भारतात ट्विटर ला दिलेले कायदेशीर संरक्षण कवच आता संपले आहे. (Twitter’s legal protection) आयटी कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत ट्विटरला हे कायदेशीर संरक्षण मिळाले होते. या कायद्याने ट्विटरला कोणतीही कायदेशीर कारवाई, मानहानि किंवा दंडापासून सूट दिली होती. कायदेशीर संरक्षण संपताच ट्विटरविरूद्ध पहिला गुन्हा उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये दाखल झाला आहे.इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी सांगितले की, 25 मेपासून लागू झालेल्या नवीन आयटी नियमांचे ट्विटर ‘पालन करण्यास अपयशी ठरले’ आहे.
‘जय श्रीराम’ म्हणण्यासाठी गाझियाबादमध्ये एका वृद्धाला मारहाण केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. हा व्हीडीओ खोटा असल्याचे उघड झाले आहे. यामुळे ट्विटर विरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी ट्विटरशिवाय आणखी नऊ जणांवर याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
बनावट व्हिडिओद्वारे ट्विटरवर धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप आहे. केंद्र सरकारने ट्विटर चे कायदेशीर संरक्षण कवच संपुष्टात आल्याबद्दल कोणताही आदेश जारी केला नाही. सरकारने केलेल्या नियमांचे पालन न केल्याने हे कायदेशीर संरक्षण आपोआपच २५ मे रोजी संपुष्टात आले आहे, असे सांगितले जात आहे.
अखेर ट्विटरने नेमले अनुपालन अधिकारी
सरकारने ट्विटरला नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांचे पालन करण्यासाठी अखेरची संधी देत असल्याची नोटीस पाठविली होती.
निकषांचे पालन न केल्यास या व्यासपीठाला दायित्वातून देण्यात आलेल्या सवलतीला मुकावे लागेल, असा इशारा देण्यात आला होता.
त्यानंतर नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांनुसार मुख्य अनुपालन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे आश्वासन ट्विटरने सरकारला दिले होते.
आता ट्विटरने अंतरिम प्रमुख अनुपालन अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून
त्याबाबतचा तपशील लवकरच माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयास देण्यात येणार असल्याचे ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले.
नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा कंपनी प्रामाणिक प्रयत्न करत आहे, असे ट्विटरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 16 2021 at 11:24 AM
WebTitle – twitter-failed-to-comply-with-new-it-rules-says-ravi-shankar-prasad-2021-06-16