उत्तरप्रदेश : बुधवार, 20 डिसेंबर रोजी सकाळी उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथील जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या गोदामाला आग लागली. फतेहगढ परिसरात असलेल्या एका गोदामात ठेवण्यात आलेल्या 800 ईव्हीएम 800 EVM मशिन जळून खाक झाल्याची भीती वर्तवली जात आहे.UP Farrukhabad 800 EVM burned सदर आग काही तासांनंतर आटोक्यात आणून विझवण्यात आली.कार्यालयात आग लागल्याची बातमी येताच एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच फारुखाबाद अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
800 EVM जळून खाक? मेनस्ट्रीम मिडियात मात्र बातमी दिसेना
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निवडणूक कार्यालयाची इमारत आहे. इमारतीला आग लागल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे. या भीषण आगीमुळे इमारतीतील सरकारी कागदपत्रे जळून खाक होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या मतदार यादीसह निवडणुकीसंबंधीची कागदपत्रे कार्यालयात ठेवण्यात आली आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. या संपूर्ण प्रकरणी अग्निशमन अधिकारी विजय प्रकाश त्रिपाठी यांनी सांगितले की, फारुखाबाद निवडणूक कार्यालयात आग लागल्याची माहिती मिळाली.माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. भीषण आगीमुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी कार्यालयाची भिंत तोडून आत प्रवेश केला. मात्र, अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणून विझवण्यात आली. आगीचे कारण शोधण्यासाठी तपास करण्यात येत आहे.
अर्धवट जळालेल्या नारळाचे तुकडे सापडले, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
वृत्तवाहिनी द क्विंट ने याबाबत वृत्त दिले आहे.आग विझवल्यानंतर गोदामातील काही ठिकाणी सुक्या नारळाच्या साली अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यावर काही रासायनिक पदार्थ टाकून भिझवले गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर कोणीतरी आग लावली असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अर्धवट जळालेल्या नारळाच्या सालींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
विरोधी पक्ष नेते अखिलेश यादव यांनी संशय व्यक्त करत ट्विटरवर (X वर) ट्विट करत म्हटलंय की
“फारुखाबादमध्ये 800 ईव्हीएम जळाले… शॉर्ट सर्किट न करता आग लागल्याने शंका व्यक्त होत आहे.”
शहर दंडाधिकारी सतीश चंद्र यांनी सांगितले की, आगीचे कारण तपासले जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर सुरक्षित ठेवण्यास सांगितले आहे. या गोदामात जवळपास 800 ईव्हीएम 800 EVM मशिन होत्या.धक्कादायक म्हणजे या गोदामात विद्युत लाईन बसविण्यात आली नव्हती. त्यामुळे जाणीवपूर्वक आग लावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपास अधिकारी आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी तपास करतील
माहिती देताना फारुखाबादचे अतिरिक्त जिल्हा अधिकारी म्हणाले की, संपूर्ण प्रकरणाचा तपास सिटी मॅजिस्ट्रेटच्या अध्यक्षतेखालील इलेक्ट्रिकल सेफ्टी आणि सीएफओच्या टीमकडे सोपवण्यात आला आहे. तपास सुरू आहे. वस्तुस्थिती समोर आल्यानंतर कारवाई केली जाईल. या गोदामात जवळपास 800 ईव्हीएम 800 EVM मशिन होत्या.आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आगीमुळे 34 VU, 149 VVPAT आणि 78 CU चे नुकसान झाले आहे.
सीओ सिटी सतेंद्र सिंह म्हणाले की,
पोलिसांकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही, तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करून पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
न्यायालयात सुनावणी सुरू असताना घटना घडल्याने संशय व्यक्त केला जात आहे
EVM मशिन निवडणुकांमध्ये वापरण्याच्या संबंधी न्यायालयात सुनावणी सुरू असताना घटना घडल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
हे प्रकरण न्यायालयात नेणारे एड.नरेंद्र मिश्रा यांनी न्यूजलॉंचर या वृत्तवाहिनीशी बोलताना अनेक गंभीर आरोप केले आहेत.
खालील व्हिडिओ नक्की पहा.स्क्रीनवर मध्ये टच करा.व्हिडिओ सुरू होईल.
धक्कादायक : ‘पक्षातून काढलं तर घोटाळे उघड करीन,’ भाजप नेते बसनगौडा यांची जाहीर धमकी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 29,2023 | 11:08 AM
WebTitle – UP Farrukhabad 800 EVM burned