Friday, October 16, 2026
जागल्या भारत
  • Home
  • NEWS
    • All
    • FACT CHECK
    idbi-bank-stake-sale-fairfax-52878-crore-cabinet-approval

    ६२ वर्षांच्या IDBI बँकेतील ६०.७२% हिस्सा विक्रीला केंद्राची मंजुरी; फेअरफॅक्ससोबत ₹५२,८७८ कोटींचा व्यवहार

    बुद्धविहाराच्या मेडिटेशन हॉलमध्ये गरबा? धार्मिक स्थळांचा आदर राखण्याची जबाबदारी कोणाची? GarbainthemeditationhallofaBuddhaViharaWhoseresponsibilityisittomaintainrespectforreligiousplaces

    बुद्धविहाराच्या मेडिटेशन हॉलमध्ये गरबा? धार्मिक स्थळांचा आदर राखण्याची जबाबदारी कोणाची?

    अभिजीत दिपके इंडिया abhijeet-dipke-interview-cjp-india-alliance-vote-theft-allegations

    अभिजीत दिपके यांनी पत्रकारांच्या खोचक प्रश्नांना दिली सडेतोड उत्तरे; इंडिया आघाडीशी संबंध, फंडिंगचे आरोप, मतचोरी आणि आंदोलनाच्या पुढील भूमिकेवर स्पष्ट भाष्य

    निखिल वागळे यांना सोशल मीडिया पोस्टवरूनही इशारा nikhil-wagle-two-posts-cji-legal-notice-criminal-contempt

    निखिल वागळे यांना सोशल मीडिया पोस्टवरून कायदेशीर नोटिस;बिनशर्त माफी मागण्याची मागणी

    ‘सर्वोच्च न्यायालयात वारंवार जाऊन थकलो; आता विश्वास उरलेला नाही’; ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची नाराजी Kapil Sibal Supreme Court remarks

    ‘सर्वोच्च न्यायालयात वारंवार जाऊन थकलो; आता विश्वास उरलेला नाही’; ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची नाराजी

    दिल्ली मेट्रो ची अनेक स्थानके बंद न्यायालयात अवमान याचिका दाखल

    CEC-EC नियुक्ती कायद्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मागे घेण्याची मागणी; CJI म्हणाले, ‘तपासून निर्णय घेऊ’ `supreme-court-cec-ec-appointment-law-verdict-recall-application-cji-surya-kant`

    CEC-EC नियुक्ती कायद्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मागे घेण्याची मागणी; CJI म्हणाले, ‘तपासून निर्णय घेऊ’

    साहिल वाकोडे मृत्यू iit-bombay-sahil-wakode-death-professor-dulla-questioned-for-8-hours

    साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; प्रोफेसर दुल्ला यांची ८ तास कसून चौकशी

    आयआयटी बॉम्बेतील दलित विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: उत्तर अमेरिकेतील आंबेडकरवादी संघटनांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी; संस्थेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह `iit-bombay-dalit-student-sahil-wakode-death-aana-high-level-inquiry`

    आयआयटी बॉम्बेतील दलित विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: उत्तर अमेरिकेतील आंबेडकरवादी संघटनांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी; संस्थेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

  • Social
    • All
    • MOVEMENT
    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    मराठी साहित्य संमेलन अंमळनेर Marathi Literature Conference, Amalner 2024

    मराठी साहित्य संमेलन,अंमळनेर :मराठी भाषेला अभिजात नव्हे तर अजिबात दर्जा राहिलेला नाही

    प्रजासत्ताक दिन Republic Day , Amrit Festival of the Republic of India

    प्रजासत्ताक, सार्वभौम भारताचा अमृत महोत्सव..

    कतार : समृद्ध देशाची सफर, दारिद्र्य रेषेखालील समाज शून्य टक्के

    कतार

    कतार : सफर एका समृद्ध देशाची

    सम्राट अशोक शिलालेख Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India

    सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय!- अशोक नगरे

    भारतीय नागरिकत्व the story of those who gave up Indian citizenship

    श्रीमंतांना देश नसतो का? जाणून घ्या भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची कहाणी

    मिलिंद कांबळे चिंचवलकर Milind Kamble Chinchwalkar

    मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचा चिंचवली मधलीवाडी शाळेकडून सत्कार

    अभिजित विलास केणे यांचा 'पोलीस उपनिरीक्षकपदी Abhijit Vilas Kene felicitated for being selected as 'Sub-Inspector of Police'

    अभिजित विलास केणे यांचा ‘पोलीस उपनिरीक्षकपदी’ निवड झाल्याबद्दल सत्कार

  • POLITICS
    वन नेशन वन इलेक्शन One Nation, One Election The biggest threat to the Indian Constitution

    वन नेशन, वन इलेक्शन: भारतीय संविधानावर सर्वात मोठा हल्ला?

