रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?
हवामान खात्याने पुढील तीन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केल्याने शहरामध्ये रेड अलर्ट जारी केला असून संबंधित यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आलंय.मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे बुधवारपासून शनिवारपर्यंत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केलीय. काही ठिकाणी तर ३०० मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने प्रशासनाला आणि यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिलेत.
हवामान खात्याकडून जारी करण्यात येणाऱ्या या अलर्ट चा अर्थ काय असतो? रेड अलर्ट म्हणजे काय? तो का, कधी, कसा जारी करतात? त्याचा अर्थ काय होतो हे अनेकांना ठाऊक नसते त्याचाच घेतलेला हा आढावा.
रेड अलर्ट:
रेड अलर्ट म्हणजे मोठी नैसर्गिक आपत्तीची शक्यता. नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर किंवा ओढवण्याची शक्यता असल्यास एखाद्या विशिष्ट भागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट जारी करण्यात आलेल्या प्रदेशातील स्थानिक प्रशासन, आपत्कालीन यंत्रणांनी अधिक सतर्क रहाणं गरजेचं असतं. संकट अधिक धोकादायक, तीव्र असल्यास, सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्यास रेड अलर्ट देण्यात येतो. याचा अर्थ नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि स्वत:सह इतरांना सुरक्षित ठेवावं.
ऑरेंज अलर्ट:
कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते आणि त्यासाठी नागरिकांना सतर्क करण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये वीजपुरवठा खंडीत होणे, वाहतूक ठप्प होणे असे प्रकार होऊ शकतात. तसंच ऑरेंज अलर्टमध्ये गरज असल्यासच बाहेर पडा, असे देखील सांगितले जाते.
यलो अलर्ट:
हवामानातील बदलांमुळे पुढील काही दिवसांत संकट ओढवण्याची शक्यता असल्यास यलो अलर्ट जारी केला जातो.
या संकटामुळे दैनंदिन कामावर परिणाम होण्याची शक्यता असते.त्यामुळे सावधगिरीचा इशारा देण्यासाठी यलो अलर्ट दिला जातो.
ग्रीन अलर्ट:
कोणत्याही संकटाची चाहुल नाही. सर्व काही सुरळीत आहे, हे दर्शवणारा ग्रीन अलर्ट असतो. तसेच पूर्वी जारी केलेला येलो, ऑरेंज किंवा रेड अलर्ट मागे घेण्यासाठी ग्रीन अलर्ट जारी केला जातो.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
प्रत्येकाच्या घरी असावं ऑक्सीमीटर
First Published on JUN 11 , 2021 18 : 05 PM
WebTitle – What exactly are Red, Orange and Yellow Alerts? 2021-06-11