मुंबई, 17 जुलै, : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक भूकंप अनुभवायला मिळत आहेत.राजकीय नेत्यांच्या भूमिका अनेकदा बुचकळ्यात टाकणाऱ्या असतात.अलिकडे हे प्रमाण कमालीचे वाढलं आहे.आज घेतलेली भूमिका उद्या असेल की वेगळीच असेल हे खुद्द तो नेताही सांगू शकत नाही.आज बंगळुर मध्ये देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक होणार आहे.या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार होते. मात्र शरद पवारांनी आज दौरा रद्द करत विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणे टाळले आहे.शरद पवार हे विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची बातमी समोर आलीय.शरद पवार आज मुंबईतच थांबणार असल्याची माहिती समोर आलीय.तर दुसरीकडे राज्यातील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजप सोबत सत्तेत जाऊन केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.अशातच शरद पवार यांनी देखील त्यांचा नियोजित दौरा अचानक रद्द केल्याने उलटसुलट राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
दौरा रद्द करत बैठकीला उपस्थित राहणे टाळले
आज बंगळुरूमध्ये देशातील प्रमुख राजकीय विरोधक पक्षांची दुसरी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलीय.पहिली बैठक पटना येथे पार पडली होती. सत्ता बदलाच्या आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या या बैठकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे कळते.विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न असणाऱ्या सदर बैठकीला काँग्रेसच्यासोबत देशातील 24 पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.मात्र शरद पवारांनी आज दौरा रद्द करत बैठकीला उपस्थित राहणे टाळले आहे. शरद पवार आजच्या दिवशी मुंबईतच राहणार आहेत.
उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहीती दिली की,
“राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार हे आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत,ते उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.“
एनसीपी च्या अधिकृत ट्विटर हँडल वरूनही शरद पवार उद्या उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘५० खोके, एकदम ओके’
दरम्यान आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं असून पहिल्याच दिवशी हायहोल्टेज राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल होत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून ‘५० खोके, एकदम ओके’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 17,2023 | 11:11 AM
WebTitle – Sharad Pawar’s visit to the opposition’s meeting is suddenly cancelled