    वंचित लोकसत्ता वंचित बहुजन आघाडी Sakal newspaper spreading fake news about Vanchit bahujan aghadi should give proof or apologize

    वंचित बाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

    राहुल गांधी शिक्षेला स्थगिती Big relief for Rahul Gandhi, suspension of sentence MP restored

    राहुल गांधी यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती; खासदारकी पुन्हा बहाल

    दलित विरोधकांची आघाडी इंडिया india

    आंबेडकरी दलित वर्गातील एकही चेहरा (पक्ष) नसलेली विरोधकांची आघाडी लोक स्वीकारतील?

    शरद पवार विरोधकांच्या बैठकीला Sharad Pawar's visit to the opposition's meeting is suddenly cancelled

    शरद पवार यांची विरोधकांच्या बैठकीला दांडी;अचानक दौरा रद्द

    दिल्ली अध्यादेश What is in the Delhi Ordinance

    दिल्ली अध्यादेश नेमका काय आहे? ज्याच्या विरोधासाठी सगळे विरोधी पक्ष एकटवले

    अजित शरद पवार भेट Ajit Pawar group met Sharad Pawar

    अजित पवार गट शरद पवार यांची भेट, जयंत पाटील म्हणाले..सुप्रियाताईंचा फोन

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार After the NCP split, Narendra Modi and Sharad Pawar will be on the same platform

    राष्ट्रवादी फुट नंतर,नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट Using abusive words against PM is reprehensible, but not sedition Karnataka High Court

    प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणे निंदनीय,पण देशद्रोह नाही: कर्नाटक हायकोर्ट

  • ART & Literature
    • All
    • ENTERTIANMENT
    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला त्या विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात bhimsurya kranti cha pahila vidhanat buddha jyane davila pimplachya panat

    भीम सूर्य क्रांतीचा,पाहिला विधानात ; बुद्ध ज्याने दाविला, पिंपळाच्या पानात

    शाहरुख खान धमकी Death threat to Shah Rukh Khan Big twist

    सलमान नंतर आता शाहरुख खान लाही जीवे मारण्याची धमकी; मोठा ट्विस्ट

    कामाठीपुरा सुधीर जाधव kamathipura sudhir jadhav

    कामाठीपुरा – सुधीर जाधव दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

    Adipurush Box Office Collection

    Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ फिल्म ने तीसरे दिन कितना किया कलेक्शन? आंकड़े सामने आए

    आदिपुरुष' नेपाल में बॅन 'Adipurush' banned in Nepal

    ‘आदिपुरुष’ नेपाल में बॅन,अन्य भारतीय फिल्मों के प्रदर्शन पर रोक

    आदिपुरुष डायलॉग Kapada Tere Baap Ka Jalegi Bhi Tere Baap Ki dialogue stolen by Manoj Muntashir Shukla

    आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?

    मामनान Maamannan ट्रेलर Maamannan trailer latest update

    मामनान Maamannan ट्रेलर रिलीज मारी सेल्वराज सोबत ए आर रहमान

    सिनेमा सेन्सॉर बोर्ड Theater-Cinema Artists Inspection Board Censor Board and issues

    नाट्य – सिनेमा कलावंत परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि समस्या

    शाहरुख खान पठाण राष्ट्रपती भवन कल्चरल स्पेशल स्क्रीनिंग Screening of Shah Rukh Khan's film 'Pathan' at Rashtrapati Bhavan Cultural Centre

    शाहरुख खान च्या ‘पठाण’ चित्रपटाचं राष्ट्रपती भवनात स्क्रिनिंग

  • Religion
    आंबेडकरांचा वकिल

    आंबेडकरांचा हाय म्हटल्यावर…आज्जीला समजलं असेल की “न्याय” आंबेडकरच देणार 

    महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण राज्यगीत State Anthem of Maharashtra State Jai Jai Maharashtra Maja sampurn rajyageet

    संपूर्ण राज्यगीत ; महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत

    पोहाळे लेणी कोल्हापूर कल्याणमैत्री पौर्णिमा pohale-bauddha-leni-caves-kolhapur-paurnima-poornima

    पोहाळे लेणी कोल्हापूर येथे कल्याणमैत्री पौर्णिमा उत्साहात साजरी

    ऐनारी लेणी वर बुद्ध पौर्णिमा साजरी

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार बेकायदेशीर Missionaries spreading Christianity are not illegal

    ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे मिशनरी बेकायदेशीर नाहीत

    कान्हेरी बुद्ध लेणी येथे पाण्याचे शुद्धीकरण

    बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला

    A one day workshop at Trirashmi Buddha Caves Nashik concluded with enthusiasm त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ Maharashtra's largest ancient Buddhist world university at Mansar nasik

    मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा Workshop for Dhammalipi Scholars on Kanheri Buddha Cave Group

    कान्हेरी बुद्ध लेणी समूहावर धम्मलिपि अभ्यासकांची कार्यशाळा

  • Economics
    रिलायन्स जिओ भारत मोबाईल Jio Bharat rs 999 4G Phone

    रिलायन्स Jio Bharat rs 999 4G Phone घेण्याअगोदर एकदा वाचा

    एचडीएफसी बँक किमान शिल्लक HDFC Bank minimum balance information

    एचडीएफसी बँक माहिती | HDFC-HDFC Bank merger बँक विलीनीकरण

    500 RS 500 रुपयांच्या बनावट नोट नोटा Now big update on 500 rupees fake note, RBI's tension increased!

    आता 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठा खुलासा, RBIचं टेन्शन वाढलं!

    Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    Navigating Private Student Loans: Your Guide to Finding Financial Help

    75 ७५ रु Rs 75 New Coin

    75 रुपयांचा नविन कॉइन ७५ रु नवे नाणे जाणून घ्या वैशिष्ट्य

    2000 नोट Why was the 2000 note taken back, what will be its effect on the Indian economy

    2000 ची नोट का परत का घेतली,त्याचा परिणाम काय होईल?

    महोगनी झाड वृक्ष mahogni tree mahogany tree

    महोगनी (झाड) वृक्ष लागवड योजना;अनुदान, सर्वकाही

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI

    दोन हजार Rs 2000 note withdraw by RBI नोटबंदी नाही,जाणून घ्या

    अनुसूचित जाती जमाती निधी Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023

    अनुसूचित जाती जमाती चा निधी खर्च करण्यास टाळाटाळ? 50% पेक्षा खर्च कमी

No Result
View All Result

Home NEWS

सावित्रीबाई फुले :सोशल मिडियातील पोस्टचा आढावा

आजचे मानकरी...सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त सोशल मिडियातील निवडक पोस्टचे संकलन

Jaaglya bharat staff by Jaaglya bharat staff
January 3, 2021 - Updated on August 25, 2022
in NEWS
Reading Time: 6 mins read
0
सोशल मीडिया ट्रेंड वायरल पोस्ट

96
SHARES
175
VIEWS

सावित्रीबाई फुले- सावित्रीमाई, तुला मारलेल्या शेण,गोट्यांची सुंदर फुलं झाली आहेत. तुझ्या वाटेवर पसरलेल्या अनेक यातनांचे डोंगर आज भुईसपाट झाले आहेत तुझी खाच खळग्याची वाट आज हमरस्ता झाली आहे चालत आहेत तुझ्याच लेकी त्याच हमरस्त्यावरुन अविरत तुझ्यावरच्या प्रेमाची गाणी गात आईच्या मायेची सावली तु कमी पडू देत नाहीस कधीच तुझ्या वाटेवरचे काटेही आज नतमस्तक होत आहेत तुझ्या लेकींचे श्वास आत्मविश्वासानं भारलेत जितके कष्ट तु घेतले शिक्षणाचा मळा फुलवायला तो मळा बहरलाय खुपसा क्रांतीबाच्या साथीनं पाहीलेल्या अचाट स्वप्नांचे मळे आज तुडुंब पिक देतायत अनाथांची माय तु बनलीस आज तेच अनाथ सर करतायत शिखरे नवनवीन उत्तुंग हिमालयाची जीवनातील ध्येये गाठत आहेत तुझ्या स्वप्नांच्या साथीनं – सतिश भारतवासी कोल्हापूर

साउचा वसा

सावुमाय, तुला सगळ्यात जास्त छळणाऱ्या भटा-बामणांच्या, आम्ही पोरी सगळ्यात जास्त शिकतो. आमच्या शिक्षणाचा आम्हाला माज चढेल इतक्या शिकतो.सगळी धार्मिक बंधनं झुगारुन देऊन जगतो पण माझ्या बहुजन मैत्रिणी,आज ही जास्त शिकलं तर लग्न होणार नाही, आपल्या मर्जीने शिक्षण घेतलं तर जात नावं ठेवेल, घरदार वाळीत टाकेल म्हणून शिकत नाहीत.शिकल्या तरी रितीभातीच्या जोखडातून स्वतःला मोकळं करून शकत नाहीत. त्यांना यातून मुक्त करायला हवंय गं. तू पुन्हा एकदा जन्माला ये. फक्त जोतीराव नाही आम्हीसुद्धा तुझ्यासोबत ठाम उभ्या राहू. आपण या बहिणींना या धर्माच्या, जातीच्या जोखडातून मुक्त माणूस म्हणून जगायला शिकवू. सावुमाय,तू परत ये गं… #सावित्रीची_लेक_गंगव्वा– Gayatrie Joshi

