भाजपने निलंबित केलेल्या भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर युएईमधील काही देशांना भारताबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी, कचऱ्याच्या गाडीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा फोटोही लावण्यात आला होता. या फोटोवरुन संपूर्ण भारताने युएईतील देशाचा विरोध केला. देशाच्या प्रधानमंत्र्यांचा हा अपमान कधीही सहन केला जाणार नाही, असे म्हणत सर्वच राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध नोंदवला होता. आता, पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो कचरा वेचणाऱ्या गाडीत दिसून आला. विशेष म्हणजे ही घटना मुथरा येथील आहे.
मथुरा-वृंदावन महापालिका कार्यालयाजवळील सुभाष इंटर कॉलेजजवळ
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो कचऱ्यात फेकण्यात आले.
शनिवारी कचरा कुंडीत हे चित्र समोर आल्यानंतर महापालिकेत घबराट निर्माण झाली होती.
याप्रकरणी कंत्राटी सफाई कामगाराची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटी सफाई कामगार दुलीचंद हा कचरा उचलत होते. कचरा उचलत असताना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात त्यांना काही प्रतिमा आढळून आल्या.त्यांनी त्या कचरा जमा करणाऱ्या गाडीत ठेवल्या. या प्रतिमा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या असल्याचे आढळून आले. कुणीतरी त्या कचऱ्यात फेकल्या होत्या. येथून जात असलेल्या राजस्थानमधून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने यूपीतील मथुरा-वृंदावनला भेट देण्यासाठी आलेले अल्वरचे डॉक्टर पंकज गुप्ता, अश्विनी जावली आणि नरेश धनावत यांनी सदर सफाई कामगाराला अडवले. आणि माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर त्यांनी सफाई कर्मचारी दुलीचंद यांच्याकडून ते फोटो घेतले.दुलीचंद म्हणत राहिले की हे फोटो त्यांना कचरा गोळा करताना सापडले,ते जमा करून घेऊन जात होतो,त्यानंतर स्थानिक पैकी एक व्यक्ती अमर सिंग यांनी ते दोन्ही फोटो बाजूच्या नळावर धुतले,आणि डॉक्टर पंकज गुप्ता यांच्या हवाली केले.डॉक्टर पंकज गुप्ता हे फोटो त्यांच्या ऑफिस मध्ये लावणार असल्याचे कळते.
सफाई कर्मचाऱ्याला दोषी मानून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे सफाई कर्मचाऱ्याला दोषी मानून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.याप्रकरणी अतिरिक्त महापालिका आयुक्त सत्येंद्र तिवारी यांचा एक व्हिडिओही महापालिकेने प्रसिद्ध केला आहे. व्हिडिओमध्ये अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी सांगितले की, शनिवारी सुभाष इंटर कॉलेजजवळ मथुरा-वृंदावन महापालिकेचे कंत्राटी सफाई कर्मचारी दुलीचंद कचरा उचलत होते, ज्यामध्ये प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र दिसले.त्यावेळी स्थानिक जनतेने अडवले. तेव्हा सफाई कामगाराला कळले की त्याच्याकडे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र आहे. हे चित्र सफाई कामगाराने तातडीने कचऱ्यातून हटवले. या कृतीतून सफाई कामगाराचा निष्काळजीपणा दिसून येतो. कंत्राटी सफाई कर्मचारी दुलीचंद वर तत्काळ कारवाई करत मथुरा-वृंदावन महानगरपालिकेने त्यांची सेवा समाप्त केली आहे. मथुरा-वृंदावन महानगरपालिका कंत्राटी सफाई कामगाराने केलेल्या निष्काळजीपणाचा तीव्र निषेध करते.असे तिवारी यांनी व्हिडिओत म्हटलंय.
सफाई कामगाराने कचऱ्यातून प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे काढली असावीत, मात्र कार्यालयात ठेवण्याऐवजी कचऱ्याच्या ट्रॉलीत घेऊन जात असल्याचे लोकांनी सांगितले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली.
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
दलित आणि उपेक्षित लोकांमध्ये स्वार्थी लोकांची कमतरता नाही – मायावती
मुलगा होण्याचा नवस पूर्ण वडिलांनी मंदिरात नेऊन तरुणाचा नरबळी दिला
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 17, 2022, 20:42 PM
WebTitle – Video: Photo of PM Modi CM yogi in Garbage Car, cleaning staff sacked