सोशल मिडियातील विविध विषयांवरील महत्वाच्या मतांच्या आढावा…
कोण ठरवते तुमच्या शहरातील सार्वजनिक आरोग्य ठेवणाऱ्या कंत्राटावर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला मासिक १०,००० रुपये आणि हेज फंड मॅनेजरला महिन्याला १० लाख रुपये उत्पन्न ?
कोणठरवते करोना सारख्या जीव जाऊ शकणाऱ्या साथीत देखील कंत्राटावर काम करणाऱ्या नर्सला मासिक २०,००० रुपये आणि एलिट वर्गातील स्त्रियांसाठी बुटीक चालनावणाऱ्याला मासिक ५ लाख रुपये
कोण ठरवते करोना विषाणूमुळे बळी पडलेल्या तुमच्या जिवलग नातेवाईकाला, ज्याच्या प्रेताजवळ देखील तुम्ही जाऊ शकत नाही, भावनेने शेवटचा नमस्कार करून अंत्यविधी करणाऱ्या स्मशानातील कंत्राटी कामगाराला फक्त मासिक १०,००० रुपये ?
आणि हि तुलनात्मक यादी किमान १००० प्रोफेशन्स साठी बनवता येईल; जी तुम्ही मनातल्या मनात बनवलाच
_____________________
अर्थव्यस्वस्थेत कोणत्या श्रमाला / कौशल्याला / ज्ञानाला नक्की किती मोबदला मिळणार हा १००० टक्के राजकीय अर्थव्यवस्थेचा निर्णय असतो
कंत्राटावर काम करणारे ते नागरिक प्रौढ आहेत आणि त्यांनी काम करायचे मान्य करताना त्या अटी मान्य केल्या आहेत असे म्हणणे म्हणजे
बलात्काऱ्याने बलात्कारित स्त्रीचा कन्सेट होता म्हणण्यासारखे आहे
___________________
कोरोना आपल्या सर्वाना आपल्या राजकीय अर्थव्यस्वस्थेचे अधोविश्व दर्शन करत आहे; जे त्यालाच दिसेल जो स्वतःशी प्रामाणिक असेल
मला आवाहन करायचे आहे विचारी आणि संवेदनशील मध्यमवर्गीयांना, विशेषतः तरुण वर्गाला.
आपण गेली चाळीस वर्षे तुमच्या समाजातील कष्टकऱ्यांना साथ देणे सोडून दिल्यामुळे अनेक सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि राजकीय अरिष्ट सदृश प्रश्न तयार झाले आहेत
करोना आपल्याला हे शिकवत आहे कि प्रश्न मानवतावादाचा नाहीये; करोना आपल्याला हे सांगत आहे कि “सुरक्षितता मिळाली तर सर्वाना नाहीतर सगळ्यांचा जीव धोक्यात”
कोरोना पश्चात येणाऱ्या काळात गेल्या चाळीस वर्षातील सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय, राजकीय सर्वच विचार व्यूहांचा पुनर्विचार करू या
तरच करोना मुळे बळी गेलेल्या आणि जाऊ शकणाऱ्या आपल्या बांधवांचे मृत्यू कारणी लागतील
by संजीव चांदोरकर (२८ मार्च )
प्राचीन काळात एक राजा होता. तो शिकारीला जंगलात गेला होता. त्यानंतर त्याच्या राणीची मासिक पाळी सुरू झाली. एका शिकारी पक्ष्यामार्फत राणीने ही बातमी राजाकडे पाठवली. ती बातमी कळल्यावर राजाने एका द्रोणात आपलं वीर्य काढलं आणि पक्ष्याकडे दिलं. पक्षी तो द्रोण घेऊन राणीकडे यायला निघाला असता वाटेत दुसऱ्या शिकारी पक्ष्यासोबत त्याचा वाद झाला.
