प्रिन्स फिलिप यांचा जन्म 10 जून 1921 रोजी ग्रीसमध्ये झाला होता. ब्रिटिश इतिहासातील ते सर्वात प्रदीर्घ राज्य करणारा राजा राहिले.
ब्रिटनची राणी एलिझाबेथ || यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे शुक्रवारी निधन झाले.ते 99 वर्षांचे होते.नुकतीच त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली होती.मात्र संसर्ग झाल्यानंतर त्यांना किंग एडवर्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.तेथे 28 दिवस राहिल्यानंतर 16 मार्च 2021 रोजी त्याना सोडण्यात आले. प्रिन्स फिलिप यांनी जानेवारीत राणीबरोबर कोरोना लस घेतली होती. 10 जून 1921 रोजी जन्मलेला प्रिन्स फिलिप दोन महिन्यांनंतर आपला 100 वा वाढदिवस साजरा करणार होते.
राज परिवाराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की हिज रॉयल हायनेस प्रिन्स फिलिप, ड्यूक ऑफ एडिनबर्ग रॉयल हायनेस यांचे आज सकाळी विंडसर कॅसल येथे निधन झाले. प्रिन्स फिलिप 2017 मध्ये आपल्या राजनीयक जबाबादाऱ्यांतून निवृत्त झाले होते. तेव्हापासून ते क्वचितच कुठे दिसत असत,सार्वजनिक जीवनात त्यांनी भाग घेणे बंद केले होते.इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान ते लंडनमधील विंडसर कॅसल येथे राणीसमवेत राहत होते.
प्रिन्स फिलिप यांचा जन्म 10 जून 1921 रोजी ग्रीसमध्ये झाला होता. ब्रिटिश इतिहासातील ते सर्वात प्रदीर्घ राज्य करणारा राजा राहिले. ब्रिटीश राज घराण्यातील सर्वात जेष्ठ पुरुष सदस्य होते.ग्लुक्सबर्ग राजघरण्याचे सदस्य फिलिप यांचा ग्रीक व डॅनिश राजघराण्यातीशी देखील संबंध होता. लहानपणीच त्याच्या कुटुंबाला देशातून निष्काशीत करण्यात आले होते.
फ्रान्स, जर्मनी आणि युनायटेड किंगडममधून शिक्षण घेतल्यानंतर फिलिप वयाच्या 18 व्या वर्षी ब्रिटिश इम्पीरियल नेव्हीमध्ये दाखल झाले. 1934 मध्ये राणी एलिझाबेथ सोबत पहिली भेट झाली.
तेव्हा एलिझाबेथ 13 वर्षांच्या होत्या.त्या फिलिपच्या दूरच्या नातेवाईक होत्या.फिलिप यांनी दुसर्या महायुद्धातही भाग घेतला होता.
युद्धानंतर लग्नाला मिळाली परवानगी
युद्धानंतर जॉर्ज- (सहावे) यांनी फिलिप यांना आपल्या मुलीशी एलिझाबेथशी लग्न करण्याची परवानगी दिली.
लग्नासाठी फिलिप ना आपली ग्रीक आणि डॅनिश रॉयल पदव्या सोडाव्या लागल्या आणि ब्रिटिश नागरिक व्हावे लागले.साक्षगंधाच्या पाच महिन्यानंतर 20 नोव्हेंबर 1947 रोजी त्यानी एलिझाबेथशी लग्न केले. त्यानंतर त्यांना ड्यूक ऑफ एडिनबर्ग ही पदवी दिली गेली होती.
शेतकरी शेती करणे का सोडत आहेत ? जाणून घ्या
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on APRIL 09 , 2021 19 : 30 PM
WebTitle – The Queen of England, Queen Elizabeth II and husband Prince Philip ,dies at 99