तामिळनाडूमध्ये एका तांत्रिक नराधमाने दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर भूत उतरविण्याच्या नावाखाली बलात्कार केला. यातून नंतर मुलगी गरोदर राहिल्यानंतर या भोंदू तांत्रिकाची पोलखोल झाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुलीच्या दुष्ट आत्म्यापासून मुक्त होण्यासाठी तिची आई स्वतः तिला आरोपी तांत्रिकाकडे घेऊन गेली असे सांगितले जात आहे. आरोपी तांत्रिक चिन्ना पुसारी याचे वय ६५ वर्षे आहे.आरोपी तांत्रिकाचं हे कृत्य सलग तीन महिने सुरू होतं.याबद्दल कुणाला काही संशय आला नाही. मात्र मागील काही दिवसांपासून मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला डॉक्टरांकडे नेले. जिथे ती गरोदर असल्याचे उघड झाले.त्यानंतर मुलीला याबद्दल विचारल्यावर तीने सर्व काही हकीकत सांगितली.पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
मार्च मध्ये आई स्वत: घेऊन गेली होती
पीडित विद्यार्थीनीच्या आईला वाटत होते की, आपली मुलगी दुष्ट आत्म्याच्या प्रभावाखाली आहे. त्यानंतर मार्चमध्ये ती मुलीसोबत या तांत्रिकाकडे गेली. जिथे उपचाराच्या नावाखाली तांत्रिकाने मुलीवर बलात्कार केला.
तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकी
दुष्ट आत्म्याला हाकलून देण्याच्या नावाखाली आरोपी तांत्रिक नराधमाने मुलीला तिच्या आईपासून दूर तिच्या खोलीत नेले. जिथे त्याने धमकावून मुलीवर बलात्कार केला. तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकीही तांत्रिकाने दिली. त्याने मुलीला सांगितले की जर तिने ही घटना कोणाला सांगितली तर तो तिला त्याच्या गूढ शास्त्राने ठार करेल.
गर्भधारणेने उघड केले रहस्य, मांत्रिक ला अटक करण्यात आली
आरोपी तांत्रिकाचं हे कृत्य सलग तीन महिने सुरू होतं.याबद्दल कुणाला काही संशय आला नाही. मात्र मागील काही दिवसांपासून मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला डॉक्टरांकडे नेले. जिथे ती गरोदर असल्याचे उघड झाले.त्यानंतर मुलीला याबद्दल विचारल्यावर तीने सर्व काही हकीकत सांगितली.पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
कंपन्यांची गोदाम उखडून टाका,देश विकण्यापासून थांबवा – मलिक
यूट्यूबरला अटक, नूपुर शर्मा चा आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केला होता
दलित मुलाशी प्रेम ; पित्याने केली मुलीची हत्या : आई पाहत राहिली
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 13 2022, 19: 30 PM
WebTitle – Tantric man rapes minor girl: Girl pregnant