संत शिरोमणी रविदास महाराजांचा काळ हा इ.स १५ व्या शतकातील आहे ज्या काळाला आपण मध्ययुगीन काळ म्हणून ओळखतो….याच काळात गंगा नदीच्या तिरी काशी,बनारस सीर गोवर्धनपूर मांडूर या गावी १५ माद्य पौर्णिमा शके १४३३ ला संत रविदासांचा जन्म वर्णव्यवस्था आणि जन्मव्यवस्थेच्या उतरंडीत सगळ्यात खालच्या स्तरावर समजल्या जाणाऱ्या चर्मकार समाजात झाला… आणि मध्ययुगीन कालखंडात त्यांच्या रूपाने भारतीय इतिहासात सामाजिक क्रांतीचा प्रणेता उदयास आला..त्यांच्या जन्मा संबधी संत रविदास लिहितात..
चौदह सौ तेंतीस की माद्य सुदी पंद्रास ।
दु:खीयो के कल्याण हित प्रगटे श्री रविदास ।।
चमार जातीत जन्मलेल्या संत रविदास महाराजांनी चमार या जातीतील परंपरागत बघणाऱ्यांचे दृष्टीकोणच बदलून टाकले #मेरी_जाती_विख्यात_चमार असा डंका त्यांनी वाजविला…आपल्या समाजाची ओळख पटवून देताना रविदास महाराज म्हणतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे वर्ण वेदापासून निर्माण झाले असतील पण चर्मकार समाज त्याही पाहिल्यापासुनचा आहे…असा धक्का त्यांनी काही धर्मधिष्टांना दिला..
एक कवी ,साहित्यक, प्रबोधनकार, मागदर्शक म्हणून त्यांच्याकडे आदर्शाने पाहिले जाते..श्रमण परंपरा आणि गुरू रविदास या पुस्तकाच्या नुसार रविदासांच्या वडिलांचे नाव #रघु किंवा #राघव असे होते तर आईचे नाव #करमा किंवा #घुरबिनिया होते..पत्नीचे नाव #लोन किंवा #लोणा असे होते व पुत्राचे नाव #विजयदास होते…संत रविदास पारदर्शी व कर्तव्यदक्ष विचार सरणीचे संत होते हे त्यांच्या साहित्यावरून आपणास दिसते..
खरा संत
समाज परिवर्तनाचा व मानव मुक्तीचा लढा त्यांनी त्या काळात दिला ज्यां काळात जातीव्यवस्था ही चरम पंथावर होती..दलित,आदिवासी,मूलनिवासी व बहुजन समाजातील लोकांचे प्रश्न खऱ्या अर्थाने त्याकाळात कोणी मांडले असतील तर ते संत रविदास होय…हे मांडत असताना सामाजिक समता व धर्मनिरपेक्षता जोपासणारा एक खरा संत यातून पाहायला मिळतो म्हणूनच शिख धर्माचा पवित्रग्रंथ #गुरूग्रंथसाहेब मध्ये युगपुरुष रविदास महाराज्यांच्या विचारांना अग्र स्थान देण्यात आले आहे…
पण आपण त्यांचे विचारांचे पाईक असूनही त्यांच्या प्रगल्भ विचारांपासून दूर पडत आहोत किंवा आजची धर्मव्यवस्था आपल्याला त्यापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र करत आहे…समतावादी विचारांच्या प्रचारासाठी संत रविदास भ्रमण करतात, विचारांच्या प्रचारासाठी मोठमोठाली समागम घेतात आणि सम्पूर्ण देशातील राजा,महाराजा पासून सामान्य दलित,पीडित दिन-दुबळा माणूस त्यांच्या विचाराला आत्मसात करतो..धर्मधर्मातील तिळ सोडवितांना रविदास म्हणतात..
मस्जिद सो कचू घिन नहीं, मंदिरी सो नहीं पियार
दोहू मह अल्लाह राम नहीं, कह रविदास चमार !!
