कोरोना मुळे जगभरात हाहाकार उडलेला असताना सरकारी पातळीवर केल्या गेलेल्या उपाय-योजना आपण “अनुभवल्या” आहेत,आता नवा कोरोना स्ट्रेन जो अगोदरपेक्षा जास्त घातक असल्याचे बोलले जात आहे.
- व्यंगचित्रकार सुभाष कदम
कोरोनाचा कहर पुन्हा सुरू ; या ठिकाणी 7 दिवसांचा कडक लॉकडाउन
देशात आणि राज्यात कोरोनाची ( Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट ओसरल्याने अनलॉक (Unlock) जाहीर करण्यात आला.
लोक पुन्हा मोठ्याप्रमाणावर बाहेर पडले.पाच टप्यामध्ये हा अनलॉक जाहीर करण्यात आला होता.
मात्र, आता पुन्हा केसेस वाढू लागल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.
गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे.त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आता बारामतीमधील ( Baramati ) काटेवाडी गावात सात दिवसांसाठी लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आलाय. गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं गावकऱ्यांनी एकत्र येत सात दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील 7 दिवस गाव शंभर टक्के बंद राहणार आहे. दोन दिवसापूर्वी गावांमध्ये अँटीजेन कॅम्प घेतला होता त्यावेळी 27 रुग्ण आढळल्याने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. (Lockdown announced for seven days in Katewadi village in Baramati)
देशातही वाढतेय रुग्ण संख्या
दरम्यान, दुसऱ्या लाटेनंतर आता राज्यावर डेल्टा प्लसचं संकट घोंगावू लागलंय.डेल्टा प्लस कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे चिंतेचे वातावरण आहे. डेल्टा प्लस मुळे तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळले. गेल्या २४ तासात ५१ हजार ६६७ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तर १३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुjवारी देशात ५४ हजार ६९ कोरोना बाधित आढळले होते.
आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ५१.६६७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले. तसेच १,३२९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ६४,५२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ६,१२,८६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
कॉर्पोरेट्स शेती : कॉर्पोरेट्स कंपन्या चा भारतीय शेती वर डोळा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)