जगाला शांती सद्भावना मैत्री आणि प्रेमाचा संदेश देणारा तथागतांचा बौद्ध धम्म हा जगभरातील लोकांचा अंतिम थांबा आहे.सर्वाना तो आकर्षित करत असतो.कोणतीही हिंसा नाही.कर्मकांड नाही.अवडंबर नाही,विज्ञान हाच पाया असणारी साधी सोपी विचारसरणी,सर्वांगीण मानवी विकासाची जीवन जगण्याची एक आदर्श जीवन पद्धती बौद्ध धम्मात असल्याने धम्म स्विकारण्याचे प्रमाण जगभरात वाढत आहे. अशोका विजया दशमी,25 ऑक्टोबर 2020 रोजी चैत्यभूमी दादर येथे शाहीर सीमाताई पाटील यांनी बौद्ध धम्माची जाहीर दीक्षा घेत असल्याचे जाहीर केले.
शाहीर सीमाताई पाटील हे पुरोगामी चळवळीतील एक महत्वाचे नाव.
आपल्या शाहीरीने सर्व महापुरुष आणि राष्ट्रमाता यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम करून
त्यांचे विचार समाजात रुजवत समाजातील विविध घटकांचे प्रबोधन करण्याचे काम गेले अनेकवर्षे त्या करत आहेत.
अशोका विजया दशमी,25 ऑक्टोबर 2020 रोजी चैत्यभूमी दादर येथे शाहीर सीमाताई पाटील यांनी बौद्ध धम्माची जाहीर दीक्षा घेत असल्याचे जाहीर केले.
तसेच याच ठिकाणी त्यांना भंतेंच्या हस्ते धम्म दीक्षा देण्यात आली.
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती स्थळावर हा दीक्षांत सोहळा पार पडला.
भारताच्या प्रगतीत महिलांचा वाटा मोठा आहे.आणि असेल
जेव्हा भारतीय महिला कर्मकांड अंधश्रद्धा चमत्कार यांना मूठमाती देवून विज्ञानवादी विचार जोपासेल,
तेव्हाच महिलांमध्ये परिवर्तन येईल आणि देशाची प्रगती होईल असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
यावेळी त्यांच्यासोबत 22 प्रतिज्ञा अभियानचे अरविन्द सोनटक्के,मुख्य प्रचारक अनिल खांडेकर,
एड. भोसले , संगीतकार जॉली दादा मोरे, काझी जी ,सूर्यकांत खरात,अमोल निकाळजे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मानवाला दुःख मुक्त करण्याचा महामार्ग
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 29, 2020 at 7:27 AM
WebTitle – shahir seematai patil