मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. 47 वर्षीय श्रेयस तळपदे ला अचानक (हार्ट अटॅक) हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातमीने त्याच्या बॉलिवूडमधील सर्व मित्रांना त्रास झाला. काल रात्री उशिरा ही बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या हितचिंतकांकडून त्यांच्याबद्दल सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या श्रेयस डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्याच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
गुरुवारी रात्री श्रेयसची तब्येत ठीक नव्हती.अशा स्थितीत पत्नी दीप्ती आणि कुटुंबीयांनी त्यांना तातडीने अंधेरी परिसरातील
बेलेव्ह्यू रुग्णालयात नेले. श्रेयसची अँजिओप्लास्टी झाली असून तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार , “श्रेयस तळपदे दिवसभर शूट करत होता, तो अगदी ठीक होता आणि सेटवर सगळ्यांसोबत मजामस्करी करत होता. त्याने त्याचे अॅक्शन असलेले सीक्वेन्स सुद्धा शूट केले. शूट संपल्यानंतर तो घरी परतला आणि काही वेळाने त्याने पत्नीला सांगितलं की त्याला अस्वस्थ वाटत आहे.पत्नीने श्रेयस ला हॉस्पिटलमध्ये नेले,जात असताना तो वाटेतच कोसळला होता,तिथे त्याला हार्ट अटॅक आला.त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं,त्याच्यावर एंजीओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.श्रेयस डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. लेटेस्ट अपडेट नुसार श्रेयस ची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.”
नेमकं काय झालं शूटिंगच्या नंतर?
अभिनेता श्रेयस तळपदे ‘वेलकम ३’ (वेलकम टू जंगल) या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगसाठी श्रेयस पहाटेच घरातून निघाला होता. यानंतर श्रेयसने दिवसभर चित्रपटाचे शूटिंग केले
आणि यादरम्यान त्याने सतत शॉट्स दिले.नेहमीप्रमाणे तो शूटिंग संपवून संध्याकाळी घरी परतला,
पण घरी पोहोचताच त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांची प्रकृती ढासळू लागल्यावर त्यांची पत्नी दीप्ती
या त्याला रुग्णालयात घेऊन जाऊ लागल्या. यादरम्यान श्रेयस वाटेतच कोसळला होता.
अशा स्थितीत पत्नी खूप घाबरली आणि श्रेयसला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले,
तिथे त्याला ह्रदय विकाराचा झटका आला. यानंतर श्रेयसवर अँजिओप्लास्टी करण्यात आली,
त्यानंतर त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पत्नीने दिली मोठी अपडेट
दिप्ती तळपदेची पोस्ट-
‘माझ्या पतीने नुकत्याच अनुभवलेल्या प्रकृतीच्या समस्येनंतर अनेकांनी काळजी व्यक्त केली. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या. त्या सर्वांबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आणि सर्वांना कळवू इच्छिते की श्रेयस ची प्रकृती स्थिर आहे आणि काही दिवसातच त्याला डिस्चार्ज दिला जाईल.या काळात वैद्यकीय टीमने वेळेवर आणि तातडीनं उपचार केले. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते आहे . श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा होत असून आम्ही काही गोष्टी खासगी ठेवू इच्छितो, त्याचा आपण सर्वांनी आदर करावा अशी मी विनंती सर्वांना करते. तुमचा भक्कम पाठिंबा हा आम्हा दोघांसाठी प्रचंड ताकदीचा स्रोत आहे,’ अशी आशयाची पोस्ट श्रेयस ची पत्नी दिप्ती यांनी सोशल मिडियात शेअर केली आहे.
‘वेलकम 3’ या चित्रपटात श्रेयस महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तो अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, तुषार कपूर आदींसोबत दिसणार आहे. श्रेयसव ला अटॅक आल्याची बातमी आल्यानंतर चित्रपट वर्तुळातील कलाकार त्याच्याबद्दल चिंतेत आहेत. श्रेयस तळपदे चा जन्म 27 जानेवारी 1976 रोजी मुंबई मध्ये झाला. श्रेयस हिंदी आणि मराठी चित्रपटात काम करतो. श्रेयसने 2004 मध्ये दीप्तीशी लग्न केले आणि त्याची पत्नी मानसोपचारतज्ज्ञ आहे आणि दोघांना एक मुलगी आहे.
बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या आठ बांगलादेशींना महाराष्ट्र एटीएस कडून पुण्यात अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 15,2023 | 21:05 PM
WebTitle – Shreyas Talpade Heart Attack latest update