खाद्यपदार्थात भेसळ करण्याचे अनेक प्रकार समोर येत असतात,देशातील जनतेच्या आरोग्याशी खेळून भरघोस नफा कमवण्याचे षडयंत्र अनेकदा उघडकीस आले आहेत.दुधापासून तेला पर्यन्त डाळींपासून पिठा पर्यंत ते मसाला पावडर मध्येही लाकडाचा भुसा लाल रंग देवून विकला जातो.मात्र आता गाढवाची लीद देखिल यात मिसळला जात असल्याची धक्कादायक आणि तेवढीच किळसवाणी घटना समोर आली आहे.गाढवाच्या लीद पासून खाण्याचा मसाला बनवणाऱ्या हिंदू युवा वाहिनीच्या नेत्यास अटक करण्यात आली आहे.
गाढवाच्या लीद पासून खाण्याचा मसाला
युपीमधल्या (up) हाथरस इथं पोलिसांनी (up police) सोमवारी रात्री एका कारखान्यात छापा मारला. नकली मसाल्यांचं मोठं रॅकेटच इथं उघडकीस आलं.या कारखान्यातले लोक स्थानिक ब्रँड उभा करण्याच्या नावाखाली नकली मसाले बनवत होते.धक्कादायक अन किळसवाणं म्हणजे भेसळ करण्यासाठी त्यात चक्क गाढवाची लीद,ऍसिड आणि भुसा यांचा वापर मसाला बनविण्यासाठी केला जात होता.
पोलिसांनी मारलेल्या छाप्यामध्ये 300 किलोग्रॅमहून अधिक मसाला जप्त करण्यात आला आहे. नकली मसाला कारखान्याचा मालक अनूप वाष्णेर्यला पोलिसांनी अटक केली असून तो ‘हिंदू युवा वाहिनी’च्या मंडल प्रहरी पदावर आहे.हिंदू युवा वाहिनी ही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी स्थापन केलेली आहे. हाथरसच्या नवीपूर भागातल्या या कारखान्यावर छापा मारल्यावर तेथे धणे पावडर ,मिर्ची पावडर अशा अनेक मसाल्यांची पाकिटं सापडली. सोबतच मसाल्यांचा मोठा साठाही विक्रीसाठी ठेवलेला होता.
पोलिसांनी मसाल्याचे 27 नमुने परिक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
संयुक्त न्यायाधीश प्रेम प्रकाश मीणा यांनी सांगितलं,
की कारखान्याचा मालक वाष्णेर्यला सीआरपीसी कलम 151 अंतर्गत न्यायिक कोठडीत पाठवलं आहे.
परिक्षणाचे नमुने आल्यानंतर ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यां’तर्गत गुन्हा नोंदवला जाईल.
त्यांनी सांगितलं, की बऱ्याच काळापासून येत असलेल्या तक्रारीच्या आधारे फुड इन्स्पेक्टरला सोबत घेऊन ही कारवाई केली गेली.
कॉर्पोरेट्स शेती : कॉर्पोरेट्स कंपन्या चा भारतीय शेती वर डोळा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)