सोलापूर, दि.15 : कोरोना विषाणूच्या संसर्गाने राज्यातील एसटी सेवा प्रभावित झाली होती.अनेक ठिकाणी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. दुसऱ्या लाटेतही एप्रिल ते मे 2021 दरम्यान कडक लॉकडाउन असल्याने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती.त्यामुळेएसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न देखिल समोर आला होता.
त्यावर मार्ग काढण्यासाठी एसटी ने मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला.आणि लॉकडाऊनच्या काळात एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागाने एक कोटी नऊ लाख, 49 हजार 996 रूपयांचे उत्पन्न मिळविले असल्याची माहिती विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी पत्रकाद्वारे दिली.हे उत्पन्न इतर जिल्ह्यांपेक्षा तीनपट अधिक असल्याने राज्य परिवहन महामंडळाने सोलापूर विभागाचे कौतुक केले आहे.
सोलापूर विभागाने केली एक कोटींची कमाई
सोलापूरच्या एसटी विभागाने 1 एप्रिल ते 13 जुलै 2021 अखेर महाकार्गोच्या माल वाहतुकीमधून एक कोटी 93 लाख 57 हजार 289 रूपये उत्पन्न मिळविले आहेत.
4648 मालवाहतुकीच्या फेऱ्यामध्ये 4 लाख 60 हजार 666 किमीचा एसटीचा प्रवास झाल्याचे समोर आले आहे.
एसटी महामंडळाने लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक वस्तुंची वाहतूक केली असून
यामध्ये शेतमाल, अन्नधान्य, इतर उद्योगांना लागणारा कच्चा माल, सिमेंट आदींचा समावेश आहे.
लॉकडाऊनच्या काळात राज्य शासनाने एसटी परिवहन महामंडळाला माल वाहतुकीची परवानगी दिली होती.
जून 2020 पासून सोलापूर परिवहन विभागाने 30 प्रवाशी वाहनांचे रूपांतर मालवाहतूक वाहनामध्ये करण्यात आले होते.सुरुवातीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला मात्र चिकाटी आणि ग्राहक केंद्री धोरणामुळे काही काळातच एसटी ची मालवाहतूक लोकप्रिय झाली आहे.मालवाहतुकीमध्ये सुसूत्रीकरण आणि अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी विभागीय पातळीवर स्वतंत्र मालवाहतूक कक्ष तयार केला आहे. आगार पातळीवर स्वतंत्र पथक तयार केले आहे.
माल वाहतुकीमध्ये 31 मार्च 2021 पर्यंत 5158 फेऱ्यांच्या माध्यमातून
2 कोटी 53 लाख, 41 हजार 689 रूपये आर्थिक उत्पन्न एकट्या सोलापूर जिल्ह्याने मिळविले आहे.
राज्य पातळीवर सोलापूर विभाग अग्रेसर ठरल्याने आणि वाढता प्रतिसाद पाहून यास महाकार्गो असे ब्रॅडिंग करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी, आडत व्यापारी, बाजार समित्या यांना माफक दरात महाकार्गोची सेवा उपलब्ध होत आहे.
तसेच बांधापासून घरापर्यंत सेवेसाठी महाकार्गो कक्ष, विभागीय कार्यालय, बुधवार पेठ, सोलापूर-413002
किंवा 0217-2733330 यावर संपर्क करण्याचे आवाहन श्री. राठोड यांनी केले आहे.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाख रूपयांची आर्थिक मदत
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 15, 2021, 17 : 06 PM
WebTitle – ST earned Rs 1 crore from freight transport in Solapur district 2021-07-15