मुंबई:महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेविरोधात आघाडी उघडली आहे.समीर वानखेडे यांची नोकरी जाणे निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.मलिक म्हणाले की,समीर वानखेडेने एकापाठोपाठ एक अनेक फसवणूक केली आहे.या फसवणुकीत त्याच्या वडिलांचाही सहभाग आहे.
मलिक म्हणाले की, नवी मुंबईत सदगुरू रेस्टॉरंट एण्ड बार नावाचे हॉटेल सुरू आहे. समीर वानखेडे यांच्या मालकीचे आहे. या हॉटेलचा परवाना समीर वानखेडे यांच्या वडिलांनी त्यांच्या नावाने काढला होता. जेव्हा हा परवाना जारी करण्यात आला. त्यावेळी समीर वानखेडेचे वय १७ वर्षे १० महिने १९ दिवस होते. समीर वानखेडे हा त्यावेळी अल्पवयीन होता, मात्र त्याच्या वडिलांनी त्याची पर्वा न करता अल्पवयीन मुलाच्या नावाने दारूखाना सुरू केला, तो कायदेशीर गुन्हा आहे.
समीर वानखेडे यांचे तीन फर्जीवाडे
नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडे यांनी तीन प्रकरणात महत्त्वपूर्ण फसवणूक केली आहे. त्यापैकी पहिले आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील 25 कोटींच्या खंडणीचे प्रकरण आहे. त्यातील 50 लाख घ्या आणि नंतर परत करा. यानंतर दुसरी फसवणूक म्हणजे बनावट प्रमाणपत्राद्वारे सरकारी अधिकाऱ्याची नोकरी मिळवली. त्यामुळे दलित समाजातील व्यक्तीचे हक्क मारले गेले.आणि त्यांची तिसरी फसवणूक म्हणजे अल्पवयीन असूनही स्वत:च्या नावावर रेस्टॉरंट आणि बार असणे आणि त्याची खोटी माहिती आपल्या विभागाला देणे.
हा शराब खाना आजही समीर वानखेडे यांच्याच नावाने सुरू आहे.
कोणत्याही सरकारी अधिकार्याला आपले काम करत असताना दारूचा गुत्ता बार इत्यादी चालवण्याचा अधिकार नाही.हे तीनही पुरावे समीर वानखेडे यांची नोकरी जाण्यासाठी पुरेसे आहेत. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा व्हावी. केंद्र सरकारने आता समीर वानखेडे यांच्या कृत्याकडे डोळेझाक केली, तर तेही समीर वानखेडे यांच्या पाठीशी असल्याचे सिद्ध होईल.
बार चे भाडे 2 लाख 40 हजार रुपये
नवाब मलिक यांच्या म्हणण्यानुसार, समीर वानखेडे यांनी सन 2017 मध्ये त्यांच्या मालमत्तेचा तपशील दिला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना या सदगुरू बार आणि रेस्टॉरंटचे वार्षिक २ लाख ४० हजार भाडे मिळत आहे.
याशिवाय 1995 मध्ये त्यांनी या मालमत्तेची किंमत एक कोटी रुपये दाखवली होती.
आरोपांवर वानखेडे यांचे स्पष्टीकरण
“यात बेकायदेशीर असं काहीच नाहीय. मी २००६ सालापासून सरकारच्या सेवे दाखल झालो,तेव्हापासून या बार आणि रेस्तराँरंटचा उल्लेख मी माझ्या वार्षीक स्थावर मालमत्तेमध्ये करत आलो आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख मी संपत्तीच्या हिशोबात मांडलाय. या उद्योगामधून मिळणाऱ्या कमाईचा सर्व उल्लेख मी प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केलाय,”
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
Jai bhim film Review – इरुलर जमातीचे भेदक चित्रण करणारा सिनेमा ‘ जयभीम ‘
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 19, 2021 21:47 PM
WebTitle – Sameer Wankhede’s job will go! Claim of Nawab Malik