दोघांत युद्ध झालं. त्या गडबडीत द्रोण निसटला आणि यमुनेत पडला. नदीत एक शापित मछली होती.ती शापामुळे मछली झालेली सुंदराच होती. नदीत पडलेलं द्रोणातील वीर्य त्या मछलीने गिळलं आणि ती गर्भवती झाली !
________________________________________
लागला ना डोक्याला शाॅट !
आता आपल्या भोवताली निरीक्षण करा. या अशा कपोलकल्पित भंपककथांवर ज्यांचा दृढ विश्वास आहे, ते बुद्धीबधीर लोक शोधा. बहुतांशी धर्मद्वेषी राजकीय पक्षाचे समर्थक सापडतील.
ज्यांचा असल्या भंपककथांवर विश्वास आहे, पण धर्मद्वेषी पक्षाचे समर्थक नाहीत असं भासवतात, ते लोकही आतून त्या पक्षाचेच सुप्त समर्थक असतात, कळत-नकळत धर्मद्वेषी बाजू लढवतात, अगदी इतर कोणत्याही पक्षात असले तरीही…
भारतातील वर्तमानातील धर्मांध राजकीय नेत्यांचं राजकीय भांडवल त्यांच्या समर्थक आणि विरोधकांतील ही सामाईक बुद्धीबधीरता आहे !
by राज असरोंडकर
आजच्या शिमग्याच्या शुभमुहूर्तावर दोन्ही बाजूंच्या वाधुंग्या लोकांसाठी दिनदर्शिका.
( वाधुंग्या शब्द मूळ मराठी आहे कि बाहेरचा , नेमका अर्थ काय आहे ह्यावर वेगळ्या पोस्टी टाकून दळण दळावे )
एक जानेवारीला हे आंग्ल नववर्ष आपल नसून पाडवा आपला नववर्ष दिन आहे अस ठासून सांगणाऱ्या पोस्टी , सगळे व्यवहार इंग्रजी कालगणना धरून करताय मग नववर्ष का नको अश्या दोन्ही बाजूच्या पोस्टी पाडाव्यात.
१४ जानेवारीला सालाबादप्रमाणे पानिपत पराभव कि विजय , पेशवे हरले कि मराठे हरले ह्यावर एक अजून पानिपत घडवाव.
२६ जानेवारीला दिल्लीची परेड बघून ५६० मिमी छाती राष्ट्रवादाच्या आरोळ्या एका बाजूने द्याव्यात , दुसऱ्या बाजूने “ ये आझादी झुटी है “ म्हणाव , आणि तिसऱ्या बाजूने गेल्या ६० वर्षात नेमक काय झालय हे सांगाव.
३० जानेवारीला भगतसिंगच्या फाशीला गांधी कसे जबाबदार आहेत , फाळणीला आणि पाकिस्तान निर्मिताला गांधी कसे जबाबदार आहेत ह्याच्या पोस्टी एका बाजूने टाकाव्यात आणि दुसऱ्या बाजूने ह्या पोस्टी कश्या खोट्या आहेत ते सांगाव.
१४ फेब्रुवारीला प्रेमदिवस साजरा करण्याऐवजी मातापिता पूजन करावे अश्या पोस्टी एका बाजूने टाकाव्यात दुसऱ्या बाजूने त्याचा विरोध करावा.
१९ फेब्रुवारीला शिवजयंती तिथी कि तारखेने साजरी करावी ह्यावर घमासान युद्ध करावे.
अधे मध्ये शिवरात्र , होळी ,रंगपंचमीला स्मरणरंजनात गुंग होऊन हिंदी गाण्यांची अंताक्षरी खेळावी.
२३ मार्चला भगतसिंग राजगुरू सुखदेव ह्यांच स्मरण करत दोन्ही बाजूनी त्यांना आपल्याकड खेचायला रस्सीखेच करावी , लालभाई आणि नास्तिकांनी भगतसिंग आमचेच म्हणून जमेल तसा गुळ पाडावा.
