मुंबई: देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना एका टॅक्सी चालकाचा फोन आला की बॅग घेऊन आलेल्या दोन लोकांनी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबद्दल माहिती विचारली.टॅक्सी चालकाच्या या माहितीनंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी मुकेश अंबानींच्या घरी सुरक्षा वाढवली आहे.
पोलिसांनी मुकेश अंबानींच्या घरी सुरक्षा वाढवली आहे.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, आम्हाला एका टॅक्सी चालकाचा फोन आला की बॅग घेऊन आलेल्या दोन लोकांनी मुकेश अंबानींचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाकडे टॅक्सी घ्यायला लावली.टॅक्सी चालकाचा जबाब नोंदवला जात आहे. डीसीपी स्तरावरील अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अँटिलियाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. या संदर्भात मुंबई पोलिसांनी सांगितले की, ते सध्या या संपूर्ण प्रकरणाची सत्यता पडताळत आहेत. त्याचवेळी दोन्ही प्रवाशांचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
या अगोदर अँटिलियासमोर एक स्कॉर्पिओ बेवारस अवस्थेत सापडली होती.
25 फेब्रुवारी रोजी मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी असलेल्या 27 मजली अँटिलियासमोर एक स्कॉर्पिओ बेवारस अवस्थेत सापडली होती. पोलिसांनी नंतर जिलेटिनच्या कांड्या आणि वाहनातून अंबानी कुटुंबाला धमकी देणारे धमकीचे पत्र जप्त केले होते. यासोबतच अंबानींच्या ताफ्यातील एका वाहनाची नंबर प्लेटही जप्त करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता.
तपासात हे वाहन मनसुख हिरेन नावाच्या व्यावसायिकाचे असल्याचे निष्पन्न झाले होते, त्यांनी आठवडाभरापूर्वीच कार चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र हे प्रकरण उजेडात आल्यानंतर आठवडाभरानंतर मनसुख हिरेनचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला. या संपूर्ण प्रकरणाचा कट रचल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचे एपीआय सचिन वाझे याला अटक करण्यात आली.जे अजूनही तुरुंगात आहे.त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
जय भीम चित्रपटाच्या आणखी एका दृश्याने वाद ,निर्मात्यांनी काढला सीन
जय भीम मुवी मधील प्रकाश राजच्या ‘झापड मारण्याच्या’ सीनने नवा वाद
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
धार्मिक स्वातंत्र्य:भारताला रेड लिस्ट मध्ये टाका,अमेरिकन संस्थेची शिफारश
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 08, 2021 21:05 PM
WebTitle – Security beefed up at Mukesh Ambani’s house after taxi drivers tip-off