कांकण हाती |आली लेखणी || जागवला मनी | स्वाभिमान || बाई शिकली | राष्ट्र शिकले || बहु उद्धारले | खानदान || विद्येचा देव | गणेश नाही || सरस्वती नाही | ठेवाभान || तुटल्या बेड्या | झाली प्रगती || जुन्या रीतीभाती | दाणादाण || समान संधी | ध्येय साऊचे || करू माइचे | गुणगान || साउचा वसा | फुलवी आशा || बनवूया देशा | बलवान || तयार रहा | नायकाखल || म्हणे अमोल | सावधान ||   – Amol Gaikwad (प्रकार – अभंग)

मारेकर्‍यांचेही मनपरिवर्तन

पुण्यातल्या कर्मठ-सनातनी ब्रम्हव्रृदांच्या दहशतीला भिक न घालणार्‍या, प्रसंगी त्यांनी पाठवलेल्या मारेकर्‍यांचेही मनपरिवर्तन करणार्‍या, बहुजनांच्या व स्त्रिशिक्षणासाठी शेणगोळेही खाण्याची तयारी ठेवणार्‍या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहचारिणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र ! –साक्षी सप्तसागर

भांडवल आमच्याकडे नव्हतेच. शिक्षण हेच आमचे भांडवल. जीवनाचा सारा खेळ आम्ही ह्या शिक्षणाच्या जीवावर खेळतो आहोत. आमच्यासाठी कैक पिढ्याआधी तू याची रुजवात करून ठेवलीस, कष्ट उपसलेस, राबराब राबलीस. तुझ्यामुळेच आमच्या लेकी-बाळी, आया-बहिणी, आम्ही सारे शिकत आहोत. आजच्या दिवशी तुला मनःपूर्वक अभिवादन. सावित्रीमाई, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्याप्रती अन तुझ्या कार्याप्रती कृतज्ञ राहू. –Nilesh Abhang

शोषक वर्गाच्या कोणत्याच व्याख्येत न बसणं

“सावित्रीमाईंनी मुलींच्या शिक्षणा करता दगड शेण अंगावर झेलले” नाही रं बाळ्या. तसं नसतयं. अंगावर झेलायला दगड शेण काय आकाशातून पडत नसतोय. शूद्रा-अतीशूद्रांची लेकरं शिकवायला साऊ घरा बाहेर पडे पासून तिच्यावर दगडशेणाचा मारा होतोय म्हणजे कुणीतरी फेकणारं असलं पाहिजेत. कोणत्या वर्गाच्या हितसंबंधाला, कोणत्या वर्गाच्या हेजेमोनी मक्तेदारीला शह देत फुले दाम्पत्यांनी मानव मुक्तीचा हा लढा उभारलं हे समजून घ्यायचं. त्यामुळं, “एक शूद्र समूहातली स्त्री, मुलींना शिकवतेय, धर्मद्रोह करतेय शिक्षणावरच्या आमच्या जातीय वर्चस्वाला शह देतेत म्हणून भटाब्राह्मणांनी सावित्रीमाईंवर दगड शेण फेकले”

किंवा अजून सोपं, “ब्राह्मण पुरुषांनी फक्त त्यांच्या सोयीनुसार धार्मिक अधिष्ठानाच्या बळावर इतरांना कमी दर्जाचे थेट सबह्युमन मानून आयडीयलाईझ केलेल्या जगात कुणीतरी आपलं माणूसपण असर्ट करण्याचा अक्षम्य गुन्हा करतंय म्हणून भटा ब्राह्मणानी सावित्रीमाईवर जाता येता दगड शेणाचा मारा केला, त्यांचा अनन्वित छळ केला” असं असतंय ते. शोषक वर्गाला अधोरेखित करायचं असतं! उगाच शोषक वर्गाला मोकाट सोडून शोषितांच्या माणूसपणाच्या लढाईलाचं फेटिश करण्यातून काहीच हाशील नाही. ते काम इथल्या दांभिक अकॅडमीया, पत्रकारं, विचारवंत, लेखकरावांचं. आपलं नाही. आपलं काम ह्या जातीय वर्चस्वावर, पावर डायनामिक्स वर बोलणं. शोषक वर्गाच्या कोणत्याच व्याख्येत न बसणं. सावित्रीमाईंना हीच सर्वात मोठी आदरांजली असेल! – Gunvant Sarpate