रामनवमीला एका बाजूने राम मंदिर डोक्यावर घ्याव ,दुसऱ्या बाजूने राम मिथक कि काव्य कि इतिहास ह्यावर काथ्याकूट करावा.
१४ एप्रिलला मिरवणुकीचा त्रास होतो म्हणून अभिजनांच्या पोस्टी असाव्यात आणि त्याला विरोध करायला आंबेडकरी जनता पोस्टी टाकत असावी.
लखनौ कराराच स्मरण कराव ते २३ जुलैला
“ कामगार एकजुटीचा विजय “ म्हणायला कामगारच उरलेले नाहीत म्हणून एक मे ला महाराष्ट्र दिनाच्या पोस्टी टाकाव्यात आणि महाराष्ट्र दिन कसा दीन आहे ह्यावर चर्चेच गुऱ्हाळ लावाव.
मे महिन्यात पौर्णिमेला बुद्ध विष्णूचा अवतार म्हणून डोक्यावर घ्यावा आणि त्याला तेवढाच कडवा विरोधही व्हावा.
“ ने मजसी मातृभूमीला “ आळवत उसासे उमाळे यावेत आणि माफिवीर सावरकर म्हणून टिंगल व्हावी ती मात्र २८ मे ला.
“ शेंगा टरफल “ ह्यावर पाचकळ जोक हाणावेत , लखनौ कराराच स्मरण कराव ते २३ जुलैला
“ हे खर स्वातंत्र्य नाही “ इथपासून “ संघाच स्वातंत्र्य मिळवण्यात योगदान काय “ ह्याच्या रसभरीत चर्चा म्हणजे १५ ऑगस्ट.
सप्टेंबर मध्ये गणपती ,दसऱ्याला ,नवरात्रात एकीकडे संस्कृती रक्षकांनी मिरवणुका आणि गरबा ह्यांच समर्थन कराव आणि विरोधात मिरवणुका आणि गरब्यात होणारे लैंगिक संबंध ह्यावर पोस्टी पडाव्यात.
दूसरीकड अहिंसा कशी योग्य आहे ह्याच्या साठी गळे दाबून समजावून सांगाव.
मग आली गांधी जयंती.नव्या ट्रेंडनुसार गांधी बाजूला टाकून लाल बहादूर शास्त्रींना कस पळवता येईल ह्याचा विचार करावा आणि दूसरीकड अहिंसा कशी योग्य आहे ह्याच्या साठी गळे दाबून समजावून सांगाव.
दिवाळीला जर बर असतय.त्यातल्या त्यात चकमकी कमी असतात म्हणून जरा मसाला म्हणून फटाके ,चायना माल ह्यावर रणकंदन घडवून आणावं.
14 नोव्हेंम्बर आला की लगेच नेहरू शिग्रेट पितानाचे फोटू टाकावेत आणि त्यांना विरोध करणारानी प्रतिक्रियावादि बनून तंडत बसावं.
६ डिसेम्बरला १४ एप्रिलच्या पोस्टी कॉपी पेस्ट करून दोन्ही बाजूनी टाकाव्यात ,
आग न घासलेट कमी पडल तर बाबरी आहेच.
२५ डिसेम्बर ? आंग्ल सणाचा विरोध करावा कि वाजपेयींचा वाढदिवस करावा ह्यात दिवस निघून जातेय,दुसऱ्या बाजूला “ वाजपेयी अविवाहित आहेत पण ब्रह्मचारी नाहीत “ ह्या पोस्टी टाकाव्यात.
३१ डिसेम्बरला सालाबादप्रमाणे आंग्ल वर्षाची अखेर साजरी करू नये ह्यासाठी एकमत शेवटी रात्री बसल्यावर होईल ह्याबद्दल निश्चिंत असावे.
इति वार्षिक फेस्बुकीय वेळापत्रक सुफल संपूर्ण.
