उत्तर प्रदेशचा उन्नाव जिल्हा मुलींसाठी स्मशानभूमीसारखा झाला आहे…एका मागून एक हादरवून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत.आणि यावर सरकार प्रशासन पातळीवर काहीच उपाय योजना करण्यात आल्याचे दिसत नाही.आताची घटना ही उन्नावमधील असोहा पोलिस ठाण्यातील बबुरहा गावची असून तेथे 3 दलित अल्पवयीन मुली शेतात ओढणीने गळफास लागलेल्या अवस्थेत सापडून आल्या.यातील दोन मुलींचा मृत्यू झाला असून तिसर्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.सध्या त्याच्यावर कानपूरच्या एजन्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार,कोमल (16), काजल (वय 13) आणि रोशनी (वय 17) बबुरहा गावातील या तीन अल्पवयीन मुली दुपारनंतर गुरांसाठी शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. बराचवेळ त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.कुटुंबीयांना त्या घटनास्थळी त्यांच्याच शेतात ओढणीने गळा आवळल्याच्या स्थितीत आढळून आल्या.यापैकी कोमल आणि काजल यांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी रोशनी काहीही सांगण्याची स्थितीत नव्हती.तिची प्रकृती चिंताजनक आहे.
शारीरिक अत्याचार झाल्याचा संशय
पोलिसांनी शारीरिक अत्याचार,बलात्कार याबद्दल स्पष्ट केलेले नाही,
प्रथमदर्शनी घटनास्थळी फेसयुक्त पदार्थ आढळून आल्याने विषारी पदार्थाच्या सेवनाने
मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
परंतु उत्तरीय तपासणी अहवालातच मृत्यूचे नेमके कारण समजू शकते.
कुटुंबाचे म्हणणे –
मृत्यू झालेल्या पैकी एका मुलीच्या भावाने याबाबत कुणावरही संशय नसल्याचे म्हटले तसेच अभ्यासाचा तनाव हा देखील मुद्दा असू शकत नाही कारण त्यांची शाळा बंद करून त्यांना केवळ शेतीतच लक्ष देण्याचे काम देण्यात आल्याचे त्याने म्हटले,तसेच कोणत्याही प्रकारचे फोन आले नसल्याचे म्हटले.मात्र तीनपैकी एक वाचलेल्या मुलीकडूनच याबाबत अधिक माहिती मिळू शकेल असे त्याने म्हटले आहे.
समाजवादी पार्टीचे एमएलसी सुनील सिंह यादव यांनी ट्विट करून बलात्कार करून खून करण्यात आला असे म्हटले आहे.तसेच या घटनेने सरकारच्या महिला सुरक्षा आणि मिशन पॉवरवर काळे फासण्याचे काम केले आहे.जे गुन्हेगार आहेत बलात्कारी आहेत अशांचा जयघोष करून सत्तेचे रक्षण करणाऱ्या लोकांच्या राजवटीत यापेक्षा बीभत्स आणि लज्जास्पद काही असू शकत नाही.असे म्हटले आहे.
आझाद समाज पार्टी चे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी ट्विट करून म्हटले आहे की,
उन्नाव कांड मधील सदर घटनेत वाचलेल्या एकमेव साक्षीदार मुलीच्या उपचार आणि सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे.
या मुलीला तत्काळ एअर एंब्यूलन्स ने दिल्लीच्या AIIMS मध्ये दाखल करण्यात यावे.उत्तरप्रदेश सरकारचे गुन्हेगारांना संरक्षण आणि गुन्हेगारांच्या बाबतच्या सरकारच्या कार्यशैलीबद्दल देशाने हाथरस कांडात पाहिलेलं आहे.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 18, 2021, 12:50 pm
Web Title – Uttar Pradesh Unnao case three minor dalit girls in demand to shift sole witness to delhi aiims