मुंबई:संसदेत संविधानावर झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील केलेल्या विधानावर राजकीय वातावरण तापले आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे.
आंबेडकरांवरील विधानावर उद्धव ठाकरेंचा सवाल
उद्धव ठाकरे म्हणाले, “अमित शाह काल राज्यसभेत ‘आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर’ म्हणत होते. पण तुम्ही कोण आंबेडकरांचा असा उल्लेख करणारे? बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत आणि त्यांचा अपमान आम्हाला कदापि मान्य नाही. भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमित शाह यांच्यावर कारवाई करणार आहे का?”
भाजपला पाठिंबा देणाऱ्यांना विचारायचं आहे – उद्धव
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ”ज्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे, त्यांना हे मान्य आहे का? अमित शाह यांनी केलेली ही ‘गुस्ताखी’ मला तरी वाटत नाही की त्यांनी स्वतःहून केली असेल. पंतप्रधानांनी स्वतः त्यांना हे बोलायला सांगितलं का, हे स्पष्ट केलं पाहिजे. मी कोण आहे पंतप्रधानांकडे काही मागणी करणारा? पण त्यांनी यावर भूमिका स्पष्ट केली पाहिजे.”
“भाजपचे हिंदुत्व म्हणजे मुखात राम, पण बगलेत छुरी”
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वावरही टीका केली. ते म्हणाले, ”अमित शाह यांचे हे मत आहे की संपूर्ण भाजप परिवाराचे मत आहे? भाजपचे हिंदुत्व म्हणजे ‘मुखात राम, पण बाजूला छुरी.’ महाराष्ट्रात भाजपला वाटतं काहीही चालेल, काहीही तोडा-फोडा आणि गुजरातमध्ये नेऊन मिळवा. ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा विचार सोडा, आधी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाल्याबद्दल चर्चा करा.”
अमित शाह यांनी काय म्हटलं होतं?
राज्यसभेत मंगळवारी (17 डिसेंबर) अमित शाह यांनी विरोधकांवर हल्ला करताना म्हटलं होतं, ”आजकाल लोकांना आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर म्हणायचं फॅशन झालं आहे. जर इतक्यांदा देवाचं नाव घेतलं असतं, तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता.”
विरोधकांनी याच विधानावरून अमित शाह यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
पण अमित शाह पुढे म्हणाले होते, ”आम्हाला आनंद आहे की लोक आंबेडकर यांचं नाव घेतात. 100 वेळा अधिक घ्या, पण आंबेडकरांप्रती तुमचं खरं भाव काय आहे, ते मी सांगतो. आंबेडकरांना देशाच्या पहिल्या कॅबिनेटमधून राजीनामा द्यावा लागला होता. कारण त्यांनी अनुसूचित जाती-जमातींवरील भेदभाव, परराष्ट्र धोरण, आणि कलम 370 यावर तीव्र असहमती व्यक्त केली होती. दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला.”
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 18,2024 | 16:35 PM
WebTitle – uddhav-thackeray-questions-amit-shah-ambedkar-statement
#UddhavThackeray #AmitShah #Ambedkar #ParliamentDebate #BJP #RSS #Constitution