सिरोही :भटक्या कुत्र्याने 1 महिन्याच्या बाळाला हॉस्पिटलमधून पळवून नेले;त्यांनंतर चावा घेतला यात दुर्दैवी बाळाचा मृत्यू झाला आहे. राजस्थान,सिरोही येथील सरकारी जिल्हा रुग्णालयातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका आजारी तरुणाची काळजी घेण्यासाठी त्याची पत्नी आणि मुले रुग्णालयात पोहोचली होती. रात्री महिलेजवळ तिचे एक महिन्याचे बाळ झोपले होते. तेव्हा एका कुत्र्याने मुलाला पळवून नेले.नंतर मुलाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला. सरकारी रुग्णालयातील देव ट्रस्टच्या व्यवस्थेचे हे सर्वात मोठे आणि लाजिरवाणे उदाहरण आहे. हा मुद्दा मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आमदार संयम लोढा यांनी विधानसभेत उपस्थित केला. मंगळवारी UDH मंत्री शांती धारीवाल यांच्यासमोर लोढा यांनी दोषींवर कारवाई, पीडितेच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची भरपाई आणि महिलेला सरकारी नोकरी देण्याची मागणी केली. लोढा यांच्यासोबतच विरोधी पक्षाचे उपनेते राजेंद्र राठोड यांनीही नुकसानभरपाई म्हणून १० लाख रुपयांच्या मागणीचा पुनरुच्चार केला.1-month-old baby attacked by stray dog in hospital in Sirohi
भटक्या कुत्र्याने चावा घेतला बाळाचा मृत्यू
बालकाच्या मृत्यूमागे शासकीय रुग्णालयातील गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. रुग्णालयाच्या वॉर्डातून एका महिन्याच्या बाळाला कुत्र्याने पळवून नेले. त्यांनंतर कुत्र्याने चावा घेऊन भक्ष करण्याचा प्रयत्न केला.लोकांनी हे पाहून कुत्र्यांना कसेबसे पिटाळून लावले. मात्र मुलाच्या आईला घटनेची माहिती मिळेपर्यंत कुत्र्याने मृतदेहाची छिन्नविछिन्न अवस्था केली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मेडिकल बोर्डाने मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
जवाईबांद गावातील महेंद्र रुग्णालयात दाखल, पत्नी आणि मुलेही होती
सदर घटनेबाबत अधिक माहिती देताना स्थानिक पोलीस अधिकारी सीताराम यांनी सांगितले की, पाली जिल्ह्यातील जवाईबांद येथील रहिवासी महेंद्र कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महेंद्र यांची पत्नी रेखा आणि तीन मुले वॉर्डात होती. काल रात्री रेखा तिच्या तीन मुलांसह वॉर्डात खाली झोपल्या होत्या. मुलांमध्ये एक महिन्याचा मुलगाही होता. रात्री दोनच्या सुमारास तीन भटके कुत्रे वॉर्डात आले. त्यातील एकाने आईजवळ झोपलेल्या मुलाला उचलून हॉस्पिटलच्या बाहेर नेले.आणि त्याला चावा घेऊन जखमी केले,यातच बाळाचा मृत्यू झाला.अलिकडे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आणि त्यामुळे लहानग्याव,जेष्ठ नागरिकांवर होणारे हल्ले हे चिंतेचा विषय बनले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. भवरलाल म्हणाले की, घटनास्थळी तैनात कर्मचार्यांचा निष्काळजीपणा प्रथमदर्शनी समोर आला आहे.
ज्यावर नर्सिंग अधिकारी सुरेश मीणा यांना निलंबित करण्यात आलं आहे. यासोबतच वॉर्ड गार्ड भवानी सिंग आणि वॉर्ड उज्ज्वल देवासी यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात अन्य कोणाचा निष्काळजीपणा आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.असं सांगण्यात आलंय.
पाणी की पानी ? न की ण, ष की श किंवा असे बरेच काही बरळणाऱ्यांसाठी
व्हॅलेंटाईन डे,बजरंग दल च्या गुंडांना लोकांनीच पळवून पळवून मारलं
Nikki Yadav Murder :निक्की यादव चा खून,फ्रीजमध्ये मृतदेह;संपूर्ण प्रकरण
डॉ.आंबेडकर जीवंत असते तर गोळ्या घातल्या असत्या – हमारा प्रसाद ला अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 01,2023 19:36 PM
WebTitle – 1-month-old baby attacked by stray dog in hospital in Sirohi