सोलापुरात निघालेला लग्नाळू तरुणांचा मोर्चा राज्यात चेष्टेचा विषय झाला असला तरी या मोर्च्यात करण्यात आलेली गर्भ लिंगनिदान चाचणीवरील बंदीची मागणी स्वागतार्ह आहे. खर तर मोर्चाची हीच मुख्य मागणी असल्याचे दिसते पण कदाचित या विषयावर काढलेल्या मोर्चाची दखल मीडियाने घेतली नसती म्हणून मोर्चा आयोजकांनी ही शक्कल लढवली असावी. मोर्चात सामील झालेले बहुतेक तरुण काही वय उलटून गेलेले दिसत नव्हते पण, तरी महाराष्ट्रातल्या काही भागांसह राजस्थान, गुजरात, हरियाणा या राज्यात ही समस्या जास्त गंभिर आहे. ही समस्या विशेष करून जाट, गुज्जर, राजपूत, लेवा पटेल, लेवा पाटीदार, मराठा या शेतकरी जाती, वरच्या स्तरातील ओबीसी जातींसह जैन समाजात सुद्धा खूपच जास्त तीव्र आहे. त्यामानाने अनुसूचित जाती आणि जमातींमधे ही समस्या तेवढी गंभीर नाही.
लग्नाळू तरुणांचा मोर्चा अन जातीचा पदर
सध्या तीव्र बनलेल्या या समस्येची सुरवात ९० च्या दशकात झाली आहे जेव्हा देशात मोठ्या प्रमाणात गर्भनिदान केंद्र सुरू झाले होते. पहिला मुलगाच हवा किंवा मुलगी नकोच या विचाराने ग्रासलेल्या, भविष्यात मुलीला हुंडा द्यावा लागेल, प्रॉपर्टीत हिस्सा द्यावा लागेल किंवा मुलगी तोंड काळ करेल या भीतीने अनेक कुटुंबांनी लाखो स्त्री भ्रूणहत्या केल्या आहेत. डॉ.मुंडेंचं प्रकरण महाराष्ट्राला माहीत असेल. त्याच्या सारखे आणखी काही नराधम डॉक्टर महाराष्ट्राने पाहिले आहेत. हे प्रकार पूर्वी एवढे सर्रास नसले तरी आजही सुरू आहेत.
जॉब करणाऱ्या मुलींना त्यांच्यापेक्षा वरचढ कमाई करणारा पती हवा
बौद्ध आणि ईतर काही जातींमध्ये लग्न ही समस्या बनली आहे पण त्याचे स्वरूप वेगळे आहे. बौद्धांमधे मुलींचे सरासरी प्रमाण ठीक आहे पण मुलीचे सरासरी शिक्षण मुलांपेक्षा जास्त असल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. जॉब करणाऱ्या आणि करियरिस्ट मुलींना त्यांच्यापेक्षा वरचढ कमाई करणारा, मोठ्या हुद्द्यावरचा पती हवा असतो ही सुद्धा एक समस्या आहे. त्यामुळे हल्ली बौद्ध मुली आणि मुलांमधे मध्ये जातीत अनुरूप जोडीदार मिळाल्यास दुसऱ्या जाती समूहात लग्न करण्याचा कल वाढत आहे. शिवाय इतर जातींनी बौद्ध मुलींना स्विकारण्याचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. ही चांगली बाब आहे. काही ठिकाणी बौद्धांमधे मात्र आजही ठराविक जिल्ह्याबाहेर मुली दिल्या घेतल्या जात नाहीत ही एक वेगळीच समस्या आहे.
