उद्या शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड १९ लसीकरण सत्र
कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उद्या शुक्रवारी (दिनांक १७ सप्टेंबर २०२१) सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत, मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-१९ लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. ह्यात महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येवून कोविड लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा देखील घेता येणार आहे. महिलांसाठी विशेष कोविड १९ लसीकरण सत्राच्यामुळे उद्याच्या दिवशीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.
लसीकरणाची वेळ
सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत
थेट लसीकरण केंद्रावर येवून महिलांना पहिला किंवा दुसरा डोस घेता येईल.
मुंबईतील सर्व २२७ निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय व महानगरपालिका रुग्णालये
आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येवून (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे.
पहिली किंवा दुसऱ्या लसीचा डोसही देखील याच सत्रात दिला जाणार आहे.
फक्त महिलांना लस दिली जाणार असल्या कारणाने, उद्या साठीची प्रचलित ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on SEP 16, 2021, 19:45 PM
WebTitle – The political direction of Ambedkarite political parties should be clear