बिहारच्या सारणमध्ये आणखी एका मॉब लिंचिंगने एका व्यक्तीचा जीव घेतला. गोहत्या केल्याचे समजून त्याला इतकी मारहाण केली की त्यात त्याचा मृत्यू झाला.जहीरुद्दीन असे मृताचे नाव आहे. जहीरुद्दीन ट्रक चालक असून 28 जूनच्या रात्री ते नेहमीप्रमाणे काम करत होते. त्यांच्या ट्रकमध्ये जनावरांची हाडे भरलेली होती. ज्यांना हाडांच्या कारखान्यात (bone factory बोन फॅक्टरी) पाठवायचे होते.पण 2014 पासून बदललेल्या देशातील सामाजिक राजकीय परिस्थितीमुळे जहीरुद्दीन ला आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी करत असलेल्या कामामुळेच जीव गमवावा लागला आहे.
गोहत्या केल्याच्या संशयावरून लोकांकडून मारहाण करत जीव घेतला गेला
आज तकचे आलोक कुमार जैस्वाल यांच्या रिपोर्टनुसार, ही घटना २८ जून रोजी घडली. जहीरुद्दीन जनावरांची हाडे घेऊन कारखान्याकडे जात असताना त्यांच्या ट्रकचे ब्रेक फेल झाले.ते आपला ट्रक दुरुस्त करत असताना तेथे स्थानिक जमाव जमला. ट्रकमध्ये हाडे होती, त्यामुळे दुर्गंधीही येत होती. या दुर्गंधीमुळे स्थानिकांची गर्दी वाढली.लोक जहीरुद्दीन ची चौकशी करू लागले. काही वेळाने ट्रकमध्ये हाडे असल्याचे लोकांना समजले, त्यानंतर प्रकरण आणखी चिघळलं. लोकांनी गोहत्या केल्याचा संशय घेऊन ट्रकचालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. लोकांनी जहीरुद्दीन यांना इतकी मारहाण केली की त्यात ते गंभीर जखमी झाले.
काही वेळाने पोलिसांना याची माहिती मिळाली. ज्या भागात हाणामारी झाली तो भाग जलालपूर पोलीस ठाण्यांतर्गत येतो. जलालपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी प्रथम जहीरुद्दीन ला रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. जहीरुद्दीन ला छपराच्या सदर हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी केले घाईघाईने शवविच्छेदन
दोन समाजातील तणावाचा अंदाज घेत पोलिसांनी घाईघाईने शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
29 जून रोजी सकाळीच मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी तळ ठोकला आहे.
या प्रकरणी जलालपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे
सारणचे पोलीस अधीक्षक डॉ. गौरव मंगला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
यामध्ये 6 ज्ञात आणि 20-25 अज्ञात अशा लोकांना आरोपी करण्यात आले आहे.
याप्रकरणी आतापर्यंत ४ संशयितांना अटक करण्यात आली आहे.
अन्सारी मॉब लिंचिंग प्रकरण
बिहारच्या सारणमध्ये दोन दिवसांपूर्वी तबरेज अन्सारी मॉब लिंचिंग प्रकरणात न्यायालयाने १० आरोपींना दोषी ठरवले असून
5 जुलै ला यावर न्यायालय दोषींना शिक्षा सुनावणार आहे. त्याच दरम्यान ही घटना घडलीय.
झारखंडमधील सरायकेला पोलीस ठाण्यांतर्गत धाटकीडीह गावात चोरीच्या आरोपावरून १७ जून २०१९ रोजी तबरेज अन्सारी यांची बेदम मारहाण करण्यात आली. अन्सारी हा पुण्यात मजुरीचे काम करत होता आणि ईद साजरी करण्यासाठी झारखंडमधील त्याच्या घरी आला होता.2019 च्या तबरेज अन्सारी लिंचिंग प्रकरणात स्थानिक न्यायालयाने 10 जणांना दोषी ठरवले आहे.
CCTV footage भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद वर प्राणघातक हल्ला, गोळीबार
live video: करणी सेना च्या अजय सेंगर ला भीम सैनिकांनी मारहाण केली
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 30 JUN 2023, 11:11 AM
WebTitle – Suspected cow slaughter, truck driver was brutally beaten to death