लोकसभा निवडणुकीला जवळपास एक वर्ष उरले असून, त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. RSS-संलग्न मुस्लिम राष्ट्रीय मंचने अल्पसंख्याक समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी देशव्यापी मोहीम आखली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक राष्ट्र, एक ध्वज, एक राष्ट्रीय गीत मोहीम राबविणार असल्याचे सांगितले.याचसोबत सच्चे मुस्लिम-अच्छे मुस्लिम हा नविन अजेंडा प्लॅन देखील राबवला जाणार आहे.
मुस्लिम राष्ट्रीय मंचाची मोहीम
एका हिंदी वृत्त माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार मुस्लिम राष्ट्रीय मंच या आरएसएसशी संलग्न संघटनेने सच्चे मुस्लिम-अच्छे मुस्लिम अभियान जाहीर केले आहे. ही मोहीम देशभर चालवली जाणार असून अल्पसंख्याकांना त्याच्याशी जोडले जाणार आहे.या मोहिमेअंतर्गत 8 ते 11 जून दरम्यान मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या स्वयंसेवकांची बैठक होणार असून, त्यात या मोहिमेची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. त्यात आरएसएसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांचाही समावेश असेल, जे मुस्लिम राष्ट्रीय मंचचे निमंत्रकही आहेत.
गाझियाबाद, यूपी येथे झालेय ट्रेनिंग
यापूर्वी 2021 मध्ये यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी गाझियाबादमध्ये अशाच प्रकारचे ट्रेनिंग/प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
त्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघ चालक मोहन भागवत देखील सहभागी झाले होते.
याशिवाय सरचिटणीस कृष्णगोपाल आणि रामलालही कार्यक्रमात सहभागी झाले होते.
मुस्लिम नॅशनल फोरमचे प्रवक्ते शाहिद सईद म्हणाले की,
2024 च्या निवडणुकीपूर्वी मुस्लिम राष्ट्रीय मंच देशव्यापी मोहीम राबवणार आहे. ज्याची थीम असेल सच्चे मुस्लिम अच्छे मुस्लिम.
अखिलेश यादव यांनीही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही पक्ष कार्यकर्त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यास सांगितले आहे. भाजपने लोकसभा निवडणुकांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर तयारी सुरू करावी, असे अखिलेश यादव म्हणाले. अखिलेश यादव यांनी पक्षाचे आमदार आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली असून, त्यात लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली आहे. यासोबतच लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याचेही सांगण्यात आले आहे.
समीर वानखेडे ड्रग्ज प्रकरणी 25 कोटी खंडणी अन भाजप चे दोन मोहरे ?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on 18, MAY 2023, 11:36 AM
WebTitle – ‘True Muslims-Good Muslims’ ; Election 2024: RSS’s new plan