तज्ञांनी उपयुक्त भर घालण्यास दिनदर्शिका खुली आहे हे काय सांगायला हव ?
#फेसबुकी_शिमगा
by Anand Shitole
वाह रे नवीन धंदा
तुम्हाला जास्त कळतं का आम्हाला , इतकं वाटत असेल तर न्या तुम्ही दुसरी कडे तुमचा कोविड पोसिटीव्ह रुग्ण . आजच्या स्थितीत बेड भेटणं महा कर्मकठीण झालंय त्यात रुग्णाच्या नातेवाईकाला हा असला हाग्या दम भरून रोजचे पंधरा पंधरा हजाराचे नेमकं कोणतं औषध देतात रुग्णाला देव जाणे , कधी कधी डॉक्टर देव वाटतात एखाद्याचा जीव वाचवतात तेव्हा आणि कधी कधी हा प्रकार बघितल्या नंतर घृणा ही येते असल्या काही प्रकारातले डॉक्टर बघून .
अरे किंबहुना रुग्णाची आर्थिक परिस्थितीचा विचार तुम्ही तरी डोळस पणे करा , कसाई सुद्धा जनावर कापण्या पूर्वी त्याला पाणी पाजतो , तुम्ही त्याच्या घरातील सदस्यांना आणि नातेवाईक लोकांना सुद्धा नुसती विचारणा करतो म्हणून पाय पडायला लावता , दहा दहा वेळा माफी मागायला लावता . त्याचा घरातला सदस्य आहे तो , चिंते पोटी विचारणा करणारच .
आज तुम्ही दुसऱ्याला गिधाड बनून खाताय उद्या तुम्हाला ही कुणी तरी खाईल हा सृष्टीचा नियम आहे
एकदा नाही दिवसभर विचारेल तो , कुणाचा पोटाचा गोळा असतो तर कुणाचे जन्मदाते असतात ते रुग्ण , ते नाही चौकशी करणार तर कोण करणार आहेत चौकशी , हॉस्पिटल घेऊन बसलेत म्हणून आणि आम्ही चोवीस तास काम करतोय , आम्ही भी माणसं आहोत म्हणणाऱ्यांनो , खरच ह्या आजारात तुम्ही माणसं राहिलीत का हाच प्रश्न पडतो , पैश्याची लूटमार करून ना करून वरून उपकार इतके दाखवताय की जसा घर दार विकून रुग्णाची सेवा मोफत करतोय .
थु आहे असल्या मानसिकतेवर , आणि असल्या धन्वंतरी च्या नावाने व्यापार करणाऱ्यांवर.लोकं जर नियमाने राहिली असती तर आज ही पाळी आली नसती , लोकं हो अजून ही वेळ गेलेली नाहीये , फक्त मास्क वापरा ,हात स्यानीटाइज करा , संयम ठेवा , गर्दी करू नका , गरज नसतांना बाहेर पडू नका , उगा मला काही होत नाही ह्या अविर्भावात राहू नका , गाफील तर बिलकुल भी राहू नका , तुम्हाला ह्या सगळ्या होणाऱ्या आणि लुटले जाणाऱ्या वेदना पासून तुम्हीच स्वतःला रोखू शकता.
सरकार कडून येणाऱ्या तुटपुंजी मदत खाणाऱ्यांची संख्याच रुग्णांपेक्षा जास्ती आहे .
आज तुम्ही दुसऱ्याला गिधाड बनून खाताय उद्या तुम्हाला ही कुणी तरी खाईल हा सृष्टीचा नियम आहे हे याद राखा.
by Sanjay R Patil
त्यांन्ही शहरमां नोकरी ,त्यान्हं नवीन नवीन लगीन व्हयेल ,बायको घर तो सिटी मां ,
शनिवार रविवारनी सुट्टीमां घर येये,
पुढला विकेंड ले तो घर गाववर उना ,गाव बी त्यान्हं भारी टुमदार , डोंगर ना पोटले वसेल ,जंगल म्हणा इतली झाड झाडोरी ,सुधरेल भाषामां निसर्गरम्य म्हणा ना …
,
तर गडी गाववर उना ,संध्याकाळ व्हयनी ,घरनां म्हणनात भाऊ जाय पोरले गाव दखाडी लय ,डोंगर डांगर फिरायी लय ..