ब्राम्हणीव्यवस्थेचे जोपासन

तुझ्या जन्माआधी अंधार उपसणाऱ्या आम्ही आज लख्ख उजेडाची तिरीप होऊन झगमगलो आहोत.. हाती वीणाघेऊन टाळ कुटणारी सरस्वती ही विद्येची देवता नसून इथल्या मातीचा वास अंगाखांद्यावर मिरवणारी आन आमच्या हाती लेखणी परजून देणारी सावित्रीबाई फुले हीच आमची आद्य राष्ट्रमाता होय। सावित्रीबाई जयंती करायची आन विद्येची देवता म्हणून शाळा, सरकारी कार्यालये आणि घरीसुद्धा काल्पनिक विणेंधरी सरस्वतीचे पूजन सुरू ठेवायचे हा दुटप्पीपणा आजही आहेच की..

सावित्रीबाईची तसबीर निव्वळ देखावा म्हणून पूजयची आन मार्गशीर्ष गुरुवार, हळदीकुंकू समारंभ आणि कुळाचार व्रतवैकल्ये, यथासांग करायची हा बेगडीपणा करणाऱ्या स्त्रिया आपल्या आसपास अगदी आपल्या मिञयादीतही आहेच की..सावित्रीबाई फुलेंची वैचारिक पोस्ट टाकायची आन स्त्रीमुक्ती लढ्यातील तिचे योगदान अनुल्लेखाने टाळून महिला दिवस साजरा करायचा….साधं गुगल केलं तरी स्त्रीवादी लढ्याचा आद्यपाया घालणारी स्त्री ही सावित्रीबाईच होती हा निष्कर्ष निघतो। तरी तिला वगळून किंवा हवी तेवढीच सावित्रीबाई तोंडी लावायला घेऊन मांडणी केली जाते।बाकी सावित्रीबाईने सुरुंग लावलेल्या ब्राम्हणीव्यवस्थेचे जोपासन करण्यातच साऱ्या दंग आहेत… सावित्रीची स्वीकार म्हणजे इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेचा नकार हे इथल्या बहुजन स्त्रीच्या कधी लक्षात येणार आहे। माऊली तुला विनम्र अभिवादन। – सुरेखा पैठणे

साऊमाय तुझ्याचमुळे रुजली खोल माझी अक्षरमुळे…  

 शिक्षण : माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळे काढणारे शिक्षण ! शिक्षण : कुटुंब, सामाजिक , आर्थिक , राजकीय मानवी अस्तित्वाच्या सर्व आयामांना एकाचवेळी छेद देणारे शिक्षण !   ज्यावेळी तुमच्या समोर चहुबाजूने घेरलेला एक भलामोठा अभेद्य वाटणारा पहाड/ किल्ला असतो,   आपण काही कृती केली नाही तर आपण यातच गुदमरून मरणार हे माहित असते; मीच नाही तर माझ्या आधीच्या पिढ्या तशाच मेल्या आहेत हे माहित असते; माझ्या पुढच्या पिढ्या देखील तशाच मरणार आहेत याची खात्री असते भावनिक प्रतिक्रियांना मर्यादा असतात एव्हढेच नव्हे तर त्या तुमचाच शक्तिपात करत असतात; कितीही डोके आपटले तरी किल्ल्याला ढिम्म काहीही होणार नाही असे वाटत असते;  

सावित्रीबाई फुले

त्यावेळी त्या पहाडाच्या पायातील एक भलामोठा दगड चिणायाचा असतो, बाहेर काढायचा असतो ! मग यथावकाश इतरही चिरे हळू लागतात ; चिरे हलत आहेत म्हटल्यावर गलितगात्र केली गेलेली अनेक पुढे येतात   कितीही अभेद्य वाटला तरी पहाडाचा / त्या तुरुंग किल्याचा “जीव” त्याच्या पायात असतो !   महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी हेच केले ! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना क्रांतिकारी अभिवादन ! – Sanjeev Chandorkar (३ जानेवारी)

क्रांतिकारी, विद्रोही या संकल्पना अत्यंत बृहद, व्यामिश्र अशा संकल्पना आहेत. त्यांना थेट विचार-व्यवहारात आणण्यासाठी तेवढीच जिगर न् धमक लागते. सावित्रीमाईंचा वारसा पेलणं ही जातायेता सहजपणे करण्याची बाब नव्हे.सावित्रीच्या लेकी म्हणवून घेणाऱ्या माझ्यासह सर्व जणींना त्यांचा हा धगधगता वैचारिक कृतिशील वारसा पेलण्याचं बळ मिळो. समग्राशी डोळा भिडवण्याची ताकद आम्हा सर्वांनाच अर्जित करता येवो. माई, तुला विनम्र अभिवादन ! – Pradnya Daya Pawar

