बागलकोट – कर्नाटकात अनेकदा वादात अडकलेले श्री राम सेनेचे (Sri Ram Sena) प्रमुख प्रमोद मुथालिक (Pramod Muthalik) यांनी लव्ह जिहाद (love jihad) चा बदला घेण्यासाठी हिंदू तरुणांना 10 मुस्लिम मुलींना फसवण्याचे खुले आव्हान दिले आहे. असे करणाऱ्यांना सुरक्षा आणि रोजगार देण्याचे धक्कादायक आश्वासनही मुथालिक यांनी दिले आहे,यामुळे एकच खळबळ उडाली आहे.कर्नाटकातील बागलकोटमध्ये लोकांच्या गर्दीत भाषण करताना प्रमोद मुथालिक म्हणाले की, ‘आजही परिस्थिती तशीच आहे. लव्ह जिहादमध्ये आमच्या मुलींचे शोषण होते. प्रेमाच्या नावाखाली देशभरात हजारो मुलींची फसवणूक होत आहे. आपण त्यांना सावध केले पाहिजे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कर्नाटकातील बागलकोट येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना मुथालिक म्हणाले की, आम्हाला परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. मी इथल्या तरुणांना आमंत्रण देऊ इच्छितो की जर आपण एक हिंदू मुलगी गमावली तर आपण 10 मुस्लिम मुलींना फसवले पाहिजे.असे केल्यास श्री राम सेना तुमची जबाबदारी घेईल आणि सर्व प्रकारची सुरक्षा तसेच रोजगार देईल.
‘देशभरात आमच्या मुलींचे शोषण होत आहे’
ते पुढे म्हणाले की, संपूर्ण देशात लव्ह जिहादच्या माध्यमातून आमच्या मुलींचे शोषण केले जाते.
प्रेमाच्या नावाखाली देशभरात हजारो मुलींची फसवणूक होत आहे. आपण त्यांना सावध करू असे तो म्हणाला.
सुमारे आठवडाभरापूर्वी मुथालिक यानी सांगितले की, त्यांच्याविरुद्ध आतापर्यंत 109 गुन्हे दाखल झाले आहेत.
आणि त्यापैकी बहुतांश भाजपच्या राजवटीत नोंदवण्यात आले आहेत.
भाजपकडून आर्थिक मदत
हिंदुत्वाबाबतच्या भूमिकेमुळे आपल्याला आपल्याच लोकांकडून समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा दावा त्यांनी केला होता.
कर्नाटकात या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.अशा परिस्थितीत मुथालिक हे
उडुपीतील करकला मतदारसंघातूनही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
मुथालिक पुढे म्हणाले की, भाजपच्या काही नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे आणि निवडणूक लढवण्यासाठी आर्थिक मदत देऊ केली आहे.
वादग्रस्त विधानांमुळे प्रमोद मुथालिक सतत चर्चेत असतात
प्रमोद मुथालिक अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. याआधीही त्यांनी अशी अनेक विधाने केली आहेत, ज्यावरून वाद निर्माण झाला होता.गेल्या वर्षी शिवमोग्गा येथे वीर सावरकरांचे पोस्टर लावण्यावरून झालेल्या गदारोळावरही त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. वीर सावरकरांच्या पोस्टरला कोणी हात लावला तर त्याचे हात कापले जातील, असे मुथालिक म्हणाले होते. धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी तलवार घरात ठेवली पाहिजे तसेच तिची पूजा केली पाहिजे,असंही त्यांनी म्हटलं होतं,तसेच,जर पोलिस तुमच्याकडे आले आणि तलवार ठेवण्याबद्दल विचारले तर लोकांनी त्यांना म्हटलं पाहिजे की तुम्ही हिंदू देवता दुर्गा माँ, काली माँ, हनुमान जी आणि भगवान श्री राम यांच्यावर गुन्हे दाखल करा.
पत्रकार आणि समाजसेविका गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी श्री राम सेनेचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रमोद मुथालिक यांनी वादग्रस्त विधान केले आहे. मुथालिक यांनी लंकेश यांच्या हत्येची तुलना कुत्र्याच्या मृत्यूशी केली होती. लंकेश यांच्या हत्येवर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याबद्दल प्रधानमंत्री मोदींवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधत ते म्हणाले, कर्नाटकात कुत्राही मेला तर त्यालाही प्रधानमंत्री मोदी जबाबदार आहेत का?
व्हॅलेंटाईन डे,बजरंग दल च्या गुंडांना लोकांनीच पळवून पळवून मारलं
Nikki Yadav Murder :निक्की यादव चा खून,फ्रीजमध्ये मृतदेह;संपूर्ण प्रकरण
डॉ.आंबेडकर जीवंत असते तर गोळ्या घातल्या असत्या – हमारा प्रसाद ला अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 20,2023 18:00 PM
WebTitle – “Trap 10 Muslim girls in exchange for one Hindu girl, we will give you security and job” Pramod muthalik sri ram sena