त्यान्ही गाडी काढी ,तीले मांगे बसाडं , इकडे तिकडे फिरायं ,डोंगरना खेटी गाडी लायी दिधी ,हात मां हात गुफिसन दोन्ही जीव थोडं वर चढनात ,तीले दम लागणा ,मंग दोन्ही जण एक मोठा झाड खाल बसनात ,किसाकिसी कयी …
ती लाजीसन चूर चूर व्हयी गयी ,खाल मान घालीसन बसनी ,
हाऊ तीले म्हणस,” ये इकडे बघना गं माझ्या कडे .”
ती ,”उंहू ”म्हणस ..
हाऊ ,” ये अशी काय करतेस ,बघ तर खरं. ”
ती मान वर करस यान्हा कडे दखस ..
हाऊ,”माझ्या डोळ्यात बघ की… ”
तिन्हा चेहरावर लाज आणि स्मित मिश्रण तयार व्हस..ती यान्हा डोळामां खोल दखस ..
हाऊ म्हणस ,”आहाहाः किती सुंदर आहेत गं तुझे डोळे , मला तर यांच्यात सारं जग दिसतंय ,हे रान ,पाने ,फुले ,झाडे झुडपे ,वा सुंदर मृगनयनी ..”
,
तीतलामां झाडवरतीन एक आवाज येस ,” ये भो$$$$ अरे मन्ही बकरी दखास का पहाय रे जरा ,राननी दुपारथून दवडी जायेल शे….. ”
by अहिराणी भाषिक अजितराज अहिरे
औरंगाबादवर लादलेले लॉक डाऊन म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर…
या काळात सरकार कर वसूली मागतच राहणार… वीज बील वाले तंग करतच राहणार..जीएसटी रिटर्न लेट झाले तर हरामी दंड लावणार… जागेचा मालक भाडे वसुल करणार… बॅंका रोज कुठले तरी डेबिट टाकून खाते खाली करणार…. जगण्याच्या अनेक अडचणी… तशाच ठेवून लॉक डाऊन म्हणजे सरकारी यंत्रणेने घरात कोंडून मारण्यासाठी लावलेला सापळा..
गेल्या वर्षी याच काळात मोदी सरकारने असेच बिनडोक लॉक डाऊन करुन लोकांच्या जीवनाशी खेळ मांडला होता.. आता उध्दव सरकारने पुन्हा तेच केलेय… बेशिस्त लोकावर जबर कारवाई करणे टाळून… सरसकट सगळ्याच व्यापार उद्योगाला बुडवायचा घाट घातला. गेल्या वेळी थोडी फार सहनशक्ति होती… आता सरकारने कसे मरायचे याचेही मार्गदर्शन करावे..
राजकारणी, सरकारी नोकर सोडून सगळ्यांना रेशन मध्ये जहर वाटा… लस किती परिणामकारक माहीत नाही… पण जहर तरी शुध्द आणि परिणामकारक वाटा.. किंवा पेट्रोल पंपावर विका… इतकी वायझेड सुरक्षा असूनही मुख्यमंत्र्याच्या घरात करोना घुसतो… केंद्रीय गृहमंत्री, व्हीआयपी, महान व्यक्ति करोना ग्रस्त होतात…. राज ठाकरे सगळे नियम धुडकावून फिरतात…त्यांना केले का लॉक डाऊन? मग सर्व सामान्य समाजाला इतके वेठीस धरुन कसला तळतळाट मागता आमच्या कडे..!