समस्येच्या मुळाशी जातीव्यवस्थाच
महाराष्ट्रातल्या शेतकरी जातींमध्ये हि समस्या तीव्र असण्याचे महत्वाचे कारण मुलींची सरासरी संख्या कमी असणे जसे आहे तसेच मागच्या काही दशकांत सरकारी धोरणे, हवामानातील बदलामुळे शेतीची झालेली दुरावस्था आणि जमिनीचे पिंढ्यांपिढ्या पडत जाणारे तुकडे,सुद्धा जबाबदार आहेत. या समस्येमुळे बहुसंख्य शेतकरी कुटुंबाचा कल हा नोकरदार आणि त्यातही सरकारी नोकरी असलेला जावई शोधण्याकडे वाढत आहे. मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे सुद्धा हि समस्या तीव्र बनली आहे. अर्थात मुलींनी जास्तीची अपेक्षा करण्यात काहीही चुकीचे नाही.दुसरीकडे हुंडा हि सुद्धा एक मोठी समस्या आहे. या समस्येमुळे गरीब घरातील सुशिक्षित मुलींचे विवाह जुळणे सुद्धा सहज शक्य होत नाही. हुंड्यासाठी, मुलीचे लग्न थाटामाटात करण्यासाठी कर्जबाजारी होणाऱ्यात या शेतकरी जाती आघाडीवर आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
मूळ समस्येपासून पळ काढत राहणार?
या समस्येची सुरवात जरी ९०च्या दशकांत झाली असली तरी या समस्येच्या मुळाशी शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या जातीव्यवस्था आहे. जातीच्या भिंती गळून पडल्या तर तरुणींना आणि तरुणांना अनुरूप जोडीदार लाभण्याची शक्यता अधिक वाढू शकेल.पण अश्या प्रकारचे आंतरजातीय विवाह स्वीकारायला कुटुंब तयार होत नाहीत याचे कारण समाजाचा, जातीचा दबाव. जाती बाहेर लग्न केलं तर समाज काय म्हणेल ही भीती. समाज वाळीत टाकेल, इज्जत जाईल ही भीती. गुजरात, हरियाणा मधले काही लोक दलालामार्फत महाराष्ट्रातल्या आदिवासी मुलींशी लग्न करत आहेत. या मुलींचं काम केवळ वंशाचा दिवा जन्माला घालणे एवढेच आहे. या मुलींना सासरवाडीला कोणताही मान सन्मान मिळत नाही. पण महाराष्ट्रासारख्या जरा प्रगत राज्यातल्या लोकांनी जर आपली बुरसटलेली जातीय मानसिकता सोडून दिली तर या समस्येवर काही प्रमाणात तोडगा नक्कीच निघू शकेल. शेवटी मुळावर घाव घालायला हवा. किती दिवस मूळ समस्येपासून पळ काढत राहणार?
(टीप – केरळ सारख्या सर्वाधिक सुशिक्षित राज्यात जिथे मुलींचे सरासरी प्रमाण सर्वाधिक आहे तिथे सुद्धा ही समस्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच मुख्य कारण तिथे दिला घेतला जाणारा प्रचंड हुंडा. केरळ मधे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या सगळ्या जातीत खुप मोठ्या प्रमाणात घेतला जातो. त्यामुळेच की काय आंतरराज्य लग्न करण्यात केरळी मुली सर्वात जास्त आघाडीवर आहेत असे माझे निरीक्षण आहे.)
भगवान बुद्धांच्या मूर्तीला भगव्या रंगाने रंगवण्यावरून वाद, प्राचार्यांचे स्पष्टीकरण
शाहरुख खान ला जीवंत जाळणार – महंत परमहंस ची धमकी
संत तुकाराम महाराज माझ्याकडे 22 वेळा आले – सुबोध भावे
प्रेम किंवा जातीबाहेर लग्न केल्यामुळे दरवर्षी अनेक हत्या – न्या.चंद्रचूड
मनोज गरबडे,शाई फेक ते जामीन,कोर्टात काय झालं? प्रत्येक घडामोड
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फासणारे मनोज गरबडे आहेत तरी कोण?
शाई फेक अन मारहाण नेत्यांना कधी कधी झाली ? जाणून घ्या.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 22,2022, 22:210 PM
WebTitle – Youth march in solapur for marriage