स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली देशाला,आपल्याला गुलाम करणारे इंग्रज गेले.आपण स्वतंत्र आहोत.आपल्याकडे स्वतंत्र राज्यघटना आहे. आपल्या सर्वांना समान अधिकार आहे.परंतु आजही देशात धार्मिक खुळचट अमानवी प्रथा पाळल्या जात असून माणुसपण नाकारण्याचे पाप त्यातून सतत घडत असतेच.गुलामीची ही व्यवस्था समूळ निघाली नाही.जात व्यवस्था हा देशाला झालेला कॅन्सर आहे.त्यातून देशातील जनता कधी स्वतंत्र होणार हा आजच्या तरुण पिढीसमोरील मोठा प्रश्न आहे.स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर दलित नवरदेव घोड्यावर बसला.देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली.1985 साली सुप्रसिद्ध दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांचा “गुलामी” नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला.अस्पृश्यता उच्च नीच भेदभाव यावर हा चित्रपट भाष्य करतो.तुम्हाला कदाचित लगेच चित्रपट आठवणार नाही,त्यातील गाणे सांगितलं की लगेच आठवेल.ते लोकप्रिय आहे.
ज़े-हाल-ए-मिस्कीं, मकुन-ब-रन्जिश,बहाल-ए-हिज्र बेचारा दिल है
सुनाई देती है जिसकी धड़कन तुम्हारा दिल या हमारा दिल
हे गाणं तुम्हाला लक्षात आलं असेल.हाच तो चित्रपट धर्मेंद्र,मिथून, कुलभूषण खरबंदा नसरुद्दीन शाह यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट.
या चित्रपटात धर्मेंद्र यांची मध्यवर्ती भूमिका आहे.धर्मेंद्र (रंजीत) यांचे वडील सालगडी शेतमजूर असतात.लहान असताना, शिक्षण घेत असताना धर्मेंद्रला इतर विद्यार्थ्यांच्या पासून वेगळे बसण्याची सूचना शिक्षक करतात.ठाकूरची मुलगी स्मिता पाटील धर्मेंद्रच्या प्रेमात पडते.ती हटकून त्याच्या शेजारी बसते.मास्तर ओरडतात.खरतर घाबरतात,म्हणतात तू त्याच्याबाजूला बसू नको,तुमची जागा पुढे आहे.तुझ्या घरी बडे ठाकूर ना हे समजलं तर माझी काही खैर नाही.शाळेत तीचे मामे भाऊ सुद्धा असतात,ते म्हणतात आम्ही तर सांगणार आहोत काय झालं.
त्यातच पुढचा प्रसंगात धर्मेंद्रला सामाईक माठातले पाणी पिऊ दिले जात नाही,त्यावरून भांडण होतं,धर्मेंद्र त्या तिघांची धुलाई करतो.ही गोष्ट ठाकूरला समजते.ठाकूरचे नोकर धर्मेंद्रला पकडून त्याच्याकडे घेऊन येतात.ठाकूर धर्मेंद्रला काठीने झोडपत असतो.तेवढ्यात त्याची आई.(मराठी अभिनेत्री सुलोचना) येते,तिच्या गळ्यात दागिने आणि पायात चप्पल असते,ठाकूर भडकतो आणि तू गळ्यात दागिने आणि पायात चप्पल घालून राजवाड्यात आलीच कशी म्हणून ओरडतो,पायातील चप्पल डोक्यावर ठेवायला सांगतो.धर्मेंद्र ची आई (सुलोचना) पायातील चप्पल डोक्यावर घेतात.ठाकूर धर्मेंद्रला म्हणतो तू काय रोखून बघतोस? भिंतीवर देवीचा फोटो असतो,धर्मेंद्र म्हणतो मी बघतोय एका आईच्या चरणी फुले आहेत आणि एका आईच्या डोक्यावर चप्पल आहे.सुलोचना मुलाला घेऊन जातात.या प्रसंगातून चित्रपटातील जातवास्तव टोकदारपणे अधोरेखित होते,पुढचा प्रसंग हा या लेखाचा मुळ संदर्भ आहे.
कुलभूषण खरबंदा (गोपी हवालदार) गावातील पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असतात,त्यांनी वीस वर्षे पोलिस खात्यात सरकारी सेवा केली आहे.असे असताना त्यांच्या मुलाच्या लग्नाच्यावेळी मुलाला घोड्यावर बसून वरात काढू दिली जात नाही, ठाकूरची जातीयवादी मुलं भडकतात.वरात अडवली जाते.ठाकूरचा मुलगा रागाने म्हणतो,तुझी जात विसरलास का? उतर तुझ्या मुलाला घोड्यावरून.आणि पायी चालत घेऊन जा,गोपी हवालदार म्हणतो,माझा मुलगा लग्न करतोय,तो घोड्यावरच जाईल..ठाकूरचा दूसरा मुलगा म्हणतो जिद्द करू नको परिणाम वाईट होतील, गोपी हवालदार म्हणतो..मी वीस वर्षे पोलिस खात्यात काम केलं आहे मला कायदा चांगला कळतो.वरात अडवू नका,माझा मुलगा घोड्यावरच जाणार..