३ जानेवारी सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन

#३जानेवारीसावित्रीबाईफुलेमहिलाशिक्षणदिन– प्लेगयोद्धा सावित्रीबाई – प्रा. हरी नरके #सावित्रीउत्सव सावित्रीबाईंनी डॉक्टर यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

तरिही त्या जीव धोक्यात घालून प्लेगयोद्धा म्हणून लढत होत्या

१८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं. देशभर प्लेगनं हाहाकार माजवलेला होता. सारे भारतीय दहशतीखाली जगत होते. अनेक नेते स्वत:चा जीव वाचवण्यासाठी दुर रानावनात निघून गेले होते. प्लेग संसर्गजन्य रोग असल्याची व रुग्णाला आपण स्पर्श केला तर आपल्यालाही तो होऊ शकतो याची माहिती त्यांना मुलगा यशवंतकडून मिळालेले होती. तरिही त्या जीव धोक्यात घालून प्लेगयोद्धा म्हणून लढत होत्या.

मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्‍या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्या आम्ही आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या या शौर्यांगणेची मात्र हवी तेव्हढी दखल घेतली नाही… राजकीय शहीदांचे पोवाडे गाणारी आमची पाठ्यपुस्तके या सामाजिक शहीदाबद्दल तोंडात मिठाची गुळणी धरून असतात. हा भेदभाव, हा पक्षपात का? उर्वरित लेख वाचण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करावे… https://harinarke.blogspot.com/… – प्रा.Hari Narke
निमित्त- २/३ जाने. २०२१

कुठैत ‘टॉपर’ मुली???

दरवर्षी दहावी बारावीचा रिझल्ट लागला कि जोक्स फिरत राहतात… कुठं जातात या ‘टॉपर मुली’? या अर्थाचा विनोद असतो तो. अगदी पूरुषच नव्हे तर बायकाही यात अग्रेसर असतात… याला मी डार्क ह्युमर पण म्हणु शकत नाही कारण पाठवणाराचा कुचेष्टेचा सुर लगेच दिसतो. मध्यंतरी दहावीच्या रिझल्टनंतर माझ्या विद्यार्थ्यांने wa status ला ठेवलेला हा जोक… इतर ठिकाणी काही बोलत नाही पण माझ्याच विद्यार्थ्यांनं ठेवल्यानं भयंकर गिल्ट आला. जग बिग, समाज बिमाज बदलायचा,पिढी घडवायाची हे असलं काहीही माझ्या डोक्यात नाहिये… पण माझ्यासमोर जी 100-150 टाळकी रोज तासभर बसतात त्यांना नाय बदलु शकले तर जिंदगी बरबाद समझो..त्याला जे बोलले तेच थोडं expand करुन लिहितेय. कुठं जातात या टॉपर मुली? ..

टॉपर मुली

कुठंच नै. कारण त्यांना कुठंही जायला जागा नसते ना स्वातंत्र्य. जास्ती मार्क्स मिळवणं ही त्यांची गरजै. तुम्हा मुलांना मार्क्स कमी पडले, नापास झाले कि लग्न लावून देण्याची धमकी मिळत नाही. असाही एक जौक फिरतच असतो. त्यावरही हसता येत नाही कारण तो पण सिरियस मैटरै. अम्हा मुलींना शिकण्यासाठी जास्त मार्क्स घ्यावैच लागतात कारण कमी मार्क्स पडले कि लग्न लावुन देईन या धमक्या पोकळ नसतात. अगदी खऱ्याखुऱ्या असतात. माझ्या वर्गातल्या अनेक मुलींची शाळेत असतानाच लग्नं झाली. आणि फक्त कमि मार्क्स पडालेल्यांचीच नव्हे तर टॉपर मुलींचीही झालीत.पण जास्त मार्क्स मिळाल्याने घरच्यांना पुढं शिकवा असं बोलायला जरा confidence येतो.. त्यांचे पुढं शिकण्याचे चान्सेस 80% होतात. 20% मात्र आर्थिक परिस्थिती, लांब गावला कॉलेजेस आणि पैरंटल इगो..

म्हणजे ‘आमच्या खानदानीतल्या पोरी बाहेर जाऊन शिकत नैत’ यात बळी जातात. मावशीच्या घराशेजारी मुलगी होती. होम सायन्स करायचं होतं. भयंकर हुशार होती. घरची परिस्थिती गडगंज वगैरे होती. पण बारावीनंतर पोरीनीं कॉलेजला जायचं नसतं. लफडी करतेत शिकलेल्या पोरी म्हणून तिचं लग्न लावण्यात आलं. इथं असतात या टॉपर मुली… तुमच्या आजुबाजुला किंवा तुमच्या घरात. तुमच्या हाताखाली एखाद्या नोकरासारख्या राबत असतात. आणि हा असा नोकर असतो जो हुंडा, रुखवतरुपी संसार, सोन्यारुपी investment घेऊन येतो आणि वर्षाकाठी एखादी साडी,ती पण काही ठिकाणि मिळत नाही असा राबत असतो. आणि काही टॉपर मुली शिकल्याच पुढं, लागल्या नोकरिला तर office politics, eve teasing , सेक्सुअल हैरैशमेंट वगैरेंनी अडवलं जातं.

