नाशिक 17-12-2025 – नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून वाद तीव्र; साधू-संत, शंकराचार्य, राजकीय नेते आमनेसामने : तपोवन परिसरातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे की प्रयागराजप्रमाणे नाशिकमध्येही साधुग्रामसाठी जागा आधीपासून निश्चित असून ती तपोवनातच आहे. तपोवन परिसरात गेल्या 12 वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेली झाडे तोडली जाणार नाहीत, असा दावा करण्यात येत आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी मागील कुंभमेळ्यात उत्तम काम केल्याचे सांगत विविध आखाड्यांतील साधू-महंत, मठाधिपती यांनी महापालिका व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थनार्थ उघड भूमिका घेत सत्ताधारी भाजपकडून उतरले आहेत.
दरम्यान, वृक्षतोडीच्या मुद्द्यावर वातावरण तापले असताना महापालिकेच्या वतीने सोमवारी ‘हरित नाशिक’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हा शुभारंभ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला. यावेळी विविध आखाड्यांचे साधू-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. साधुग्राम उभारणीसाठी प्रस्तावित असलेल्या वृक्षतोडीवरून शहरात गदारोळ सुरू असून, या वृक्षतोडीच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने शहरात व्यापक वृक्षलागवड मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून वाद तीव्र; साधू-संत, शंकराचार्य, राजकीय नेते आमनेसामने
या कार्यक्रमात हरिगिरी महाराज यांनी भाषण करताना सांगितले की, मागील कुंभमेळ्यात मंत्री गिरीश महाजन यांनी चांगले काम केले आहे. त्यांनी तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर टीका करत नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे म्हटले. कुंभमेळ्यात पर्यावरण आणि स्वच्छता या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असून त्यासाठी 15 हजार झाडांची लागवड करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तपोवनातील जुनी झाडे तोडली जाणार नसून साधुग्रामची कायमस्वरूपी जागा तपोवनातच आहे आणि यावेळी साधुग्राम तेथेच उभारला जाईल, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मखमलाबाद रस्त्यावरील भोईर मळा परिसरात झालेल्या या कार्यक्रमास आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे उपस्थित होते. याशिवाय महंत हरिगिरी महाराज, महंत भक्तीचरणदास महाराज, शंकरानंद महाराज, जनार्दन हरी महाराज, स्वामी भागवंतानंद आदी साधू-महंतांची उपस्थिती होती. या दिवशी मखमलाबाद रस्त्यावरील अडीच एकर जागेवर तसेच गोदावरी नदीच्या काठावरील सुयोजित प्रकल्पालगत विविध देशी प्रजातींच्या सुमारे दोन हजार झाडांची लागवड करण्यात आली. मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शनही करण्यात आले.
साधुग्रामची योजना साधू-महंतांसाठी नसून अन्य कारणांसाठी पुढे रेटली जात असल्याचा आरोप
दरम्यान, साधुग्रामसाठी तपोवन परिसरातील सुमारे एक हजार झाडे तोडली जाणार असल्याच्या चर्चेमुळे स्थानिक पातळीवर मोठा रोष व्यक्त केला जात आहे. या वृक्षतोडीच्या विरोधात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही उघड भूमिका घेतली आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि कुंभमेळा प्राधिकरणाला खडसावत वृक्षतोड करून साधुग्रामची योजना साधू-महंतांसाठी नसून अन्य कारणांसाठी पुढे रेटली जात असल्याचा आरोप केला आहे. तपोवनातील झाडे तोडली गेली तर अमृतस्नानाचा आनंद उरणार नाही, तसेच याचा विपरीत परिणाम सनातन धर्म आणि सरकारवर होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पर्यावरणवादी राजकीय नेते आमनेसामने
या प्रकरणात विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अभिनेते सयाजी शिंदे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही तपोवनातील वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे.
दुसरीकडे प्रशासनाकडून व्यापारी संकुल आणि इतर प्रकल्पांसाठी काही झाडे तोडणे आवश्यक असल्याचे समर्थन केले जात आहे.
यामुळे संतांमध्ये संतापाची भावना असून त्यांनी या परिस्थितीला धार्मिक आणि पर्यावरणीय परंपरेवर घाला असल्याचे म्हटले आहे.
वृक्षतोडीला ऋषी-मुनींच्या भूमीवर केलेला हल्ला
संत समितीने आक्रमक भूमिका घेत वृक्षतोडीला ऋषी-मुनींच्या भूमीवर केलेला हल्ला असल्याचे सांगितले आहे.
त्यांनी याला ऋषींच्या देहावर केलेली जखम संबोधत हिंदू धर्मविरोधी कृत्य असल्याचा आरोप केला आहे.
तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन प्रशासनाला चुकीच्या कामांकडे ढकलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संत समितीच्या मते, 220 कोटी रुपयांचे टेंडर व्यापारी संकुल आणि प्रदर्शन हॉलसाठी देण्यात आले असून, यामागे वेगळे हेतू असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या परिस्थितीला ‘रावणराज्य’ असे संबोधले असून साधूंनी याविरोधात आंदोलन सुरू केले आहे.
अण्णा हजारे यांनीही तपोवनातील वृक्षतोडीचा तीव्र निषेध केला
नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीवरून मोठा वाद निर्माण झाला असून संत समिती,
पर्यावरणप्रेमी तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याला तीव्र विरोध केला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही तपोवनातील वृक्षतोडीचा तीव्र निषेध करत सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे.
त्यांनी सांगितले की साधू-संत जंगलात राहतात आणि अशा परिस्थितीत वृक्षतोड होणे ही मोठी विसंगती आहे.
देशाचे हे दुर्दैव असून आज लोक जरी शांत असले तरी एक दिवस जनता सरकारला ‘चले जाव’ असे म्हणेल.
जनता ही मालक असून सरकार सेवक आहे. मालकाचे अधिकार तुडवणे योग्य नाही
जनता ही मालक असून सरकार सेवक आहे. मालकाचे अधिकार तुडवणे योग्य नाही, असे अण्णा हजारे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
अण्णा हजारे यांनी पुढे म्हटले की कुंभमेळा हा समाज आणि राष्ट्रहितासाठी असला तरी त्यासाठी वृक्षतोड करणे कितपत योग्य आहे,
याचा विचार व्हायला हवा. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते, प्राण्यांचे नुकसान होते आणि देशाचेही नुकसान होते.
गरज असल्यास लहान झाडे तोडावीत, मात्र मोठी आणि जुनी झाडे तोडू नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
ताज्या अपडेटनुसार वाढता विरोध लक्षात घेऊन व्यापारी संकुल mice hub प्रोजेक्ट चे टेंडर मागे घेत निविदा रद्द करण्यात आल्याचे समजते.

नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून वाद तीव्र झाला असून आता पर्यावरणवादी, साधू-महंत, शंकराचार्य, राजकीय नेते हे एकमेकांच्या आमनेसामने आल्याचे चित्र दिसत आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 17,2025 | 09:05 AM
WebTitle – Tapovan Tree Cutting Controversy in Nashik Sparks Opposition from Saints, Activists and Political Leaders























