-संत रविदास दर्शन दोहा १४६ ।।।
मुसलमान से दोस्ती,हिंदूअन सो की प्रीत ।
रैदास जोति सभ राम की,सभ हैं अपने मित्र “
-रविदास दर्शन १४७ ।।
वेद व वेदपुरोहितांचे थोतांड जगासमोर आणले
देव,धर्म,वर्त, वैकल्य यांच्या माध्यमातून रंगवलेली गुलाम मानसिकता संत रविदासांनी ओळखली होती ही घालवण्यासाठी त्यांनी कार्य प्रामुख्याने केले…सामाजिक,धार्मिक व्यवस्थेचे गहन चिंतन, मनन करून रवीदासांनी तत्कालीन समाजव्यवस्थेवर प्रखर हल्ला चढविला…कर्मकांडाच्या आधारावर छळल्या जाणाऱ्या जनतेस त्यांनी बाहेर काढले…वेदांना प्रमाण मानणाऱ्या वेद व वेदपुरोहितांचे थोतांड जगासमोर त्यांनी आणले व वेदांचे खंडन करताना ते म्हणतात..
चरिउ वेद किया खंडोति,जण रैदास करे दंडोति ।।
-संत रविदास :जीवन व दर्शन पू.४२ ।।
संत रविदासांनी कोणतेही शस्त्र न उचलता विचारांच्या बळावर सामाजिक परिवर्तनाचा लढा अत्यंत सक्षमपणे त्या काळात उभा केला व तो विचारांच्या विविध पातळीवर यशस्वीपणे लढला..रविदासांनी सांगितलेला मार्ग मानवमुक्तीचा मार्ग आहे..त्यात कोणत्याही प्रकारचे अवंडबर नाही किंवा परस्पर विरोधाभास निर्माण होईल असा भेदभाव देखील नाही….म्हणून त्यांनी भारतीय संविधानाला साजेल असे भाकीत त्या काळात करून ठेवले होते…
“ऐसा चाहू राज मै, सब न को मिले अन्न ।
छोटे बडे सब सम बसे,गुरू रविदास रहे प्रसन्न ।।
-रविदास दर्शन दोहा -१९४
संत रविदास त्या धर्माच्या परंपरेला मानतात जी वैदिक धर्माच्या उत्पत्ती पूर्वी मूलरूपात देशात उपलब्ध होती.
मध्ययुगात प्रचलित हिंदू,मुस्लिम धर्मातील विरोधाभास पाहून रविदास महाराजांनी सटीक शब्दात उत्तर दिले…
रविदास हमारो राम जोई, सोई हैं रहमान ।
काबा काशी जानी यही,दोनो एक समान ।।
-श्रमण परंपरा आणि गुरू रैदास -पू .५७
हिंदू मुस्लिम एकतेचा मुद्दा त्यांनी त्या काळात समतेच्या त्त्वातून मांडला व त्यांनी धर्माकडे पाजण्याची परंपरागत दृष्टी नाकारली…संत रविदास एक युगपुरुष होते त्यांनी आपले पूर्ण आयुष्य दिन दुबळ्यांना,अशपुष्य बहुजनांना अंध धर्माच्या बेडीतून काढण्यासाठी घालवले म्हणूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ‘दि अनटचेबल’ हा ग्रंथ संत रोहिदास, संत चोखामेळा व नंदनार या तिघांना अर्पण केलाय. बाबासाहेबांनी अर्पण पत्रिकेत असे म्हटले आहे की, ‘संत रोहिदास अस्पृश्य म्हणून जन्मास आले आणि आपल्या पावित्र्याने व सदाचाराने सर्वाच्या बरोबरीने ठरले. त्यांच्या पावन स्मृतीस अर्पण.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जसे संत कबीरास गुरू मानले, त्याचप्रमाणे आपला ग्रंथ संत रोहिदासांना अर्पून एका अर्थाने त्यांनाही गुरुस्थानी मानले. देशात जी जातीव्यवस्था होती, जी भयानक अस्पृश्यता होती, त्या व्यवस्थेच्या विरुद्धच संत रोहिदासांनी बंड पुकारले होते…असे ते महान संत होते..त्यांना शतशः नमन व विनम्र अभिवादन !!
टीप-त्यांच्या जन्म आणि निर्वानाबद्दल अनेक दंतकथा पसरवलेल्या गेल्या आहेत म्हणून त्यांच्या मृत्यूबद्दल मी जाणून बुजून येथे काही लिहले नाही …अनेक जणांच्या नुसार त्यांचा खून केला गेला होता धर्मपुरोहिता कडून कारण त्यांनी धार्मिक -जाती रितीवर प्रखड आपले विचार मांडले होते… येथे मी फक्त काही महत्वपूर्ण मुद्देच लिहले आहे …काही चुका झाल्या असतील तर कळवावे !!
by Moin kabra
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)