चिपळूण (प्रतिनिधी) : कोकणात महाप्रलयकारी पावसाने हाहाकार माजवून गंभीर पुरस्थिती निर्माण झाल्याने तसेच दरड दुर्घटनेमुळे जीवीतहानी होऊन सर्व जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्याने अनेकांचे संसारच उध्वस्त झाले होते.कोकणावर ओढवलेल्या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत.चिपळूण येथील पुरग्रस्तांना मदत देण्यासाठी महिला बचत गटांनी सुद्धा पुढकार घेतला आहे.
कोकणातील चिपळूण शहरामध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.अत्यंत बिकट परिस्थिती मध्ये लोक जिवंत राहण्यासाठी जीव मूठीत धरून लढा देत आहेत.गुरंढोरं, घरातलं सामान पूरसोबत वाहून गेलंय.तेथील स्थानिक प्रशासन लोकांपर्यंत मदत पोहचवण्याचा प्रयत्न हे महिला बचत गट करीत आहेत.
सर्व महिलांनी सहकार्याचा हात देत, माणुसकी अजून जिवंत आहे हे दाखवून दिले
मिरा भाईंदर महानगरपालिका, दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) अंतर्गत, मागच्या वेळी सांगली पुरग्रस्थांच्या मदतीसाठी जसा सर्व ALF, बचत गटांनी पुढाकार घेतला व एक ट्रक सामान सांगलीला पाठवण्यात आले.तसाच पुढाकार आताही या सर्व महिलांनी घेत माणुसकी अजून जिवंत असल्याचे दाखवून दिले.
बचत गटातील सर्व महिलांनी मदतीचा हात पुढे करत फुल ना फुलाची पाकळी च्या स्वरूपात चिपळूण पुरग्रस्तांना त्यांच्या कुटुंबांसाठी,
महिलांसाठी साड्या,कपडे,ब्लाउज,पेटिकोट,पॅन्ट,शर्ट,लहान मुलांचे कपडे,चादर,धान्य असे सामान एकत्र करून मदतीचा हात पुढे केला.
सदर, कार्यासाठी शहर स्तर संघाच्या अध्यक्ष सौ.अस्मिता रोकडे, सचिव, खजिनदार व सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला
व सर्व सामान एकत्र करण्याचे तातडीने आयोजन केले.सदर मदत दि.30/7/2021 पर्यंत जमा झाली. व 5/8/2021 रोजी पुरग्रस्तांपर्यंत पोहचविण्यात आली.
मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत स्थापन “मिरा भाईंदर शहर स्तर संघाला CLF” सामाजिक भान जपणाऱ्या, धडाडीच्या अध्यक्षा सौ.अस्मिता रोकडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तीन दिवसाच्या प्रवासात आपण चिपळूण-खेड पूरग्रस्त स्थितीत सापडलेल्या दोन गावात 7-8 ठिकाणी आपलं 3 टन साहित्य प्रत्येकाच्या हातापर्यंत पोहचवलं.सदर कार्यात कांदिवली विकास फौंडेशन व उषा किरण वेलफेअर सोसायटी चे विशेष सहकार्य लाभले.
या सात गावांमध्ये मदत देण्यात आली. १ कळंबस्ते २ खांडात ३ रॉयर नगर ४ बावशेवाडी ५ चिपळूण नगरपालिका ६ पेठ माप ७ पोसरे (खेड तालुका)
कोकणातील पुरग्रस्तांना अस्तित्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून अत्यावश्यक वस्तूंचे वाटप..
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 10, 2021 23:40 PM
WebTitle – Women’s self-help groups give a helping hand to the Chiplun flood victims