पश्चिम बंगाल भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस पामेला गोस्वामी ( WEST BENGAL BJP YOUTH LEADER PAMELA GOSWAMI ARREST ) आणि तिचा जवळचा मित्र प्रबीर डे यांना कोलकाताच्या न्यू अलीपूर येथून 100 ग्रॅम कोकेनसह अटक करण्यात आली आहे.
कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार, भाजपा युवा मोर्चाची पर्यवेक्षिका आणि हुगळी जिल्ह्याची सरचिटणीस पामेला गोस्वामी आणि तिचा मित्र प्रबिर डे यांना शुक्रवारी कोलकाताच्या न्यू अलीपूर येथून अटक करण्यात आली आहे. पामेला गोस्वामी तिच्या गाडीच्या आत लाखो रुपये किंमतीचे कोकेन घेऊन जात होती.
पोलिसांच्या रुटीन तपासणीत न्यू अलीपूरमधील रस्त्यावर पामेलाची गाडी थांबविली गेली
त्यानंतर कार मध्ये शोध घेतला असता तिच्या बॅग व कारमधून एकूण 100 ग्रॅम कोकेन मिळून आले.
बाजारात या 100 ग्रॅम कोकेनची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
सरचिटणीस पामेला गोस्वामी सोबत केंद्रीय सुरक्षा दलाचा एक जवानही तिचा संरक्षक म्हणून तैनात होता.
कोलकाता पोलिस सध्या या प्रकरणात पुढील कारवाई करत आहेत.
पोलिसांनी सांगितलं की, संबंधित भाजपची युवा कार्यकर्तीला नशेच्या आहारी गेल्याची माहिती पोलिसांना अगोदर पासूनच होती. पोलिसांनी रस्त्यावर तपासणी सुरू असताना पामेला यांची कार थांबवली. यावेळी त्यांच्या कारची आणि बॅगची झडती घेतली असता पोलिसांना 100 ग्रॅम अवैध कोकेन मिळाले. या कोकेनची बाजारात लाखो रुपये किंमत आहे.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 19, 2021, 21:05 pm
Web Title – Kolkata bjp youth leader Pamela goswami arrested for carrying 100 grams cocaine