मित्रहो आपल्या महाराष्ट्र राज्यातील तरुणाईसह सर्वच नागरिकांना स्फूर्तिदायक असणारं आणि महाराष्ट्राच्या शौर्याचं वर्णन करणारं अस्मितादर्शक स्फूर्तिगीत म्हणजे ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे स्फूर्तिगीत कवी राजा नीळकंठ बढे लिखित राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून १९ फेब्रुवारी २०२३ पासून स्वीकारले गेले आहे.याबाबतचा शासन निर्णय जारी झाला.राज्यगीत गायनाबाबतची नियमावली जाहीर झाली. या स्फूर्तिगीताचे लेखन कवी राजा बढे यांनी केले असून शाहीर साबळे यांनी हे गीत गायले आहे,त्यांनी गायलेल्या गीतातील दोन चरणांसह राज्यगीत म्हणून अधिकृत स्वीकृत करण्यात आले. राज्यातील सर्व नागरिकांनी राज्यगीताच्या सन्मानपूर्वक गायन वादनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदववा असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत टेक्स्ट,पीडीएफ,आणि ऑडिओ स्वरूपात याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.ते आपण मोफत डाऊनलोड शेअर करू शकता.
जय महाराष्ट्र !
महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥ धृ. ॥
रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा, जय जय महाराष्ट्र ॥ १ ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभु राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा ॥२॥
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥
महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत पीडीएफ फाइल इथून डाऊनलोड करावी
जय जय महाराष्ट्र माझा pdf
महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
रावी ते कावेरी भारत भाग्याच्या रेषा
निळे निळे आकाश झाकते या पावन देशा
तुंग हिमालय, विंध्य अरवली, सह्याद्री निलगिरी
उत्तर दक्षिण वारे पाऊस वर्षविती भूवरी
रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा || गर्जा.. ॥ १ ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा ॥ गर्जा..॥ २ ॥
गलमुच्छे पिळदार मिशीवर उभे राहते लिंबू
चघळत पाने पिकली करितो दो ओठांचा चंबू
मर्द मराठा गडी ओढतो थंडीची गुडगुडी
ठसक्याची लावणीतही ठसकदार गुलछडी
रंगरंगेला रंगेल मोठा करितो रणमौजा || गर्जा … ॥ ३ ॥
काळया छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
निढळाच्या घामाने भिजला
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा || गर्जा…॥ ४ ॥
जय जय महाराष्ट्र माझा Lyrics
राज्यगीतासाठी मार्गदर्शक सूचना –
- राज्यगीत १ मिनिट ४१ सेकंदात वाजवता किंवा गाता येईल.
- १ मे रोजी महाराष्ट्र दिनी राष्ट्रगीतानंतर राज्यगीत वाजवले जाणार.
- राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रगीतासह राज्यगीतही वाजवले व गायले जाईल.
- राज्यगीत सुरु असताना सावधान स्थितीत उभे राहायचे आहे.
- गरोदर महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक,आजारी व दिव्यांग नागरिकांना उभे राहण्यापासून सूट देण्यात आली आहे.
जय जय महाराष्ट्र माझा रिंगटोन
frequently asked questions
1 जय जय महाराष्ट्र माझा या कवितेचे कवी कोण आहेत?
– जय जय महाराष्ट्र माझा या कवितेचे कवी राजा नीळकंठ बढे हे आहेत.
2 ‘जय जय महाराष्ट्र माझा’चे गीतकार राजा बढे कोण होते?
– कवीवर्य राजा नीळकंठ बढे हे महाराष्ट्रातील प्रख्यात कवी व साहित्यिक होते. त्यांचा प्रारंभिक काळ नागपुरातच गेला. माध्यमिक शिक्षण त्यांनी नागपुरातील टिळक विद्यालयात पूर्ण केले. त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात पत्रकारितेपासून झाली.राजा बढे यांनी शिक्षणासाठी नागपुरातील कॉलेजात प्रवेश घेतला, परंतु वर्षभरातच त्यांनी शिक्षण थांबवले. त्यानंतर त्यांनी आकाशवाणीमध्ये नोकरी केली आणि पुढे चित्रपट व्यवसायात पदार्पण केले. त्यांनी स्वानंद चित्र ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आणि संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित रायगडचा राजबंदी हा चित्रपट निर्माण केला.
राजा बढे यांनी संपादक, चित्रपट निर्माते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, आणि गायक अशा अनेक क्षेत्रांत काम केले. मात्र, त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. त्यांच्या साहित्यिक योगदानात १८ कवितासंग्रह, ४ नाटके, ९ संगीतिका, ५ एकांकिका, आणि एक कादंबरी यांचा समावेश आहे. त्यांनी अनेक प्रसिद्ध साहित्यकृतींचे भावानुवादही केले आहेत.
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 04,2024 | 09:00 AM
WebTitle – State Anthem of Maharashtra State: “Jai Jai Maharashtra Maja”
maharashtra rajyache sampurn rajyageet