Gender politics

Gender politics नावाचा प्रकार फार भयानकै. यात स्त्रिया सुट्टी जास्त घेतात म्हणून नोकरी देताना अडवणुक करणं, संसार आणि जाॉब करताना धावपळ होईल या नावाखाली त्यांना संधी न देणं, एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट त्या कितीही capable असल्या तरी केवळ स्त्री असल्यानं न देणं अशा अनेक गोष्टी समावेशै. मानसिक आणि बौध्दिक खच्चीकरण करण्यात आपला हा टिनपाट समाज भयंकर अग्रेसरै. तरीही काही मुली उरतात… त्या टॉपर असतीलच असं नाही पण जास्त मार्क्स घेऊन शिकण्याचं, जॉबचं, प्रिव्हिलेज मिळवतात.. पुढं शिकतात. जॉब करतात.. काही जणी घर जॉब दोन्ही करतात. काही जणींना घरुन विरोध होतो तिथंही न खचता त्या पुढं येतात.. काहींना घरुन पुर्णतः पाठिंबा मिळतो.. आकाश मोकळं मिळतं वा मिळवतात आणि मग उडतात…

त्या तसल्या फालतु जोक्सच्या शेणगोळ्यांना फाट्यावर मारायाला आम्हाला साऊने शिकवलंय कृतीतुनच

साऊच्या अंगावर शेणाचिखलाचे गोळे पडले तसे यांच्यांही पडतात वाईट चारित्र्य, attitude, ego दाखवते वगैरेंचे.. त्यांना कधी झेलत,कधी टाळत, कधी प्रतिवार करत पुढं जातात… काही आमच्या सारख्या असतात ज्यांना सगळीच प्रिव्हीलेज मिळत जातात… करियरवर फोकस करण्यासंदर्भात असो वा मनसोक्त जगण्याबाबत असो पण सुरुवात त्यांचीही जास्ती मार्क्स मिळवण्यातुनच होते… !! तर इथं असतात या टॉपर मुली.. आपल्याच आजुबाजुला.. साऊच्या सावल्या..!! आणि टॉपर नसलेल्याही असतातच.. साऊच्याच सावल्या…!! शिकण्याचं प्रिव्हिलेज मिळवण्यासाठी टॉपर होणं किंवा जास्ती मार्क्स घेण्याची धडपड करावी लागते त्यांना…!!! जोती-साऊने दारं उघडुन दिलीत… त्यात प्रवेश करण्याचं प्रिव्हीलेज सगळ्यांना मिळो…!!!! टॉपर आणि नॉन-टॉपर मुलींनाही..!! बाकि तुमच्या त्या तसल्या फालतु जोक्सच्या शेणगोळ्यांना फाट्यावर मारायाला आम्हाला साऊने शिकवलंय कृतीतुनच!!! साऊ माये… Happy birthday ❤#You_Go_Girl– Prie Patil

क्रांती ज्योत, पेटविली, इथे, सावित्रीबाईंनी दाखविली, शिक्षणाची, वाट, विद्येची जननी.! मात, करूनी विरोधां, शाळा, स्त्रियांना खोलल्या! पाया, तो स्त्रीशिक्षणाचा, अडचणी, दुर केल्या .! स्त्रिया, त्याकाळी लाचार, रस्ता, होता खडतर ! नशिबात, पुजलेला, कायमचा, अंध:कार ! फुले, दांपत्य महान, शिक्षणाची, कुंजी दिली! विलायती, भाषेचीही, चव, ज्ञानाई चाखली ! कर्मकांड, संपवुनी, अंधश्रद्धा, नाकारली ! सत्यधर्म, पाळताना, जोतिबांना, साथ दिली ! रोष, धर्म मार्तंडांचा, अंगावरी, ओढविला ! प्लेग, रूग्णांच्या सेवेत, प्राणत्याग, त्यांनी केला ! ज्ञान, दिलेस स्त्रियांना, मुढ, मती घालविली ! कसे फेडू, आम्ही पांग, थोर, तुझे उपकार ! जन्मदिनी, सारे करी, दिन, बालिका साजरा! कर्तृत्वांसी, वंदुनीया, आज, तुम्हांसी मुजरा ! पहिल्या स्त्री शिक्षीका ज्ञान ज्योती ” सावित्री माई फुले ” यांच्या जयंती निमित्त त्यांना कोटी दशकोटी प्रणाम ! – Babasaheb Thorat

कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”

महात्मा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1

जागल्याभारत वरील बातम्या/लेख  शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.

