दिशा रवी हिच्या अटकेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा भारताच्या संबंधी ट्विट
अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांची भाची (Niece) मीना हॅरिसने (Meena Harris) देखील यावर भूमिका घेतली असून सरकारकडून कार्यकर्त्यांना लक्ष्य का केले जाते आणि शांत का केले जाते ते विचारा.असे आवाहन तीने केले आहे.
न्यूयॉर्क टाइम्स चे पत्रकार निखोलस यांनीही या प्रकरणी ट्विट केले आहे.
तसेच भारतीय पत्रकार लेखिका राणा अय्यूब यांनीही ट्विट केले आहे.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)