विद्रोही न
by Navnath Pawar
पत्रकारांनो, तुम्ही कोणी विशेष नाही आहात !
————–
..मागील वर्षभरात कोरोनाने अनेकांना आपल्यातून कायमचे ओढून नेले.आपल्या कुटुंबातील, स्नेही-आप्तेष्ठांमधील,मित्रपरिवारातील,
परिचितांमधील कुणी ना कुणी जवळपास प्रत्येकानेच गमावलंय.परिस्थिती अशी भीषण असली तरी लोक लढताहेत.हातावर पोट असलेली,घराबाहेर पडून काम करण्याशिवाय पर्याय नसलेली करोडो लोक आपली शक्य तेवढी काळजी घेत आपापलं कर्तव्य पार पाडताहेत.नव्हे..त्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच काय आहे ? या अपरिहार्यतेतूनही अनेकांना संसर्ग होतोय आणि त्यापैकी काहींना जीव गमवावाही लागतोय.कोण काय करणार ?
अनेक वार्ताहर,पत्रकारांनीही या काळात अन्य लोकांप्रमाणेच आपले जीव गमावले.गेल्या दोनतीन दिवसातील जळगाव,रावेर येथील दुःखद घटनांचाही त्यात समावेश आहे.अकाली कुणाचाही जीव जाणे ही काळीज कुरतडणारीच बाब.मग तो पत्रकार असो व आणखी कुणी कष्टकरी.परंतु आता या कालपरवाच्या घटनांनंतर आणि यापूर्वीही जेव्हा काही पत्रकारांचे कोरोनाने निधन झाले तेव्हा अनेक पत्रकार पराकोटीच्या त्वेषाने सरकारला दूषणं देत इथे आवेशपूर्ण पोस्टी टाकतात तेव्हा आश्चर्य वाटतं.
जीवाचं काही मोल नसतं काय
सरकार आणखी किती पत्रकारांचे बळी घेणार ? सरकारला पत्रकारांच्या जीविताचे काही घेणेदेणे आहे कि नाही ? हे सरकार खुनी सरकार आहे..असं काय काय ही मंडळी लिहिताना दिसतात.सरकारवर होणाऱ्या टीकेला कसा प्रतिसाद द्यायचा ते सरकार पाहील पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून हे सर्व पाहिल्यावर मला साहजिकच काही प्रश्न पडतात.पोटासाठी रिस्क घेऊन घराबाहेर पडावे लागणारे फक्त पत्रकार आहेत काय ? अन्य जे लाखो-करोडो लोक तेच रिस्क घेऊन आपापले कामधंदे करताहेत ती माणसं नव्हेत काय ?
त्यांच्या जीवाचं काही मोल नसतं काय ? आणि आणखी किती पत्रकारांचे कोरोनाने बळी घेतल्यावर सरकारला जाग येणार आहे,या प्रश्नामागची तर्कसंगत भूमिका काय ? सरकारने अन्य सगळ्या कष्टकरी समाजघटकांना वाऱ्यावर सोडून फक्त पत्रकारांना काही विशेष ट्रीटमेंट का,कशासाठी आणि कशी द्यायला हवीये ?
आजही बाईट घेण्यासाठी एकमेकांच्या अंगावर पडणाऱ्या,नेते-सेलिब्रिटी-वादग्रस्त पोलीस अधिकारी आदींच्या गाड्यांचा सिनेमा स्टाईल पाठलाग करणाऱ्या असंख्य वार्ताहर,कॅमेरामन आदींच्या चेहऱ्यांवर मास्क नसल्याचे आम्ही टीव्हीवर पाहतो,तो सरकारचा दोष असतो काय ? सोशल डिस्टन्सचे सगळे नियम हे सगळे फिल्डवरील पत्रकार वगैरे लोक नेहमीच पायदळी तुडवत असल्याचे आम्ही पाहतो,तोही सरकारचा दोष ? स्पर्धेत सबसे आगे राहण्यासाठी सगळ्या सुरक्षा सूचनांचा अवलंब टाळून उर फुटेस्तोवर धावाधाव का करीत असता ?