(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)

Share38Tweet24SendShare
Jaaglya bharat staff

Jaaglya bharat staff

Related Posts

idbi-bank-stake-sale-fairfax-52878-crore-cabinet-approval
NEWS

६२ वर्षांच्या IDBI बँकेतील ६०.७२% हिस्सा विक्रीला केंद्राची मंजुरी; फेअरफॅक्ससोबत ₹५२,८७८ कोटींचा व्यवहार

by Jaaglya bharat staff
October 14, 2026
बुद्धविहाराच्या मेडिटेशन हॉलमध्ये गरबा? धार्मिक स्थळांचा आदर राखण्याची जबाबदारी कोणाची? GarbainthemeditationhallofaBuddhaViharaWhoseresponsibilityisittomaintainrespectforreligiousplaces
NEWS

बुद्धविहाराच्या मेडिटेशन हॉलमध्ये गरबा? धार्मिक स्थळांचा आदर राखण्याची जबाबदारी कोणाची?

by Jaaglya bharat staff
October 14, 2026
अभिजीत दिपके इंडिया abhijeet-dipke-interview-cjp-india-alliance-vote-theft-allegations
NEWS

अभिजीत दिपके यांनी पत्रकारांच्या खोचक प्रश्नांना दिली सडेतोड उत्तरे; इंडिया आघाडीशी संबंध, फंडिंगचे आरोप, मतचोरी आणि आंदोलनाच्या पुढील भूमिकेवर स्पष्ट भाष्य

by Jaaglya bharat staff
October 14, 2026
निखिल वागळे यांना सोशल मीडिया पोस्टवरूनही इशारा nikhil-wagle-two-posts-cji-legal-notice-criminal-contempt
NEWS

निखिल वागळे यांना सोशल मीडिया पोस्टवरून कायदेशीर नोटिस;बिनशर्त माफी मागण्याची मागणी

by Jaaglya bharat staff
October 13, 2026
‘सर्वोच्च न्यायालयात वारंवार जाऊन थकलो; आता विश्वास उरलेला नाही’; ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची नाराजी Kapil Sibal Supreme Court remarks
NEWS

‘सर्वोच्च न्यायालयात वारंवार जाऊन थकलो; आता विश्वास उरलेला नाही’; ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची नाराजी

by Jaaglya bharat staff
October 11, 2026
advertiasement
ADVERTISEMENT

Web Stories

IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी
लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर
सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल.
प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

ट्रेंडींग

  • बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    बौद्ध आणि मराठा विवाह: कुटुंबीयांनी समाजासमोर ठेवला एक अनोखा आदर्श

    34547 shares
    Share 13819 Tweet 8637
  • शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे

    21227 shares
    Share 8491 Tweet 5307
  • जात अन जातीचा पेट: म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आणि ह्या पोरानं मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं.

    19490 shares
    Share 7796 Tweet 4873
  • झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”

    15839 shares
    Share 6336 Tweet 3960
  • झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन

    15344 shares
    Share 6138 Tweet 3836
ADVERTISEMENT

जागल्या भारत हे सोशल मिडियात चळवळींच विश्वासार्हतेने वाचलं जाणारं, शेअर केलं जाणारं अन चर्चीलं जाणारं माध्यम आहे.

इथं संविधानवादी विवेकी लेखकांना मनमोकळे व्यक्त होता येतं. तुम्हाला काही मांडायचं आहे तर आमच्याकडे लेख पाठवा

आपले लेखन साहित्य jaaglyaweb@gmail.com वर पाठवा किंवा +91 88284 53346 या नंबरवर व्हाटसेप करा

Important Links

  • About us
  • Community Guidelines
  • Contact
  • Privacy Policy
  • Refund Policy
  • Support Jaaglya Bharat
  • Terms and Conditions
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • POLITICAL
  • SOCIAL
    • MOVEMENT
  • Economics
  • ART & LITERATURE
    • ENTERTIANMENT
  • RELIGION
  • NEWS

© 2024- Jaaglya Bharat

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
IPL : 13 व्या वर्षी करोडपती बनलेला वैभव सूर्यवंशी : संघर्षाची कहाणी लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल.. जाणून घ्या एका क्लीकवर सरस्वती वैद्य चा खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले जज जितेंद्र मिश्रा चा डर्टी पिक्चर.व्हिडिओ व्हायरल. प्रेयसीचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
नव्या पोस्ट्स/अपडेट्स हव्या? OK No thanks