त्यावर ठाकूरचा मुलगा म्हणतो,हे कायदे कानून कोर्टात सांगायचं,इथं ते चालणार नाही,इथं तेच चालेल जे अनेक वर्षापासून चालत आलं आहे.ठाकूर सोबत पोलिस स्टेशनचे अधिकारी मिळालेले असतात.गोपी त्यांना आवाहन करून बघतो,ठाणेदार साहेब,तुम्ही यांना कायदा काय आहे सांगा,त्यावर ठाणेदार साहेब म्हणतात ठाकूर बरोबर बोलत आहे,तुमचा मुलगा इथून घोड्यावर बसून नाही जाऊ शकत.हीच प्रथा आहे.तुम्हाला हे माहीत आहे की तुमच्या जातीतील लोकांना घोड्यावर बसण्याचा कोणताही अधिकार नाही.गोपी यावेळी संतापून म्हणतात प्रथा सोडा,तुम्ही कायदा काय म्हणतो ते सांगा,ठाणेदार म्हणतो शेकडो वर्षापासून चालत आलेल्या प्रथेसमोर कायद्याला झुकावं लागतं गोपी,त्यावर गोपी म्हणतात कायदा कधीही झुकत नाही मात्र तुमच्यासारख्या कायद्याच्या रक्षकांचे शिर मात्र जरूर झुकते.जे कायद्याच्या चौकटीपेक्षा धनदांडग्या लोकांना सलाम करतात.गोपी मुलाची वरात घोड्यावरून नेण्यावर ठाम आहे हे पाहून ठाकूरचा पाळलेला ठाणेदारच गोपीच्या मुलाला गोळी झाडून मारून टाकतो.
आजही ही अमानवी अमानुष प्रथा सुरूच होती
हे झाले जात वास्तवावर भाष्य करणारे या चित्रपटातील काही सीन,ही प्रथा तेव्हाही सुरू होती,आजही सुरूच आहे.
मात्र आज एका गावात या प्रथेला मूठमाती देण्यात आलीय.
पोलिसांच्या ऑपरेशन समानताचा यशस्वी शुभारंभ राजस्थानच्या चडी गावातून झाला. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर दलित नवरदेव घोड्यावर बसला. दीड किमीपर्यंत गावातील सर्व प्रमुख वस्त्यांमधून डीजेच्या तालावर नाचत-गाणी वाजवत वधूची वरातही घोडीवर आली. जिल्हाधिकारी रेणू जयपाल, एसपी जय यादव, सरपंच व सर्व समाजातील लोकांनी वऱ्हाडींचे व मिरवणुकीचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
ऑपरेशन समानता ही यशस्वी सुरुवात झाली आहे,त्यामुळे इतर गावांमध्येही चांगला संदेश गेला आहे: एसपी
एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी वधूच्या पालकांची भेट घेतली. कुटुंबाने आभार मानले
आणि आजपासून नवीन परंपरा सुरू झाल्याचे सांगितले.वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी जिल्हाधिकारी,
एसपी, एएसपी, केपाटन एसडीएम, डीएसपी, पोलीस अधिकारी, तहसीलदार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
या ऑपरेशन समानता चा उद्देश…ग्रामीण समाजामध्ये सामाजिक एकोपा राखण्यासाठी
पोलीस-प्रशासनाने एक नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून बुंदीमध्ये ऑपरेशन समानता सुरू केला आहे.
गावांमध्ये दलितांना घोड्यावर बसू न देणे, त्यांना खाली उतरवणे, यासारख्या घटना रोखणे
आणि त्यांचे घटनात्मक हक्क मिळवून देणे आणि खेड्यातील समाजात एकोपा राखणे हा त्यामागचा उद्देश आहे.
एका ठिकाणी हे स्तुत्य पाऊल उचलले जात असताना दुसरीकडे मात्र जातीयवादी मानवी कृत्य घडले
सरकार दलितांवर अत्याचार होत नसल्याची आश्वासने आणि दावे करत असले, तरी मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील गनियारी गावात दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून जातीयवादी भडकले,नवरदेवाची घोड्यावर बसून वरात काढण्यावरून जोरदार वाद झाला. यावेळी वराच्या घरावर दगडफेक करण्यात आली आणि महिलांना मारहाण करण्यात आली. काही हल्लेखोरांनी वराच्या घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांचीही तोडफोड केली. माहितीवरून पोलिसांनी 20 अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून काही आरोपींना अटक केली.
वास्तविक, दिलीप अहिरवार यांचा रविवारी मध्यप्रदेश जिल्ह्यातील गण्यारी गावात विवाह होता. मिरवणूक काढण्यापूर्वी वर घोड्यावर बसून पूजेसाठी मंदिरात जात होता, याबाबत गावातील जातीयवादी लोकांनी आक्षेप घेतला. यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि वराची मिरवणूक काढली. सायंकाळी मिरवणूक निघाल्यानंतर गावातील काही जातीयवादी समाजकंटकांनी दलित वराच्या घरावर व आजूबाजूच्या घरांवर दगडफेक केली. यासह घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली.गावात सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या घटनेनंतर गावातील वातावरण प्रचंड तणावात आहे.
स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि विशेष म्हणजे उद्या भारतीय राज्यघटना म्हणजे आपलं संविधान
आपण आपल्यासाठी स्वीकारून 72 वर्षे होत आहेत,उद्या प्रजासत्ताक दिन म्हणून देश तो उत्साहात साजरा करेलच
परंतु समाजात दुसरीकडे असे विदारक अमानवी चित्र आहे.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जेव्हा हिटलरने माफी मागितली
Thich nhat hanh:थिच न्यात हन्ह बौद्ध दृष्टिकोणास मूर्तरूप देणारे भिक्खू
तस्नीम मीर: Tasnim Mir अशी बनली जागतिक क्रमवारीत अव्वल
टेलीप्रॉम्प्टर म्हणजे काय? कसे काम करते? नरेंद्र मोदी यांचे भाषण चर्चेत
जय भीम पिक्चर आणखी एक विक्रम,ऑस्कर अकादमी कडून सन्मान
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 25, 2022 21: 48 PM
WebTitle – The upper caste people attacked Dalit groom house as he sat on the horse