करोडो कष्टकरी लोकांचे काय ?
आणखीही असं बरंच काही लिहिता येईल.पण नको.सांगण्याचे तात्पर्य म्हणजे स्वतःला कोणीतरी विशेष समजणं आणि त्यातून स्वतःसाठी काही विशेष मागण्या करणं पत्रकारांनी थांबवायला हवं.तरी पत्रकारांच्या तालुका -जिल्हा ते राज्य पातळीवर अनेक संघटना आहेत.त्या आपल्या सदस्यांवर आलेल्या अशा आपत्तीत जमेल तशी मदत करीत असतात. सरकार, नेतेही या संघटनाना भरीव सहकार्य करीत असतात. अशा संघटना ज्यांच्या नाहीत अशा करोडो कष्टकरी लोकांचे काय ?
तसंही कोणे एके काळी या क्षेत्राला आणि त्यात काम करणाऱ्या लोकांना समाजात जो मानसन्मान,आदर होता तो आता अगदीच तुरळक अपवाद वगळता कधीच संपलाय.आणि तो का,हे या क्षेत्रातील प्रत्येकालाच माहित आहे.त्यामुळे तुम्हीही मास्क वापरा..सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळा आणि स्वतःला सुरक्षित राखून काम करा.तुम्हीही आता या समाजातील अन्य घटकांप्रमाणेच एक सर्वसामान्य घटक आहात..विशेष कुणीही नाहीत हे लक्षात घ्यायला हवंय.
by Ravindra Pokharkar
नारद म्हणाले, नरेंद्र भाई..!
–
ज्ञानेश वाकुडकर
•••
नारद म्हणाले, नरेंद्र भाई
तुमची लिला कळेना काही
कुठल्या युगी, कुठल्या ठाई
तुम्ही अवतार घेतला ?
रेल्वे अस्तित्वात नव्हती तरी
चहा विकला स्टेशन वरी
भीक मागितली घरोघरी
ऐशा लिला ऐकल्या !
खरेच काही कळेना मला
‘शाखे’त कोणता कोर्स केला
‘फेकुगिरी’ ह्या तुच्छ कलेला
आपण प्रतिष्ठा देवविली !
निर्लज्जपणा, कोडगेपणा
या दोन्हींचा उत्तम नमुना
दुसरे मॉडेल तुमच्या विना
तिन्ही लोकी अशक्य !
शाखेत असतील नगाहून नग
पण एवढे मूर्ख नाही जग
तुमच्यामुळेच आकाशात ढग
टी. व्ही. अँकर बोलती !
तुम्हीच आभाळ तयार केले
असेही सांगतात मूर्ख चेले
यांचे भेजे भंगारात गेले
दुनिया हसते फिदीफिदी !
नागपूर मधली गटारगंगा
आंघोळ करू दे बिल्ला – रंगा
किंवा कोणी वेडा – नंगा
पवित्र होतो, सांगती !
तुम्ही अस्सल खानदानी
काय वर्णावी तुमची कहाणी
बांगला देशी दोन्ही हातांनी
केस उपटू लागले !
तुम्ही ग्रेट आहात भाई
बांगला स्वातंत्र्याची लढला लढाई
त्यांनाच हाकलून द्यायची घाई
झाली होती तुम्हाला !
नुसते ऐकून येती शहारे
दोन्ही कडून सोडता वारे
त्यालाच सुगंध म्हणती बिचारे
ऐसे भक्ताड महागुणी !
आम्हा गरिबावर दया करा
असला आजार नाही बरा
खरे बोलायचा प्रयत्न करा
कधीतरी जमेल हो !
–
by ज्ञानेश वाकुडकर
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 28 , 2021 13:10 PM
WebTitle – Social media corner latest & viral post in social media 2021 03 28