बिहार : आई कर्ज फेडू शकली नाही; 30 वर्षीय व्यक्तीने 11 वर्षाच्या मुलीशी लग्न ..बिहारच्या सिवान जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जाची परतफेड न केल्याने एका 30 वर्षीय व्यक्तीने जिल्ह्यातील मैरवा पोलिस स्टेशन हद्दीतील एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीशी लग्न केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.ही व्यक्ती मैरवा पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मीपूर गावची रहिवासी असल्याचे समोर आले आहे.त्याचं लग्न अगोदरच झालं असून पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुलं आहेत.तुम्ही यामुळे जेलमध्ये जाल असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता हे लग्न कसं झालं हे मलाही माहित नाही कैसे बताए कैसे हो गया असं अजबगजब उत्तर त्याने दिलं आहे.धक्कादायक बाब म्हणजे या अल्पवयीन मुलीला स्वत:च्या मुलीप्रमाणे सांभाळण्यासाठी हा इसम घेऊन आल्याचे तो स्वत: कबूल करताना दिसतो.
दोन मुलांच्या बापाने 11 वर्षीय मुलीशी लग्न केले काय नेमकं प्रकरण जाणून घ्या..
सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला रडत रडत सांगत आहे की, तिच्या 11 वर्षाच्या मुलीला एका विवाहित व्यक्तीने मुलांसह घरात ठेवले आहे आणि तिच्याशी लग्न केले आहे. महिलेचा आरोप आहे की, तिने त्या व्यक्तीकडून काही पैसे कर्ज म्हणून घेतले होते, त्या बदल्यात त्याने मुलीला आपल्याजवळ ठेवले होते आणि आपण तिचं शिक्षण पुर्ण करू मुलीप्रमाणे सांभाळू असं आश्वासन दिलं.पण या माणसाने नंतर या अल्पवयीन मुलीशी लग्न केले.
महेंद्र पांडे असे लग्न झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं सुद्धा आहेत.
असे असताना 30 वर्षाच्या महेंद्र पांडे ने या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीशी लग्न केलं आहे.
आरोपीचा युक्तिवाद.
व्हायरल व्हिडीओमध्ये आरोपी इसम म्हणतो की, मुलगी आमच्या नात्यातली आहे त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती ठीक नसल्याने मी तिला शिकवण्याचा विचार करून घरी आणलं.मग तिच्याशी लग्न केलं.तिची आई म्हणाली लग्न कर म्हणजे पैसे वसूल होतील. नंतर तुझं दुसरं लग्न करता येईल असं व्हीडिओत हा इसम सांगताना दिसत आहे. मात्र मुलीच्या हिताचा विचार करून तिच्याशी लग्न केले. आरोपी महेंद्र पांडे याचे वय 30 पेक्षा जास्त आहे.असं पत्रकाराने म्हटलंय.ही बाब लक्ष्मीपूरची असल्याचे सांगितले जात आहे. आणि मुलगी 11 वर्षांची आहे जी सहावीत शिकते.
बारसू रिफायनरी विरोधात चाकरमान्यांची जोरदार निदर्शने
कॅलिफोर्निया मध्ये जातीय भेदभाव विरोधी कायदा संमत
UK मध्ये आंबेडकर जयंती जल्लोष, हर्षोल्हासात साजरी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 30,2023 15:58 PM
WebTitle – The mother could not pay the debt; A 30-year-old man married an 11-year-old girl