नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायालयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर देशमुख यांना पुन्हा एकदा 12 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.अनिल देशमुखांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांच्या कुटुंबाला विनंती आहे की कोणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा बळी देऊ नका,अनिल देशमुखांनी माफीचा साक्षिदार व्हावं असे आवाहन यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केले.ते नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राज्यात फटाके फुटत आहेत पण, मुख्य फटाका कधी फुटणार हे महत्त्वाचं आहे.
संपूर्ण राज्य माफियांच्या हातात गेलंय हे स्पष्ट झालं आहे.NCP – BJP मध्ये जे भांडण लागलं आहे,
त्यामधून या पक्षांतील काही लोकांचं चारित्र्य लोकांसमोर येत आहे.
राजकारणाकडे पूर्वी सेवा म्हणून बघितलं जात होतं. आता ते कमर्शिअल झालं आहे.
राज्याला लुटण्याचा मार्ग म्हणूनच राजकारण चालू आहे.
लोकांची शॉर्ट मेमरी असते तिचा फायदा घेतला जातो
या परिस्थितीत कोर्टाची भूमिका सर्वात महत्वाची असणार आहे. त्यांनी प्रकरणं लटकत ठेऊ नये, निकाल द्यावा. यामुळे राजकारणाचं झालेलं गुन्हेगारीकरण लोकांसमोर येईल आणि कुठेतरी याला आळा घालता येईल.अनिल देशमुखांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांच्या कुटुंबाला विनंती आहे की कोणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा बळी देऊ नका. पैशांचं कलेक्शन झालं हे आता उघड आहे. ते पैसे देखमुखांकडे सापडत नाहीत मग ते कोणाकडे पोहोचवले? हे त्यांनी उघड करावं व अनिल देशमुखांनी माफीचा साक्षिदार व्हावं. असं यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.
नवाब मलिकांच्या कुटुंबीयांनी एलबीएस मार्गावरील तीन एकर जमीन काही लाखांमध्ये घेतली आहे.या पत्रकारांच्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले,माझा त्यांना एकच प्रश्न आहे की हे त्यांना आता माहीत झालं का? ते (देवेंद्र फडणवीस) मुख्यमंत्री असताना नवाब मलिक यांनी जमीन घेतल्याचं माहिती होतं. तेव्हा कारवाई का केली नाही? आता आपल्यावर शेकलं जातंय म्हणून त्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं. एक प्रकरण दाबण्यासाठी हे प्रकरण काढलं, असा आरोपही आंबेडकर यांनी केलाय. लोकांची शॉर्ट मेमरी असते तिचा फायदा घेतला जातो आहे,एक प्रकरण दाबण्यासाठी दुसरे प्रकरण बाहेर काढले जाते. त्यामुळे कोर्टाची भूमिका इथे महत्वाची आहे. न्यायालयाने राजकीय गुन्हेगारी केसेसचा निकाल लावावा, असंही आंबेडकर म्हणाले.
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 10, 2021 21:39 PM
WebTitle – The state is in the hands of mafia, Anil Deshmukh should witness amnesty: Prakash Ambedkar